व्रतविधि – ज्येष्ठ शु. ४ दिनीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी आणि ५ दिवशीं प्रातःकाळीं सुस्खोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवने धारण करावींत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्पक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर पद्मप्रभ तीर्थंकर प्रतिमा कुसुमवर यक्ष व मनोवेगा बक्षीसह स्थापून त्यांना पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून देवापुढे एका पाटावर सहा पाने मांडून त्यांवर अक्षता, फळं, फुके नेवेचे वगैरे ठेवून श्री, ही, ध्रुवि, कीर्ति, बुद्धि, व लक्ष्मी या सहा देवतांचे अर्चन कराने, यक्ष, यक्षी व बन्धुदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं पद्मप्रभ -तीर्थंकराय कुसुमवरयक्षमनोवेगायक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्ये घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. दी व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सहा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्थ करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. सत्पात्रांत आहारदान द्यावें. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक वर्मध्यानांत घालवावेत.
या प्रभाणे महिन्यांतून एकदां त्याच तिथोस पूजा करावी. अशा सहा पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पद्ममम तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा, चतुः संघास ‘चतुर्विधदाने द्यावीत. सहा दंपतींस मोजन करवून त्यांना वस्त्रार्ने सूषित करून त्यांच्या ओठ्यांत फल, पुष्प, अक्षता, तांबूलादिक घालून त्यांचा सन्मान करावा. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील धातकी खंडात मेरू पर्वाच्या पश्चिमेस विदेह क्षेत्र आहे, त्यांतील दासीका नदीच्या सीमेवर वत्स नामक विस्तीर्ण देश आहे. त्यांमध्ये सुसीमा नांवाची मनोहर नगरी आहे. तेथे पूर्वी अपराजित नांवाचा पराक्रमी, नीतिमान् व धार्मिक नसा राजा राज्य करीत होता. त्याका लक्ष्मीमती नामे सुशील, गुणवत्ती धर्मपत्नि होती. जणूं काय ? स्वरूपार्ने लक्ष्मीच आहे कीं काय ? अशी शोभत होती. त्यांना सुमित्र नांवाचा एक सुंदर पुत्र होता. शिवाय मंत्री, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति इत्यादिच्या परिवारासह तो सुखाने आनंदविलासामध्ये काल घालवीत होता.
एके दिवशीं चारणऋद्धिधारी महामुनीश्वर चर्येनिमित्त राजप्रासा-दांत आले. तेव्हां त्याने त्यांना पढघावून स्वयंपाक गृहांत नेले. मग निरंतराय आहार दिला, मग ते मुनीश्वर एका आसनावर बसले, लग त्यांच्यामुखे कांहीं धर्मोपदेश ऐकल्यावर राजाने आपले दोन्ही हात जोडून विनयाने हे मुनिराज ! शाश्वतसुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान निरूपण करावें, अशी प्रार्थना केळी, तेव्हां ते मुनीश्वर षट्कन्यका व्रत है पालन करण्यास योग्य आहे असे म्हणून व्रतविधि सर्व सांगते झाले. नंतर तेथून ते निघून गेले. पुढें योग्य काळीं त्या राजानें हैं व्रतपूजन यथास्थित केलें. मग कांहीं दिवसांनी त्यांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो आपल्या सुमित्र नामक पुत्रांस राज्यभार देऊन वनांत गेला. तेथे पिहितास्त्रव भट्टारक निर्मंथ महा-मुनि यांच्या सन्निध दिगंबर दीक्षा ग्रहण करता झाला. एकादशांग-धारी होऊन षोडशभावना भाविल्या. शेवटीं समाधिविधीनें मरून त्या व्रत-तप-पुण्य-फलानें उपरिमग्रैवेयकांत प्रियंकर नामक मोगू लागला. विमानांत अहमिंद्र नांवाचा देव होऊन जन्मला. तेथे स्वर्गीय सुख इकडे त्या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कौशांबी नामक मोठे सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी इक्ष्वाकुवंशीय, काश्यपगोत्रीय धरण नांवाचा धार्मिक राजा राज्य करीत होता. त्याला सुसीमा नाम्नी सुशील, सदा-‘चारिणी रूपवती, अशी पट्टस्त्री होती. तिच्या उदरीं तो पूर्वोक्त अहनिंद्र देव आयुष्यांती तेथून च्यवून अवतरला. तेव्हां तेथे चतुर्णिकायदेव त्यांचे परिवारात येऊन जिनबालकांस मेरू पर्वतावर नेऊन जन्मा-भिषेक करते झाले, त्यावेळीं त्यांचे नांव पद्ममभ असे ठेवण्यांत आले.
या बालकाच्या जन्मकाळीं (पांचव्या दिवशीं ) सहा कुल पर्वता-