(३२९) शांतिनाथ-तीर्थंकर-चक्रवर्ति-व्रतकथा. अथवा सकलैश्वर्यभूषण व्रतकथा.
व्रतविधि-आश्विन कृ. ३० दिनीं एकभुक्ति करावी. आणि कार्तिक शुद्ध १ दिवशी या व्रतधारकांनीं सुखोष्णजलाने तैलाभ्वंग-स्नान करून अंगावर नूतनधीत वर्षे धारण करात्रीत. सर्व पूजासाहित्य घेऊन जिनालयास जात्रे, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापचशुद्धि पूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर मूतकाल-श्रीधर तीर्थंकर प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. एका पाटावर ५ स्वस्तिकें काढून त्यांवर पार्ने, अक्षता फड़े, फुळे वगेरे ठेशवे. मंडप श्रृंगारास अएदल यंत्रदल काढून त्या मध्ये मतिना स्थापून प्रथम नित्यपूजाक्रमादि करून निर्वाण सागर, महासाधु, विमलप्रभ व श्रीधर अशा या पांच तीर्थकरांचो आराधना करावी, श्रुत व गणभर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं श्रीधरतीर्थंकराय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुर्ने घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून पडार्ध करावें, व त्याने ओळीत मंदि-रास तीन पदक्षिणा घालून मंगळारती करावी. सत्पात्रांत आहारदान द्यावें. त्या दिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावे. यापमाणे हे व्रतपूजन पांव ५ वर्षे करणे उत्तम, ५ पांच महिने करणे मध्यम, पांच ५ दिवस करणे जघन्य. अगदीं एक दिवसहि करतां येते. असे हैं व्रतपूजन यथाशक्ति करून शेवटी याचे उद्यापन करावें. त्यावेळी श्रीधर तीर्थकर (भूतकाल तीर्थंकर) विधान करून महा-भिषेक करावा. चदुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. पांच मुनींना आहार देऊन आवश्यक वस्तु शास्त्रादि देणे, पांच मिथुनांस भोजन करवून जिनमंदिरांत आवश्यक उपकरणे वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. ठेवाबींत. शक्ति असल्यास नूतन जिनप्रतिमा (भूतकाल तीर्थकर प्रतिमा) निर्माण करून नूतन जिनमंदिर बांधवून त्यांत पंचकल्याण-पूर्वक तिची प्रतिष्ठा करावी. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
है व्रत पांच १ वर्षे पाळणा-यांना सर्वार्थसिद्धि प्राप्त होते. पांच ५ महिने पाळून पूजा करणाग्यांना महेंद्रकल्पांत जन्म होतो. पांच दिवस करणान्यांना सौधर्म स्वर्गात जातात. आणि एक १ दिवस पालन केल्यास उत्तम मनुष्यगति प्राप्त होते. असे व्रताचें माहात्म्य आहे.
-कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत सुरम्थ नामक एक मोठा विस्तीर्ण देश आहे. त्यामध्ये पौदनपुर नांवाचे एक अत्यंत रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी बाहुचली बंशांतील प्रजापति नांवाचा एक मोठा पराक्रमी नीतिमान् व न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. त्याला सृगावतो नांवाची जी सुशील सद्गुणी स्त्री होती, तिच्या पोटीं अपार कीतिधारक, लक्ष्मीपत्ति व विजयी असा त्रिपृष्ठ नांवाचा पुत्र जन्मला होता. हा प्रतिवासुदेव याला स्वयंमभा नामक एक अत्यंत लावण्यवती व गुणवत्ती अशी खो होती. यांना श्रीविजय व विजयभद्र या नांत्राचे दोन पुत्र व ज्योतिःप्रभा या नांवाचो एक कन्या अशी तीन अपत्ये होती.
त्या श्रीविजय राजपुत्राला सुतारी नांवाची मोठी साध्वी स्त्री होती. आणि विजयभद्र राजपुत्राला विजयावती नामक पतिव्रता स्त्री होती. या सर्व परिवरासह तो प्रजापति राजा मोठ्या आनंदांत काल-क्रम करीत असे.
एके दिवशीं राजसमेत बसले असतां अमोघजिव्ह नामक एका अष्टांगनिमित्त ज्ञानी यांने श्रीविजयराजावर होणा-या वज्रगत निवा-रण्याचा उपाय सांगितला. त्याप्रमाणे उपाय करून त्या राजानें आपल्या वर होणान्या वज्रपाताचा परिहार केला. मग पुढे सुखाने राज्य करूं लागला.
