व्रतविधि – मार्गशीर्ष शुक्लाक्षांतील पहिल्या शनिवारी या व्रति-कांनीं एकभुक्ति करात्री. आणि रविवारीं प्रातःकाळीं शुद्धपाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावींत. सर्व पूजाद्रव्यें हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्याप-यशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर विमलनाथ तीर्थकर प्रतिमा पाताळयक्ष व वैरोटी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका पाटावर तेरा स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फुले, फळें वगैरे ठेवावे. अष्ट द्रव्यांनीं तीर्थकरांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. पंचपक्वान्नांचे चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं विमलनाथतीर्थंकराय पाताळयक्ष वैरोटोयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत.
णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत १३ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये एक नारळ ठेवून महाब्र्ध करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी, त्या दिवशी उपवास करावा. ससात्रांस आदारादि दान द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें, तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घाऊवावा.
या प्रमाणे क्रमाने १२ रविवारी बारा पूजा झाल्यावर शेवटीं फाल्गुन अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं विमलनाथ तीर्थंकर विधान करून महाभिषेक करावा, चत्रुःसंघास चनुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वोपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत सीता नदी आहे तिच्या दक्षिणभागी वत्लकावती नांत्राचा एक विशाल देश आहे. त्यांत पृथिवी नांवाची एक सुंदर मनोहर नगरी आहे. तेथे पूर्वी जयसेन या नांवाचा एक मोठा, शूर, पराक्रमी, नीतिमान् गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला जयसेना नामक एक सुशील गुणश्ती, सौंदर्यवती अशी पट्टस्त्री होती. यांना रतिषेण व धृतिषेण या नांवाचे दोन पुत्र होते. हे दोघे मोठे गुणवान् व सुंदर होते.
एके दिवशीं आहारानिमित्त यशोधर नांवाचे महामुनीश्वर राज-वाड्या जवळ आले. तेव्हां त्या जयसेन राजाने त्याचे यथा योग्य प्रतिग्रहण करून त्यांना आपल्या पाकशाळेत नेलें व यथाविधि आहार-दान दिले, त्यानंतर ते मुनि तेथे एका आसनावर बसले. तेव्हां त्यांनीं कांहीं वेळ धर्मोपदेश दिला. ते ऐकून त्या राजानें आपला मत्रप्रपच विचारिला. मग त्यांनीं त्यांस त्यांचा सर्व भवप्रपंच सांगितला. ते ऐकून सर्वांना मोठा संतोष झाला. तेव्हां त्या राजाने ते सगरचक्रवर्त्तिव्रत स्त्रीकारिले. मग ते मुनीश्वर सर्वांना आशिर्वाद देऊन आपल्या स्थानीं गेले. पुढ़ें त्याने योग्यकालीं ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले.
कालांतराने रतिषेण नामक पुत्र अचानक मृत्यु पावला. पुत्र शोकाने जयसेन राजांस ही वैराग्य उत्पन्न झाले. मग धृतिषेण पुत्रांस सर्व राज्यभार दिला. नंतर त्यानें मारुत व मिथुन राजांसहं वनांत जाऊन यशोधर मुनोजवळ जिनदीक्षा घेता झाला. पुष्कळ दिवस घोर तपश्चर्या केल्याने समाधि साधून आरण स्वर्गात महाचल नामें देव झाला. आणि यांच्या बरोबर दीक्षा घेतलेला तो मारुत राजाहि अंतीं समाधि । वेवीने मरण पावून त्याच स्त्रर्वांत मणिकेतु नांत्राचा देव झाला. हे दोघे देव तेथे प्रेमानें राहत होते.
