व्रतविधि – चैत्र शु. ४ दिनीं या व्रतिकांनी एकभुक्ति करावी. आणि ५ दिवशीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवले धारण करावींत. सर्व पूजा द्रव्ये हार्ती घेऊन मंदिरास जावें. जिनाल यास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर वासुपूज्य तीर्थकर प्रतिमा षण्मुख यक्ष व गांधारी यक्षोसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. देवापुढें एका पाटावर १२ पाने मांडून त्यांवर अक्षता, फुलें, फळे, चरु बगैरे ठेवून पूज्य बारा चक्रवर्ति राजांचे स्मरण करावे. श्रुत व गणधर यांचो पूजा करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अर्हं वासुपूज्य तीर्थंकराय षण्मुखयक्ष-गांधारीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने
१०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप एक करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत १२ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यै आणि एक नारळ ठेवून महाय करावे. त्याने ओवा-ळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशीं उपवास कराश. सत्पात्रांस आहारदानं धावे. दुसरे दिवशीं पूना व दान करून पारणें करावे. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक घमेध्यानांत काल चालवाव.
या प्रमाणे महिन्यांतून एकदां व्याच तिथीस पूजा करावी. अशा बारा पूजा पूर्ण झाल्यावर फाल्पुन अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावें. त्यावेळी वासुपूज्य तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास बहुविध दार्ने द्यावीत. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंबुद्धोपांतील मेरुपर्वताच्या पूर्वविदेह क्षेत्रांत कच्छ नांवाचा मोठा देश आहे. त्यांत प्रभंकर नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी अतिगृद्ध नांगचा राजा राज्य करीत होता. त्याने हैं चक्रवर्ति व्रत करून उत्कृष्ट पुण्य संपादन केले. परंतु बहु आरंभ व परिग्रहाच्या मोहाने मरून तो तिसऱ्या नरकांत गेला. तेथे दहा सागरोपम वर्षे अनेक दुःखें भोगून आयुष्यांती तेथून येऊन पूर्वोक्त देशाच्या वनांत व्याघ्र होऊन जन्मला. त्यावेळीं त्या देशांत प्रीतिवर्धन नामक राजा राज्य करीत होता. तो एक दिवशीं आपल्या परिवारासह वनविहार करण्या-साठीं निघाला असतां, मार्गात त्याला शुभ शकुन झालें, हे पाहून तो आपल्या पुरोहितास म्हणाला, – हे पुरोहिता ! या शकुनाचे फल काय आहे ! तेव्हां तो म्हणाला, हे राजाधिराज ! तुम्हांस वनांमध्ये सत्पात्रदानांचा लाभ होईल. हे त्याचे वचन ऐकून त्याला मोठा आनंद झाला. राजा सर्वजनांसह त्या वनांत एका अशोकवृक्षाखालीं ज.ऊन बसला असतां पिहितास्त्रव नामक मासोपवासी महामुनिराज पारण्याच्या निमित्ताने तेथे आले. हे पाहून राजाने त्यांचे प्रतिग्रहण करून नवधा भक्तीने त्यांना निरंतराय आहारदान दिले. त्यावेळीं तेथे पंचाश्च-र्यवृष्टी झाली, मग त्या मुनिराजांनीं कांहीं वेळ तेथे बसून त्या सर्वांना धमर्मोपदेश केला. त्यावेळी तेथे तो वाघहि धर्मोपदेश ऐकत बसला होता. तो धर्मोपदेश ऐकून त्याला जातिस्मरण झालें. तेव्हां त्या राजानें त्या वाघाचे भवांतर त्यांना विचारिले मग त्यांनी त्यांचे सर्व भवांतर सांगितले. ते ऐकून राजांस मोठें आश्वर्य वाटलें. त्या पात्रदानास (दान-महिमेस ) सुलून त्या उद्यानामध्ये त्यानें कित्येक जिनमंदिरे बांधवून जिनप्रतिमा प्रतिष्ठित केल्या. तो धर्मध्यानांत लवलीन होऊं लागला.
तो वाघ आपल्या भवप्रपंचाचे स्मरण झाल्यामुळे आठरा दिवस आहारपाण्याचा त्याग करून समाधीनें मरण पावला आणि ईशान कल्पांत दिवाकर देव होऊन जन्मला. तो प्रीतिवर्धन राजा आपल्या मनांत प्रबल वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे दिगंबर जिनदीक्षा घेऊन तप-श्वर्या करू लागला. त्यामुळे सर्व कमांचा क्षय करून तो मोक्षास गेला.
ईशान कल्यांतील तो दिवाकर देव आयुष्यांती च्यवून या लोकांत मतिवर नांवाचा राजा झाला. मग तो त्या भवीं जिनदीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करूं लागला. त्या तपप्रभावाने स्वगर्गात अहमिंद्र देव होऊन जन्मला. मग पुनः तो या लोकांत सुबाहु नामक राजा झाला. वैराग्य भावनेने जिनदीक्षा घेऊन तप करून शेवटी मरण पावून पुनः अहमिंद्र देवच होऊन जन्मला. त्यानंतर पुनः तो देव तेथून च्यवून या भरतक्षेत्री अयोध्या नगरी आदिनाथ तीर्थकरांच्या यशस्त्रतीच्या उदरीं भरत नांवाचा पुत्र होऊन जन्मला. हाच भरव क्षेत्राचा अधिपत्ति प्रथम चक्रवर्ति होय. याचे वैभव अतिशय मोठे होतें. अहो ! छप्पन्न अंतरद्वीप याच्या स्वाधीन होते. त्यांमध्ये नव्वद हजार नगरे, शाण्णत्र कोटी आर्ने, नव्वद हजार द्रोणनुखें, अड्डेबाळीसहजार पट्टणे, सोळा हजार खेडीं होतीं. बत्तीस हजार मुकुटबद्ध राजे, सोळा हजार देत्र सेवक, शाण्गत्र हजार स्निया, चौसष्ठ हजार पुत्र, बत्तीस हजार कन्या, नव्वदलक्ष भद्रदस्ती, अठरा कोटी अश्व, सप्त जोवरत्ने, सप्त अजीव रत्ने, नवनिधि, बारा योजने ज्यांचा आवाज जातो अशा नंदिनामक बारा मेरी, चोवीस शेख होते. यक्षांकडून ढाळिली जाणारी बतोस चामरे अशा ऐश्वर्याने युक्त सकल साम्रा ज्याचा अधिपति होता, त्याला चक्ररत्नाची प्राप्ति झाली होती. म्हणून त्याला चक्रवर्ति म्हणत असत. मात्र शेवटीं यांनीं जिनदीक्षा धारण करून आजन्म अभ्यास करून साविलेल्या शुद्धात्लध्यानबलाच्या योगार्ने एका अंतर्मुहूर्तात केवलज्ञान प्राप्त करून घेऊन मोक्षस्थान मिळविले, असे याचे महत्व आहे.