पुढें एके दिवशीं अशनिघोष नांत्राच्या एका बलाढ्य विद्याधर राजाने श्रीविजय राजाच्या सुतारी नामक राणीस हरण करून नेलें. तेव्हां अशनिघोष व श्रीविजय यांच्यामध्ये युद्ध झाले. त्यावेळीं अमिततेज विद्याधररराजाच्या साह्याने श्रीविजय राजाने त्या अशनिघोषाचा पराभव केला. मग तो भिऊन विजयजिनेश्वरांच्या समत्रसरणांत पळून गेला. त्यानंतर श्रीविजय राजा व अमिततेज तसेंच स्वयंप्रभा राजमाता व सुतारी हे ही तेथे आले होते. मग त्या फेवली मगवंतांच्या दिश्यवाणीने कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यानंतर त्या अमिततेज राजाने आपले दोन्ही हात जोडून नम्रतेने त्यां केव-लीला म्हटले. – रे जगद्गुरो ! दयानिधे ! सुतारीस हरण करून अशनिघोषानें नेण्याचे कारण काय ? हे त्यांचें वचन ऐकून ते श्रीविजय केवली जिनेश्वर म्हणाले – मलय नांवाचा एक प्रसिद्ध देश आहे. त्यांत रत्नसंचयपुर या नांवाचे एक नगर आहे. तेथे श्रीषेण नांत्राचा अत्यंत न्यायो, धर्मनिष्ठ व उद्दार असा राजा होता. त्याला सिंहनंदिता व अनिंदिता अशा दोन राण्या होत्या. दोघीही चतुर होत्या. त्यांना अनुक्रमें इंद्र व उपेंद्र असे पुत्र होते. यापमाणे तो श्रीषेण राजा मोठ्या उत्साहाने राज्यैश्वर्थ भोगीत भसतां, स्थान नगरांत सात्यकी नामक एक ब्राम्हण होता. त्याला सत्यभामा नांवाची एक सुंदर कन्या होत्री, या नगराजवळच एक खेडे होते, तेथे घरणीजट नांवाचा एक मोठा विद्वान वैदिक ब्राम्हण होता त्याला अग्रीला नांवाची एक स्त्री होती. त्यांना इंद्रभूति व अग्निभूति असे एके दिवशी त्याच्या आयुध शाळेत चक्ररत्न उत्पन्न झाले. त्रिपृष्ठ त्रिखंडाधिपति होऊन कांहीं दिवस राज्योपभोग घेतां झाला. नंतर संसारमोहाने गुरुद्रोही होऊन अधोगतीस । पहिल्या नरकांत ) गेला. पण त्याचा विजय हा भद्रपरिणामी असल्याने त्याला संसाराची विरक्ति झाली, आणि तो आपल्या मुलास राज्यभार देऊन वनांत गेला व तेथे सुवर्णकुंभ नामक मुनीजवळ दीक्षा घेतां झाला. तपश्चरणाने सर्वकर्माचा क्षय करून मोक्षास गेला.
इकडे तो श्रीविजयभद्रादि राज्यसुखाचा अनुभव घेऊ लागले. आणि ते श्रीगुरुजवळ श्रवकांची ब्रतें घेऊन पाळून सुखानें काल घालवू लागले.
दोन पुत्र होते. त्यांना कपिल नांवाचा एक दासीपुत्र होता. जेब्दां तो ब्राम्हण आपल्या दोघा मुलांस वेद शिकवीत असे, तेव्हां सो कपिल जवळच लपून बसून ते सर्व ऐकत असे. तो तीन बुद्धीचा असल्याने चारी वेद त्याचे मुखपाठ झाले. हे त्या बाक्षगास समजतांच त्याने त्याला घराबाहेर हांकलून लाविले.
मग तो कपिल ब्राह्मणवेषाने त्या रत्नसंचय नगरांत प्रवेश केला. तेथे त्या सात्यकी ब्राह्मणाच्या घरी गेला. याची विद्वत्ता, वेदावरचे प्रमुख, त्याचे ते सौंदर्य वगैरे पाहून त्या ब्राह्मणाचे मन अत्यंत संतुष्ट झाले. तेव्हां त्याने एका सुमुहूर्तावर कपिलाचे आपल्या सत्यभामा कन्बेर्शी लग्न करून दिलें. लग्म होतांच कपिलास अत्यंत आनंद झाला.