एके दिवशीं त्या दोघांनीं विनोद करीत धर्मनेमाने अशी प्रतिज्ञा केली कीं, ” आम्हां दोघांपैकीं जो प्रथम मनुष्यभव धारण करील त्याला स्वगीत मागे राहणाऱ्या देवानें संसारापासून विरक्त करून जिन-दीक्षा घ्यावयास लावावें. ” पुढे आयुष्यांतीं तो महाचल नांवाचा देव तेथून च्यवून अयोध्यापुरींचा इक्ष्वाकुवंशी राजा समुद्रविजय व त्याची धर्मपत्नि सुबला यांच्या पोटों सगर नामें पुत्र होऊन जन्मला. हा अत्यंत सुंदर असल्यामुळे याला पाहून सर्वांना मोठा आनंद होव असे. युवावस्थेत आल्यावर त्याला सर्व राज्यैश्वर्य प्राप्त होऊन चक्रवर्ति-त्वपद ही मिळाले. इसके ऐश्वर्य प्राप्त झालें होते परंतु तो धर्ममार्ग विस-रत नव्हतां. त्याला साठ हजार पुत्र झाले. यासर्व परिवारासह सुखानें कालक्रमण करीत होता. पुण्यवलानें जोवाला सर्व सुस्वसंपत्ति प्राप्त होते. याकरितां बुद्धिमान् लोकांनीं सर्वदा धर्माचरण करावे. असो.कालांतराने सिद्धवनांत श्रीधर चतुर्मुख महामुनीश्वरांस केवल-ज्ञान उत्पन्न झाले, तेव्हां चतुर्णिकाय देव व राजे महाराजे तेथे येऊन मिळाले. सगरचक्रवर्ति ही तेथे दर्शनार्थ आले होते. सर्वांनीं त्या मुनीश्वरांचे दर्शन, पूजन, स्तवन वगैरे केलें. त्यानंतर तो मणिकेतु देव त्या सगरचक्रवर्ति राजाजवळ येऊन त्यांना म्हणतो, हे राजाधिराज !
काय त्या आरण स्त्रगांतील गोष्टी आपणांस आठवतात ? आम्हां दोघां पैकीं जो आरंभीं या मनुष्यभवांत उत्पन्न होईल त्याला मागे राहिलेल्या देवानें धर्मोपदेश करून संसारापासून मुक्त करावें वैगैरे. आतां आपण पुष्कळ राज्यैश्वर्य भोगिले आहे. याकरितां आपण सर्वं मोह सोडून जिनदीक्षा ग्रहण करावी. हे विषय भोग दुःखाला आणि संसारांत भ्रमण करविण्यास कारणीभूत आहेत. आपण स्त्रतः मोठे बुद्धिमान् आहात मी अधिक काय सांगू आपली प्रतिज्ञा पाळण्यासाठीं मी आपणांस इतके निवेदन करीत आहे. परंतु त्यावेळीं पुत्रमोही सगरच-ऋत्रर्ति राजाच्या मनांवर त्या मणिकेतु देवाच्या उपदेशाचा कांहीं परिणाम झाला नाहीं. हे पाहून तो मणिकेतू देव निराश होऊन पुनः पाहतां येईल. असा विचार करून आपल्या ठिकाणीं निघून गेला.
इकडे ते सुगरचक्रवर्ति त्या केवली मुनीश्वरांस वंदना करून आपल्या नगरी परत आला. पूर्वत्रत् राज्योपभोग भोगूं लागला. कांही दिवसांनीं तो मणिकेतु देव यौवनावस्थेतील निमैथ मुनींचा वेष घेऊन सगरचक्रवर्तीच्या राजवाड्यांतील जिनमंदिरांत येऊन उतरला. है वृत्त त्या राजास कळतांच तो तेथे येऊन श्रीजिनेंद्रास भक्तीनें वंदना करून त्या मुनीश्वरांकडे गेला. आणि त्यांच्या चरणीं वंदनादि करून समीप बसला. त्यांच्यामुखे कांहीं वेळ धर्मोपदेश श्रवण केल्ल्यावर मोठ्या विनयाने आपले दोन्हो कर जोडून त्यांना म्हणतो, -हे गुरुवर्य ! आपण अशा यौवनदर्शत ही कठिण जिनदीक्षा कां धारण केली ? हे पाहून मला मोठे आश्चर्य वाटत आहे. हे त्याचे नम्र भाषण ऐकून ते मुनीश्वर (वेषधारी मणिकेतुदेव) त्यांस म्हणाले, – हे चक्र-वर्ति राजन् ! आपले हे यौवन, जीवित, शरीरसौंदर्य विषयभोग वगैरे हीं सर्व क्षणभंगुर आहेत. हीं केव्हां नाश पावतील याचा नियम नाहीं. याकरितां हीं जो पर्यंत है शरीर सुदृढ आहे तो पर्यंत आपण जिनदीक्षा धारण करून आत्मकल्याण करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. तेव्हां पुत्र, भार्या, भोगोपभोग वगैरेचा मोह सोडून आपण ही जिनदीक्षा श्रहण करावी, अशी आमची प्रबळ इच्छा आहे. हा त्यांचा बोधनद उपदेश ऐकून ही त्याचे मन संसारापासून यत्किंचित् ही पराङ्मुख झाले नाहीं है पाहून पुनः ते वेषधारी मुनीश्वर आपल्या स्थानीं गेले.
