व्रतविधि – भाद्रपद मासांतील पहिल्या मंगळवारी या व्रति-कांनीं एकभुक्ति करात्री. आणि बुधवारी प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवले धारण करावींत. मग सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर चद्रप्रभ तीर्थंकर प्रतिमा श्यामयक्ष ज्वाला मालिनी यक्षीसह स्थापुन तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्ट-द्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. देवापुढे एका पाटावर आठ पार्ने मांडून त्यावर अक्षता, फुळे फलें, नैवेचें बगैरे ठेवावे. श्रुत व गणधर यांची पूजा करून अष्टव्यंतर देवांचीं अर्चा करावी. यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चंद्रप्रभ तीर्थकराय श्यामयक्ष ज्वालामालिनी यक्षीसहिताय नमः स्वाहाः या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप एक करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत आठ पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महाय करावे व त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी, स्वादिवशी उपवास करावा. सयात्रांस आहारदान यांचे दुसरे दिनों पूजा व दान करून पारणे करावेंः तीन दिवस ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काळ घालवावा.
याप्रमाणे क्रपाने आठ बुधवारी पूजाविधी करून अंतीं कार्तिक अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं चंद्रप्रभविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. आठ मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. दीन अनाथ यांना भोजन द्यावे.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत विजयांर्थ मोठा पर्वत आहे. त्याच्या दक्षिण श्रेणीवर विश्वपुर नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी इंद्रध्वज नांवाचा मोठा पराक्रमी राजा आपल्या इंद्रायणी पट्टराणीसह सुखाने राज्य करीत होता. मंत्री, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापत्ति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह आनंदांत काळ घालवीत असतां एके दिवशीं त्या नगराच्या बाहेरील उद्यानांत गोवर्धन नामे महामुनि येऊन उतरले. ही वार्ता वनपालकांकडून राजांस कळतांच तो नगरांत आनंदमेरी देववून आपल्या परिजन व पुरञ्जन यांच्यासह पादमार्गे त्यांच्या दर्शनास गेला. तेथे त्यांना तीन प्रदक्षिणा घालून मक्तीनें वंदना करून त्याच्या समीप बसला. कांडी वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर राजा आपले दोन्हीं हात जोडून विनयानें त्यांना म्हणाला, हे सकलजनहितवर्धक गुरुराज ! आज आपण आम्हांस सककसुखवर्षक असे एकादै बतविधान निवेदावे. हे त्यांचे नम्र वचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले – हे भव्षराजचूडापणे ! आतां तुम्हांस अष्टविध व्यंतरवत ई करण्यास अति उचित आहे. असे म्हणून त्यांनी त्यांना त्याचा सर्वविधि सांगितला. ते ऐकून सर्वांना आनंद झाला. मग राजा व राणी यांनीं त्यांना प्रार्थना करून है बत त्यांच्या जवळ ग्रहण केले, नंतर सर्वजन पुनः त्यांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आहे. पुढे समयानुसार दोधांनी हे व्रत यथास्थित पाळिले. त्यामुळे ते संसारीं सुखो झाले. * कालांतराने राज्जा संसाराविषयीं विरक्त होऊन पुत्राकडे राज्यभार देऊन वनांत गेला. तेथे त्यांनी एका दिगंबर महासाधुजवळ जिनदीक्षा घेतलो व घोर तपश्चर्या केली. त्यामुळे समाधिनरण साधून तो स्त्रर्गात गेला. ती राणी आर्थिका होऊन तप करूं लागली. त्या व्रत व तपनमावानें स्त्रीलिंग छेडून स्वर्गात देव झाली. हे दोघेही भवांतरानें मोक्षास जातील.