मग तेथेच श्वघुरगृहीं राहिला. श्रीषेण राजाने कपिलाचे पांडित्य पाहून त्याला आपल्या पदरीं आश्रय दिला होता.
एकदां सत्यभामा ही रजस्वला झाली होती. तेव्हां कपिल तिच्याशीं संसर्ग करूं इच्छू लागा. हा त्याचा दुराचार पाहून त्या सत्यभामेच्या मनांत ‘हा कोणीतरी विजातीय अतावा’ अशी शंका आली. मग तीनें त्याच्यावर पेन करण्याचे सोडून दिले. त्याच्या पासून ती मिन्न राहूं लागली. इतक्यांत पुढे एके दिवशीं तो धरणी-जट ब्राम्हण अतिशय दरिद्री झाल्यामुळे त्याच रत्नसंचयपुरांत सात्यकी ब्राम्हणाच्या घरी आला. तेव्हां कपिल त्याला पाहून मनांत रागावला, पण बाह्योपचाराने त्याने त्याचा मोठा सन्मान केला. आपल्या पित्याची सगळ्यांना ओळख करून दिली.
मग एके दिवशीं त्या सत्यभामेर्ने त्या धरणीजट ब्राम्हणास एकांत नेऊन कांहीं धन देऊन सर्व हकिगत विचारून घेतली, मग सत्यभामेने विचार करून ती तेथील श्रीपेण राजाकडे गेली. आणि सर्व हकिगत त्याला सांगती झाक्री. तेव्हां त्या श्रीषेण राजाने त्या सत्यभामेस आपल्या आश्रयीं ठेवून घेऊन त्या कपिलास नगरातून हांकळून काबिले.
पुढे एके दिवशी त्या शहराच्या समीप वैभारपर्वतावर बसंत-ऋतुमध्ये आपल्या सर्व परिवारासह श्रीषेण राजा क्रोडा करण्यास गेला. तेथे आदित्ययश नांशचे एक महामुनि एका झाडाखाली दिसले. राजाने पाहून त्यांच्या समीप जाऊन त्यांना वंदना केळी व आत्महिताच्या प्रश्न केला. तेव्हां त्या मुनोश्वरांनी राजा व्रते’ पालन करण्यास असमर्थ आहे, असे जाणून त्यांना दानधर्म करण्याचा उपदेश दिला. तो उपदेश ऐकून सत्यात्रदान देण्यास उत्सुक होऊन परत नगरी आला.
नंतर एकदां मासोनवासी श्रीअजितगति व आदित्यगति या नांवाचे दोषे चारणमुनीश्वर चर्येनिमित्त राजवाड्यांत आले. तेव्हां त्या राजाने यथाविधि त्यांचे प्रतिग्रहण करून आंत नेले आणि आपल्या दोन स्त्रिया यांसह आहारदान मोठ्या नवधाभक्तीने दिले. तेव्हां पंचाश्चर्य वृष्टि राजवाड्यावर झाली. ही दानक्रिया पाहून त्या सत्यभामेला मोठा संतोष झाला.
सत्पात्रदान प्रभावाने कालांतराने तो श्रीषेण राजा मरून भोग भूमींत जन्मला. अणि त्याचा दोन लिया व ती सत्यभामा यांनाहि मोगभूपीचे दिव्य सौख्य प्राप्त झाले. निदानामुळे सिंहनंदिता ही श्रीषेणची बायकोच होऊन जन्मली. व अनिंदिता ही तेथे पुरुष झाली. आणि त्याला तो सत्यभामा स्त्री होऊन जन्मली.