पुढे एके दिवशी सुगरयकवर्ति हे आपल्या राजसमेत सिंहास-नावर विराजमान झाले होते, त्यावेळी त्यांच साठ हजार पुत्र त्यांचा सनिध येऊन विनंती करून मोठ्या आदराने म्हणू लागले कीं; हे पूज्यपाद पिताजी ! आमचे आयुष्य केवल खानपान विषयांमध्येच व्यर्थ जात आहे. तरी आतां आपण आम्हांत एकादें महत्वपूर्ण कार्य सांगावे. हे त्यांचे भाषण ऐकून ते सगरचक्रवर्ति म्हणाले, हे पुत्रांनो ! तुम्हांस सांगण्यासारखे आतां कोणते ही कार्य नाहीं. पूर्व पुण्याईनें आपणांस जी संपत्ति मिळाली आहे, तिचा तुम्ही सुखाने उपभोग घ्या. ज्यावेळी तुम्हांकडून करविण्यासारखें कार्य येईल त्यावेळीं तुम्हांस बोलावून ते कार्य करावयास सांगू. हे ऐकून ते सर्व मुकाय्याने आज्ञा शिरसाबंध मानून गेले. पण त्यांना संतोष नव्हता.
कांहीं दिवसानीं पुनः ते सर्व पुत्र आपल्या पित्याजवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाले, हे पूज्य पिताजी ! आतांपर्यंत आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणे पुष्कळ भोगापभोग भोगला. यांत पुष्कळ फाल गेला. कांहीं तरी योग्य कार्य करून दाखवावे अशी प्रबल इच्छा आहे. ” आज कोणतेही कार्य आम्हांस सांगितल्याशिवाय आम्ही भोजन करणार नाहीं. ” अशी आमची प्रतिज्ञा आहे. तरी आपण आम्हांस कोणतेही कार्य करावयास सांगावे. आग्रहाचे व निर्धाराचे भाषण ऐकून ते चक्रवर्ति म्हणाले, हे पिय पुत्रांनो ! त्या कैलास पर्वतावर पूर्वी प्रथम चक्रवर्ति श्री भरतेशांनी तीर्थकरांची सुवर्णमय जिनमंदिरे बांधवून ठेवलीं आहेत. आणि त्यांत अमूल्य रत्नमयी प्रतिमा स्थापन केल्या आहेत. पंचमकालीं अत्यंत विषयमोही लोक उत्पन्न होणार असल्याने त्यांचे संरक्षण होणे अशक्य आहे. या करितां तुम्ही तेथे जाऊन त्या पर्वता सभोवती एक मोठा खंदक तयार करून त्यांत गंगानदीचे पाणी आणून सोडा. हे ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला आणि ते त्यांना नमस्कार करून आपले आज्ञेपमाणे कार्य करितों म्हणून सांगून कैलास-पर्वतावर निघून गेले, आणि त्यांनी मोठ्या परिश्रमाने त्या चक्रवर्तिच्या हातांतील दंडरत्नाच्या साह्याने थोडक्याच अवधींत खंदक तयार केला. मग ते गंगा नदीचे पाणी आणण्यासाठी हिमवान पर्वतावर गेले. ही वार्ता आरण स्वर्गातील मणिकेतु देवास समजतांच तो तत्काळ तेथे आला. आणि त्यानें भयंकर दृष्टिविषधर सर्वरूप धारण करून मोठा विषारी फुत्कार सोडला त्यायोगार्ने ते सर्व राजपुत्र मूर्छित होऊन मृतवत् पडले. ही हकिगत प्रधान मंडळीस समजली, पण त्यानीं पुत्रमोहानें चक्रवर्तिस महान् दुःख होईल म्हणून त्यांना ती हकिगत क्ळावेली नाहीं.
