व्रतविधी – श्रावण शु. १३ दिवशीं प्रातःकाळी या व्रतधार- कांनीं शुचिजळें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौत वर्षे घ्यावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन चैत्यालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा
देऊन ईर्यापथ शुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मग पीठावर पार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा धरणेंद्र यक्ष व पद्मावतीयक्षीसह स्थापून त्यांची पंचामृतांनीं अभिषेक करून अष्टद्र- व्यांनी अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं श्रीं क्लीं ऐ अई श्रीपार्श्वनाथ तीर्थकराय धरणेंद्रपद्मावतीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें बालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एक महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशी ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करावा अथत्रा फलाहाराच्या नियम करावा. अगर एकमुक्ति आपल्या शक्तिप्रमाणे करावें.
त्याच दिवशी रात्रीं-या व्रतिकांनीं शुचिर्भूत होऊन मंदिरास जावें. मंडप श्रृंगार करून भूमीवर पंचवर्णानीं अष्टदल कमळाचे यंत्र काढावें. त्यामध्यें सुशोभित कुंभ स्थापावा. एका पात्रांत अष्टगंधानें पार्श्वनाथ यंत्र लिहून ते कुंभावर ठेवून त्यांत पार्श्वनाथ प्रतिमा बस- वावी. प्रारंभी सर्व नित्यपूजाक्रम करून शेवटीं पार्श्वनाथविधान करावे. ( पार्श्वनाथ पूजा पृथक ९ वेळां होते.) ॐ हीं अंई अर्हत्सिद्धाचा- र्योपाध्यायसर्वसाधुजिनधर्मजिनागमजिनचैत्यजिन चैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. तसेंच पूर्वोक्त पुष्प जाप्य मंत्राने १०८ फुळे घालावीत. नंतर महार्घ्य करून ओवाळीत मंदिरात तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. शास्त्रस्वाध्यायादि धर्मध्यानांत रात्र घालवावी. प्रातः काळी जिनेश्वरांस अभिषेक करून चतुःसंघास चतुर्विध दानें द्यावीत. नंतर आपण पारणें करावें.
या क्रमाने हैं व्रत ९ वर्षे करून शेवटीं यांचे उद्यापन कसवें. त्यावेळीं नूतन प्रतिमा पार्श्वनाथ-धरणेंद्र-पद्मावतीसह करवून पंचकल्याणविधिपूर्वक तिची प्रतिष्ठा करावी. मंदिरांत आवश्यक उपक
रणे ठेवावीत. नऊ ऋषीसमुदायांस आहारंदान देऊन आवश्यक वस्तु द्याव्यात. तसेंच आर्थिकांनाहि आहार, वन, पुस्तकें, जपमाळादि वस्तू, पाव्यात. असा या व्रताचा पूर्णविधी आहे.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रामध्ये आर्याखंड आहे. त्यांत हस्ति- नापुर नामक रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी मेघरथ या नांवाचा एक नीतिमान्, धार्मिक असा राजा आपल्या पद्मावती नामक सुशील, रूपवती, धर्मपत्निसह राज्य करीत असे. त्यांना विष्णुकुमार व पद्मरथ असे दोन पुत्र होते. हे दोघे पराक्रमी, गुणवान् चाणाक्ष होते. हे सर्व जन सुखानें कालक्रमण करीत असतां, एके दिवशी या नगराध्या बहिरुधानांतील सहस्रकूट चैत्यालयाची वंदना करण्यासाठी सम्य- क्त्वादि अनेक सद्गुणांनी विभूषित, नवविध ब्रम्हचर्यान्वित, त्रयोदश चारित्रांकित व मूलोत्तरगुणसंपन्न असे श्रीसुग्रीव नामक महामुनि आपल्या संघासह येऊन उतरले. ही शुभवार्ता राजांस कळविण्यासाठी तेथील रक्षक फल, पुष्पें घेऊन राजसभेत आला; व ती राजापुढे ठेवून नमस्कार करून म्हणाला, अहो