व्रतविधि- आश्विन कृष्ण १३ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. आणि चतुर्दशीच्या दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतन घौतवर्षे धारण करावीत. मग सर्व पूजाद्रव्यें आपल्या हातीं घेऊन जिनालयास गमन करावे, तेथे गेल्या-वर तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापणशुद्धि कौरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणाम करावा. मंडप शृंगारून वरती चंद्रोपक बांधावे. देवापुढे शुद्ध भूपीवर अष्टदल कमल काढून त्यासभोंवती पंच-मंडळे काढावीत. आठ कुंभ मांडून त्यांना वस्त्र व पंचवर्णी सूत गुंडाळावे. अष्टमंगलद्रव्ये ठेवावीत. मध्यंतरी एक सुशोभित कुंभ ठेवावा. त्यांवर एक ताट ठेवून त्यांत यंत्र काढून चोवीस पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये ठेवावीत. श्रीपीठावर चौवीसतोर्थंकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनों अभिषेक करावा. मग ती प्रतिमा यंत्रामध्ये स्थापून नित्य-पूजाक्रम केल्यानंतर चतुर्विंशति तीर्थंकराराधना करावी. चोवोस नैवद्ये अर्पावीत. ॐ हीं अर्हं वृषभादिवर्धमानांत चतुर्विंशति तीर्थंकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रार्ने १०८ पुष्र्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून तीर्थकर चरित्रे वाचावींत. ही व्रत कथाहि वाचावो. श्रुत, गुरु यांचो पूजा करावी. यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे ते अर्चन करावें. मग एका ताटांत २४ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये मांडून एक ‘नारळ ठेवून महार्घ्य करावा आणि त्याने ओवाळोत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं जिन-पूजा, सत्पात्रदान करून पारणें करावें.
या प्रमाणे हे व्रत २४ महिने त्याच तिथीत केल्यावर शेवटीं कार्तिक अष्टान्धिकांत त्याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीसम्मेदशिखरजी विधान करावे. महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत.
२४ मंदिरांचे दर्शन करावें. असा याव्रताचा पूर्ण विधि आहे.
हैं व्रत पूर्वी पालन केल्यामुळे ज्यांना उत्तम गति प्राप्त झाली आहे त्यांची कथा सांगतों. ऐका, –
-कथा-
या तुमच्या राजगृह नगरामध्ये अर्हदास नांवाचा एक राजश्रेष्ठो राडत आहे. त्याला गंगावती नामक एक सुशोल, सदाचारी धर्मपत्नि आहे. त्यांच्या पोटीं स्वर्गातून देव जन्प घेऊन जंबुकुमार नामें प्रसिद्ध होईल. तो कामदेव पदवी प्राप्त करून घेऊन शेवटी जिनदीक्षा बेईल. आणि तपार्ने कर्माची निर्जरा करून केवळञ्चानी होऊन मोक्षास जाईल. बार्ने पूर्वमत्रीं है बत केले होते म्हणून त्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त होऊन निर्वाणपदट्टी प्राप्त होणार आहे.