तेव्हां तो मणिकेतु देव ब्राम्हण वेष धारण करून त्या चक्रव-तिच्या सभेत गेला, आणि मोठ्या दुःखाने रडत रडत त्यांस म्हणूं लागला, हे राजाधिराज ! माझा एकुलता एक पुत्र होता, तो द्रव्य मिळवून माझा उदरनिर्वाह करीत होता. पण आतां माझें दैव फुटले आहे. तो अकस्मात् मरण पावला. आतां तो मला कसा प्राप्त होईल अशी मला काळजी लागली आहे. ती आपल्याशिवाय दूर होणें अशक्य आहे. याकरितां मी आपल्या चरणीं शरण आलों आहे. तरी आपण त्याला कोणताही उपाय करावा. अशी माझी विनंती आहे. हैं त्याचे वचन ऐकून त्या चक्रवर्तीत मोठें हसूं आलें. तेव्हां तो चक्रवति त्या ब्राम्हणांस म्हणतो, हे विप्र महाराज ! तुम्ही मोठे भोळे आहात. जो मरण पावतो तो पुनः जिवंत कप्ता होईल ? काल हा केव्हां ही म्हातारा असो, तरुण वा बालक असो. निर्दय असतो. तो कोणी त्याला हिरावून नेतोच. त्याच्यापुढे कोणाचाच उपाय चालत नाहीं.आतां कांहीं दिवसांनी तुम्हांस ही तो काळ लौकरच ओढून नेणार आहे. जर आपण आपली रक्षा करून घ्यावयाची इच्छा असेल; तर तुम्ही जिनदीक्षा धारण करून आपण आपले कल्याण करून घ्यावें. हे योग्य आहे, वगैरे हे ऐकून तो ब्राम्हण म्हणतो, जर त्या काला-पासून आपली सुटका होत नाहीं तर निरुपाय आहे. असो. महाराज ! एक आवश्यक गोष्ट आपणांस सांगावयास विसरलों आहे. याकरितां आपण मजवर क्षमा करावी. ती गोष्ट ही कीं, जेव्हां भी रस्त्यांतून इकडे येत होतो तेव्हां लोक परस्परांत बोलत होते कीं; – फार वाईट झाले. महाराजांचे जे साठ हजार पुत्र कैलास पर्वतावर खंदक खणण्या-साठीं गेले होते; ते सर्व अकस्मात् मरण पावले.. है ब्राम्हणाचे वाक्य पुरे होते न होते, तोंच ते सगरचक्रवर्ति राजे एकदम मूर्छित होऊन पडले. तेव्हां सेवकांनीं शीतोपचार करून त्यांना शुद्धीवर आणिले. ही संधी पाहून त्या वेषधारी ब्राम्हणाने (मणिकेतु देवानें) त्यांना या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न होण्यासारखा धर्मोपदेश केला. त्यायोगानें त्या वेषधारी ब्राम्हणाचे इष्ट कार्य सफल झालें.
मग त्या सगरचक्रवर्तिच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां आपला भाचा भगीरथाला राज्यभार देऊन त्याने दृढधर्म केवली जवळ जाऊन निर्मथ दीक्षा घेतली. तेव्हां तो वेषधारी ब्राम्हण ( मणिकेतु देव) कैलास पर्वतावर जाऊन त्या सर्व राजपुत्रांना सचेतन करून त्यांना म्हणाला, हे राजपुत्रांनो ! तुमचे पूज्य पिते तुमची मृत्युवार्ता ऐकतांच त्यांना अत्यंत दुःख झालें. त्यामुळे ते संसा-रापासून विरक्त होऊन जिनदीक्षा घेते झाले, म्हणून मी तुमचा शोध करीत करीत येथे आलों आहे. तरी तुम्ही जलदी आपल्या नगरीं चला. हे ऐकून त्यांनाहि अतिशय दुःख झालें आणि ते त्या ब्राम्हणांस म्हणाले, – महाराज ! आम्ही आतां नगराकडे येत नाहीं. आमच्या बापानी संसारपाश सोडून जो मार्ग स्वीकारला आहे, त्याच मार्गाने
आम्ही देखील जाणार आहोत, याकरितां तुम्ही आतां नगरी जाऊन त्या भगीरथ बंधूला सांगा की, आतां आमचो काळजी करूं नका. असे म्हणून ते सर्व जन त्या दृढधर्म केवलीच्या समत्रसरणांत गेले आणि आपल्या पित्यापमाणे त्यांनी ही त्या केवली सनिध जिनदीक्षा धारण केली.