मग श्रीषेण आर्य त्या भोगभूमीत तीन पल्योपनकालापर्यंत सुखाचा अनुभव घेऊन सौधर्म स्वर्गात श्रीदेव नांवाचा देव झाला. तेथे त्या देवाने पांचपल्यपर्यंत श्रीजिनेश्वराची भक्ती केली. तेथील आयुष्य संपल्यावर अमिततेज या नांवाला धारण करणारा विद्याधर राजा तू झाला. सिंहनंदेनें निदान बांधले होते म्हणून आयुष्य पूर्ण झाल्यावर त्रिपिष्ठ नारायणाची कन्या ज्योतिप्रभा झाली व ती हीच तुझी पत्नी झाली. अनिंदिता देखील मरून मेहुणा श्रीविजय या नांवाने उत्पन्न झाला. सात्यकी ब्राम्हणाची मुलगी सत्यभामा दीच आतां सुतारी झालो आहे. हे राजन् । श्रोषेणाच्या सवामध्ये तूं ज्याला हांकालून दिले होता तो कपिल दासीपुत्र फार दीर्घकाल संसारांत भ्रमण करून हा भूतर-मण नांवाच्या वनांत कौशिक नांवाचा एक ऋषि राहत होता. त्याला अरुंधती नामे स्त्री होती. त्यांच्या पोटीं कपिलाचा जीव मरून मृगश्रृंग नांवाचा पुत्र झाला. तो बापाप्रमाणें जटा वाढवून पंचामितप करीत होता. शेवटी तो आयुष्यांर्ती विद्याधर होऊन जन्मावे असे निदान बांधल्यामुळे अशनिधोष विद्याधर झाला आहे.
या अशनिघोषाच्या मनांत कपिलाच्या भत्रापासून सत्यभामे विषर्थी प्रेमसंसार असल्यानेच सुतारीचे यानें हरण केले आहे.
या प्रमाणे सर्वजन आपापले पूर्वभवांतर ऐकून दीक्षा घेते झाले. कांहीं काल घोर तपश्चरण करून आप आपल्यापरी ते स्वगाँउ जाऊन जन्मले, आणि पुढे मनुष्यभत्र धारण करून क्रमाने मोक्षास गेले.
इकडे अभिततेज व श्रीविजय हे दोघे चारण मुनीश्वरांत आहा-रदान दिल्यानें त्यांच्या घरावर पंचश्चर्यदृष्टि झाली. विपुलमति व विमलप्रति या चारणमुनींना यांनी पाहिले. नंतर ते त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे दर्शन, पूजन, स्तवनादि करून त्यांच्या समीप बसले. त्यांच्या मुखे कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर मोठ्या विनयाने हात जोडून त्यांना म्हणाले, हे ज्ञानसागर मुनिवर्य ! आतां आमचे आयुष्य किती उरले आहे ? हे त्यांचे भाषण ऐकून ते मुनिराज म्हणाले, हे नृपश्रेष्ठ हो । आतां तुमचे आयुष्य अवघे ३६ छत्तीस दिवसांचे उरले आहे. हैं ऐकून आनंदानें नमस्कार करून ते आपल्या घरीं गेले. आणि आपआपल्या पुत्रांकडे राज्यभार सोपवून आपण धर्मध्यानांत काल घालवू लागले. त्यांनीं अष्टान्हिकपर्वांत
श्रीगुरुजवळ घेतलेल्या व्रताचे उत्तम रीतीने उद्यापन केलें. त्यानंतर त दोघे चंदनवनात जाऊन त्यांनीं श्रीअभिनंदन मुनीश्व-रांना प्रार्थना करून त्यांच्या जवळ दीक्षा घेतली. आणि आयुष्याच्या समाप्तिपर्यंत उपवास धारण केला.
याप्रमाणे प्रायोपवेशन करून अमिततेजानें समाधिविधीनें शरीर सोडलें आणि तो आनव स्वर्गातील नंद्यावर्त विमानांत आदित्यचूल नामें देव झाला. व श्रीविजय हा आपण अज्ञानी बनून वडिलाप्रमाणें नारायण पदवी धारक व्हावे असे निदान केल्यामुळे त्याच स्वर्गात स्वस्तिकावर्त विमानांत मणिचूल नामें देव झाला.
पूर्वमत्रांत श्रावकाचार उत्तम रीतीनें पाळल्यानें आपण या स्वर्गात उत्पन्न झालों आहोत असे या उभयतांना अवधिज्ञानाने सम-जले. त्या उभयतांनी प्रथमतः श्रीजिनेश्वराची दिव्य जरुगंधादि द्रव्यांनी पूजा केली. आणि तेथे ते दिव्यसौख्याचा अनुमत्र चिरकाल घेऊं लागले.
