व्रतविधि – कार्तिक शु. ७ दिवशीं या व्रत ग्राहकांनी एकभुक्ति करावी. आणि आठ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासामश्री आपल्या हातीं घेऊन चैत्यालयांस जावे. तेथे गेल्यावर मंदिरात तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास मक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. नंतर श्रीपीठावर श्रीचंद्रप्रभ तीर्थंकर प्रतिमा श्यामज्वालामालिनी यक्षयक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका पाठावर आठ स्वस्तिके काढून त्यांच्यावर पार्ने, गंधाक्षता, फले वगैरे ठेवावीत वृषभापासून चंद्रप्रभपर्यन्त आठ तीर्थंकरांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं त्यांची पूजा करावो. चरु करावेत श्रुत व गुरु यांची अर्चा करावी. यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. अष्टदिक् कन्यका यांचोही अर्चना करावी. ॐ हीं अर्हं श्रीचंद्रप्रभायक्ष ज्वाळा मालिनीययक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पांढरी सुवासिक फुले घालावीत. णमोकार मंत्राचा जप १०८ वेळां करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्रीचंद्रप्रभतीर्थंकरचरित्र वाचावे. ही व्रतकथाही वाचावी. एका पात्रांत आठ पार्ने लावून त्यांवर
अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. त्यादिवशीं आपण उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. तीन दिवस ब्रह्मचर्य पाळावे.
याप्रमाणे महिन्यांतून दोन वेळां त्याच तिथीस है व्रत पूजन करावें. अशा आठ पूजा पूर्ण झाल्यावर अंतीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीचंद्रप्रभतीर्थकरविधान करून महाभिषेक करावा. चतुः-संघास चार प्रकारचीं दाने द्यावीत. आठ नवीन मातीच्या मोग्यांत आठ प्रकारची धान्यें मरून त्यांना सूत गुंडाळून गंधाक्षता लावावी. आणि ती देवापुढे ठेवावीत. त्यातून देव गुरु शास्त्र यांच्यापुढे एकेक ठेवावें. १ गृहस्थाचार्यास १ पद्मावतीस १ जक्कळदेवीस (जलदेवतेस) १ क्षेत्रपालास व आपण १ घेऊन घरीं जावें. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
है व्रत निर्दोष पाळल्याने पूर्वी ज्यांना सद्गति सुख प्राप्त झाले आहे, त्यांची कथा तुम्हांस सांगतों ऐका –
– कथा –
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत पुष्कलावती नामक एक विशाल देश आहे. त्यांत पुंडरीक नांवाचे एक मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी मेघरथ नांवाचा एक मोठा शूर, नीतिमान्, दयालु असा राजा राज्य करीत होता. त्याला मनोहरा या नामक एक सुंदर गुण-वती राणी होती. त्यांना दृढरथ नामे पुत्र होता. त्याला वसुमति नामक मनोहर स्त्री होतो. यांच्या पोटीं वारिषेण नांवाचा एक सद्गुणी पुत्र होता. त्याला सुरदेवी नांवाची एक सुंदर सुशील स्त्री होती. याप्रमाणें पुत्रपौत्रादि मंत्री, सेनापति, राज पुरोहित, राजश्रेष्ठी व पुरजन यांच्यासह तो मेघरथ राजा सुखाने कालक्रमण करीत होता.