नंतर तो वेषधारी ब्राम्हणानें इकडे अयोध्यापुरी येऊन भगी-रथांस घडलेले सर्व वर्तमान सांगितलें ते ऐकून त्यांच्या मनांतडी वैराग्य उत्पल झाले. परंतु मार्गे राज्यभार वाहण्यास समर्थ कणो नतल्याने तो श्रवकवत धारण करून सदाचारार्ने वागू लागला.
पुन तो वेषधारी ब्राम्हण त्या सुगरमुनिसंघाकडे गेला. आणि आपले दिव्यरूप प्रकट करून त्यांच्या चरणीं नमस्कार करून म्हणाला, हे मुनिवर्य ! मी आपला मोठा अपराध केला आहे.
या करितां आपण सर्वांनी माझ्यावर क्षमा करावी. मी आपला सेत्रक आहे. आपणांस सन्मार्गी लावण्यासाठीं मी हा उपद्व्याप केला आहे. असे म्हणून त्यानें आयंत सर्व हकिगत त्यांना सांगितलो. हे ऐकून त्यांना मोठा संतोष झाला. आणि ते त्याला म्हणाले, हे देवराज ! क्षमा करण्यासारखा यांत तुम्ही काय अपराध केला आहे ? उलट तुम्हा आमच्यावर अतिशय उपकारच केला आहे. त्यांबद्दल तुमचेच आम्ही कृतज्ञ व्हावयास पाहिजे. मित्रस्नेहामुळे तुम्हीं जे कार्य केलें आहे, तसे करण्यास तुमच्याशिवाय कोण समर्थ आहे? तुम्ही श्रीजिनेश्वरांचे खरे भक्त आहांत बगैरे हे त्या सगरमुनीश्वरांचे वचन ऐकून स्या मणिकेतु देवास मोठा आनंद झाला. आणि तो मोठ्या मक्तीनें सर्वांना वंदना करून आपल्या ठिकाणीं निघून गेला.
तो मुनिसंघ विहार करीत करीत श्रीसम्मेदशिखरजीवर आला. तेथे ते सर्व मुनीश्वर घोरतपश्चर्येने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेले. ही वार्ता त्या भगीरथ राजांसहि समजतांच संसारत्याग करण्याची प्रबळ इच्छा झाली. तेव्हां त्याने आपला पुत्र जो वरदत्त त्याला सर्व राज्यभार दिला. आणि कैलास पर्वतावर जाऊन शिवगुप्त मुनीजवळ त्यानें दीक्षा घेतली.
तो भगीरथ मुनि विहार करीत करीत त्या नदीच्या तटांवर आला. आणि तेथे तो प्रतिनायोग, आतापनयोग बगैरे योगांनी तपश्चर्षा करूं लागला. त्या योगाने त्याला केवलज्ञन उत्पन्न झाले. हे जाणून देव तथे आले. आणि त्यांनीं क्षीरसमुद्राच्या पाण्याने त्यांच्या चर णांचा अभिषेक केला. आणि अर्चाही केली. तेव्हां त्यांच्या चरणा-भिषेकाचा जलपवाइ वाहत येऊन गंगेत मिळाला. त्यावेळीं कन्या-संक्रमण होता. तेव्हांपासून ती गंगा नदी ही तीर्थरूपाने परिणत झालो. आणि लोक त्यांत स्नान करण्यांत पुण्य समजू लागले, असो.
त्यानंतर तो भगीरथमुनि शुक्लध्यानाच्या योगाने सर्वकमीचा क्षय करून मोक्षास गेला. आणि तथै अनंतकालपर्यंत अनंत सुखाचा अनुभत्र घेऊं लागला. असो. पूर्वजन्मीं केलेल्या या व्रताच्चा पुण्यप्रभा-वानें तो सुगरचक्रवर्ति अनेक प्रकारचे राज्यैश्वर्य भोगुन क्रमाने मोक्षास गेला आहे. असा या व्रताचा महिमा आहे.