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेहक्षेत्रांत वत्सकावती नामे देश आहे. त्यांत प्रभाकरी नांवाची एक सुंदर नगरी आहे. तेथे स्तिमितसागर राजा राज्य करीत होता. त्याला सुंदरादेवी व अनुमतीदवी या नांवाच्या दोन स्त्रिया होत्या. त्यांना त्या आनत स्त्रर्गातील देव आदित्यचूल व मणिचूल हे आयुष्यांती च्यवून अनुक्रमें अपराजित व अनंतवीर्य या नांवाचे दोन पुत्र बलदेव व वासुदेव पदवीचे होऊन जन्मले.
कालांतराने अनंतवीर्य वासुदेव हा दुष्परिणामामुळे नरकास गेला. आणि अपराजित बलदेव हा वनांत जाऊन श्रीगुरुजवळ दिगंबर दीक्षा घेता झाला. व तपश्चरणानें सोळाव्या अच्युत स्वर्गात मोठा ऋद्धिधारक प्रतोंद्र देव झाला. पूर्वी केलेल्या व्रताच्या पुण्यबलानें तेथे तो पुष्कळ काल सुख भोगून आयुष्यांती तेथून च्यवून रत्नसंचय-पुरांतील क्षेमंकर राजाचा वज्रायुध नांवाचा पुत्र झाका, आणि तेथे पुष्कळ दिवस चक्रवर्तिचे ऐश्वर्य भोगून अनेक दानवूशादि क्रिया करून शेवटी दीक्षा घेऊन समाधिने मरण पावून नव्या मोकांत अनिंद्र देव झाला. तेथे स्वर्गीय सुख भोगोत राहिला.
तेथील आयुष्य पूर्ण झाल्यावर तो देव-या जंबूद्वीपांतीक पूर्व विदेहक्षेत्रांत पुष्कलावतो नांवाचा देश असून स्थांत पुंड ोकियो नांवाचे एक शोभिवंत नगर आहे. तेथे धनरय नांवाचा राजा मनोहरी नाये राणोषई राज्य करीत होता. त्यांना तो नेपाथ नामे पुत्र शाका. पुढे हा मेघरथ राज्यवैभव भोगून भक्तीने दानपूजादि क्रिया करता झाला. त्यामुळे त्याच्या राज्यवाड्यावर पंचाश्वर्य वृष्टी झाली. कांहीं कालानंतर हा मेघरथ हा श्री घनरथ तीर्थकराजवळ दीक्षा घेतां झाला. याने घोर ताश्वर्थ केली. सोळा भावनांचे चिंतन केले. त्यामुळे तो प्रायोपवेशनानें समाधि साधून सर्वार्थसिद्धींत महेंद्र नांवाचा अइमिंद्र झाला. तेथे तेहतीस सागर वर्षे पर्यंत दिव्य सुख अनुभर्भू लागला.
त्या सत्रार्थसिद्धींतील त्या महेंद्र देवाचे आयुष्य पूर्ण झाल्यावर तो देव – या जंबूद्वीपांतील भरदक्षेत्रामध्ये कुरुजांगल नांगराचा एक मोठा रमणोत्र देश आहे. त्यांत हस्तिनापुर नामक एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी विश्वसेन नांवाचा एक मोठा पराक्रमी, रूपवान् व धर्मिष्ठ अप्ता राजा राज्य करीत होता. त्याला ऐरादेवी नांवाचो एक अत्यंत सौंदर्यवतो, युगवतो अशी स्त्री होती. यांच्या पोटीं शांतिनाथ नामे तीर्थकर होऊन जन्मला. बाल्यावस्थेनंतर क्रमाने युवावस्थेत अनेक प्रका रचे राज्यैश्वर्य भोगून कामदेव व चक्रवर्ति पदाचा ही उपभोग घेतो झाला. पुढे त्यांच्या मनांत त्या भोगापासून संसाराविषयी। वरक्ती उत्पल झाल्यानें दीक्षा घेऊन घोर तपश्चरण करतां झाला. तपप्रभावाने घाती-कर्माचा क्षय झाल्यानें त्याला केवलज्ञान उत्पन्न झालें. मग त्यांनी देशो देशी विद्वार करून अनंत भव्पास्मांना धर्मोपदेश देऊन त्यांचा उद्धार केला. आणि ते सम्मेदशिखरजीवर जाऊन अंतिमयोग धारण करून अघातिकर्माचा क्षय करून मोक्षास गेले. तेव्हां यांच्या गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान व मोक्ष या पांच प्रसंगी चनुर्णिकायदेवानीं येऊन पंच-कल्याणाचा महामहोत्सव केला आहे.