व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या तीन आष्टान्हिक पर्वात १० दिवशी या व्रतधारकांनी प्रभातीं अभ्यंगस्नान करून अंगा- वर दृढधौत वस्खें धारण करावीत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिना- लयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियां- पूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पार्श्व- नाथ तीर्थकर प्रतिमा धरणेंद्र यक्ष पद्मावती यक्षीसह स्थापून त्यांस पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी आणि ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. देवापुढें एका पाटावर आठ स्वस्तिकें काढून त्यांवर पानें, अक्षता, फुलें फलें, (सुपाऱ्या) केळीं भिजावलेलें हरभरे पुंज, घालून पंचप- कान्नांचे चरु करावेत. देवास पुष्पांची माळ अर्पण करावी. आणि ॐन्ही श्रीं क्लीं ऐं अई श्रीपार्श्वनाथतीर्थकराय धरणेंद्रयक्ष पद्मावतीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें
घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून मंगलारती करावी. शक्तीप्रमाणें उपवास अगर एकमुक्ति करून ब्रम्हचर्य पाळावें. सत्पात्रांस आहारादि दानें बाबींत. याच क्रमाने पक्षांतून एकदां त्याच तिथीस सर्व पूजाक्रम करावा. याप्रमाणे चार महिने पूर्ण झाळेवर पुढे येणाऱ्या नंदीश्वर पर्वात पौर्णिमेस याचे उद्यापन करावें. त्यावेळीं नूतन पार्श्वनाथ प्रतिमा आणवून तिची प्रतिष्ठा पंचकल्याणपूर्वक करावी, अथवा पार्श्वनाथविधान करून महाभिषेक करावा. पोळ्या, करंज्या, घारग्या, लडग्या, चकली, थाळी- पिठें, कोडबुळे, हे पदार्थ प्रत्येकी ५० लावून चोवीस चरु अर्पावेत. नंतर एका पात्रांत-प्रत्येकी ५४ चोपन्न पार्ने, गंधाक्षता, फुले, फळे, सुपाऱ्या, चरु, एक सुवर्ण पुष्प व एक सुवर्ण सुपारी लावून नारळ एक ठेवून महार्घ्य करून ॐ हीं परमकल्याणपरंपराधारणाय नमः स्वाहा ।। हा मंत्र म्हणत ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. पार्ने, सुपाऱ्या, गंधाक्षता, नारळ, यज्ञोपवीत, पैसे, फुलें, चरु, हे पदार्थ घालून पांच वायर्ने तयार करून त्यांतून पार्श्वनाथ, श्रुत, गुरु, पद्मावती यांच्यापुढें एकेक ठेवून नमस्कार करून आपण एक घ्यावें. घरी सत्पात्रांस आहारादि दानें देऊन आपण पारणा करावी. दीन, अनाथ वगैरे याचक लोकांना आवश्यक वस्तु देऊन तृप्त करावें. असा या व्रताचा पूर्ण विधी आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत आर्याखंड आहे. त्यांत क्षोणी- भूषण नांवाचा एक मोठा देश आहे. त्यामध्यें भूतिलक नामें एक मनोहर पट्टण आहे. तेथें पूर्वी घर्मपाल नामक एक पराक्रमी, नीतिमान्, धर्मनिष्ठ, गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला घर्मपालिनी नाम्न्नी धर्मशील साध्वी, गुणी, रूपवती अशी धर्मपत्नि होती. ही दंपती
सुखानें कालक्रमण करीत असतां, एके दिवशी या नगराध्या बहिरु- द्यानांत भद्रसागर नामक दिव्यज्ञानी मुनींद्र येऊन उतरले. ही वार्ता तेथील वनपालकांकडून राजांस कळतांच तो आपले परिजन व पुरजन यांच्याशीसह वर्तमान पादमार्गे त्याच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्यांना तीन प्रदक्षिणा घालून भक्तीनें त्यांची पूजा वंदनादि करून धर्मो- पदेश ऐकत बसला. उपदेश ऐकल्यानंतर धर्मपालिनी राणी आपलें दोन्ही हात जोडून विनयानें मुनींद्रास म्हणाली, हे संसारसागरतारक महागुरो ! आज आम्हांस उत्तम सुखाला कारण असे एकादें व्रतविधान सांगावें. हे तिचें नम्र वचन ऐकून ते मुनींद्र म्हणाले, हे धर्मशील कन्ये! आतां तुम्हांत ‘कल्याणमाला’ हे व्रत पालन करण्यास अतिशय योग्य आहे. कारण हें व्रत जे भव्य स्त्रीपुरुष यथाविधी पालन करतात त्यांना त्या पुण्याने व माहात्म्याने अनेक भोगोपभोगांचें ऐश्वर्य प्राप्त होऊन क्रमानें पंचकल्याणभागी होतात व मोक्षास जातात. असे म्हणून त्यांनी या व्रताचा सर्वविधी सांगितला. हे ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला. नंतर राजा व राणी यांनी त्यांच्या जवळ प्रार्थना करून हें व्रत स्वीकारिलें. नंतर सर्वांनी त्या मुनींद्रांस भक्तीनें नमस्कार करून आपल्या नगरी प्रवेश केला.
पुढें समयानुसार तो धर्मपाल व ती धर्मपालिनी यानी हें व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केलें. या व्रतप्रभावानें ते दोघे स्वर्गास गेले. नंतर ते पुनः मनुष्य जन्म पावून जिनदीक्षा धारण करून तपानें सर्वकर्मक्षय करून मोक्षास गेले.