राजाधिराज ! आपल्या भाग्योदयानें सहस्रकूट चैत्यालयाच्या उद्यानांत महर्षि आपल्या संवासह आले आहेत. त्यांच्या आगमनानें तेथील सर्व वृक्षांस फल-पुष्पांचा बहार आला आहे. हे ऐकून राजा अतिशय आनंदित होऊन ज्या दिशेस महामुनि आले होते, त्या दिशेस सप्त पाऊलें चालून भक्तीने त्यांना वंदना करिता झाला. आणि अंगावरील वस्त्रालंकार त्या वनपालकांस देता झाला. नगरांत मुनि आगमनाची आनंदमेरी देववून तो आपल्या सर्व परिजन व पुरजन यांसह पादमार्गे वंदनार्थ उद्यानाकडे गेला. नंतर मुनिसंघात मक्तीनें तीन प्रदक्षिणा घालून मोठ्या विनयानें प्रणिपात करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांही वेळ त्यांच्या मुखें धर्मश्रवण केल्यानंतर राजा आपले दोन्ही हात
जोडून नम्रतेनें म्हणाला, भो ! सर्वजनहितकारक स्वामिन् ! आपण आम्हांस सर्व सुखाला कारण असें एकादें व्रतविधान सांगावे. हे त्यांचे विनयपूर्ण वचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले, हे मव्योत्तम राजन् ! उपसर्गनिवारणत्रत हे तुम्हांस करण्यास अत्यंत उचित आहे. हे व्रत जे भव्यजीव यथाविधि पालन करितात, त्यांचे सर्व उपसर्ग निवारण होतात; व ते दुसऱ्यांचेहि उपसर्ग निवारण करण्यास समर्थ होतात. आणि शेवटीं सद्गती मिळवितात. असा या व्रताचा प्रभाव आहे. असे म्हणून त्यांनी त्यांना या व्रताचा काल व विधी सांगितला. तें ऐकून सर्वाना अत्यंत झाला. मग मेघरथ राजा व त्यांचा कनिष्ठ पुत्र विष्णुकुमार यांनी हे व्रत त्यांचे (सुग्रीवमुनि) चरणीं नमस्कार करून घेतलें. नंतर सर्वजन त्या मुनिगणास नमस्कार करून आपल्या नगरी परत आले.
पुढें कालानुसार त्यांनी हें व्रत यथासांग पाळून त्याचें। उद्यापन केलें. मग त्यांच्या मनांत कांहीं निमित्तानें वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे ते वनांत जाऊन श्रुतसागर गुरूसमीप निग्रंथदीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करूं लागले. पूर्वी केलेल्या व्रताचा व तपाच्या प्रभावानें त्या विष्णु- कुमार मुनीश्वरांस वैक्रियकऋद्धि प्राप्त झाली. असो.
प्रिय वाचक हो ! अवंती देशांतील उज्जयिनी नगरामध्ये धर्म- निष्ठ श्रीवर्मा राजा आपल्या श्रीमती राणीसह राज्य करीत होता. त्या राजाचे बळी, बृहस्पती, प्रल्हाद, व नमुचि असे चार मंत्री होते. ते चौघेहि फारच मिध्यादृष्टी होते. अशा प्रधानांनी युक्त असा तो राजा चंदनवृक्षासमान होता. अशा प्रकारें राज्य करीत असतां, – एकदां तेथें अकंपनाचार्य नामक महामुनी आपल्या सातरों ७०० मुनिसंघासह नगराच्या उद्यानांत येऊन उतरले. तेव्हां ते आपल्या निमित्त ज्ञानाने त्या नगराची अवस्था हानिकारक आहे, असें जाणून आपल्या संघास त्यांनीं असें सांगितलें कीं; तुम्ही या नगरांतील कोणत्याहि
मनुष्याबरोबर वाद-विवाद करूं नये. नाहीं तर संघावर मोठी आपत्ति येण्याचा संभव आहे. याप्रमाणे गुरूची आज्ञा ऐकून सर्व मुनी मौन धरून बसले; पण त्यावेळी त्यांतील एक श्रुतसागर नामक मुनी आहारानिमित्त नगरांत गेल्यामुळे त्यांना गुर्वाज्ञा माहीत नव्हती. मुनिसंघ आल्याची वार्ता नगरांत कळतांच श्रीवर्मा राजा आपले
मंत्री व इतर परिवारजनांसह मुनिदर्शनास गेला. राजानें मोठ्या श्रद्धेने तीन प्रदक्षिणा त्यांना घाढून नमस्कार केला, पण सर्व मुनीश्वरांनीं गुर्वा- ज्ञेप्रमाणें मौन स्वीकारल्यामुळे त्यांना ” सद्धर्मवृद्धिरस्तु ” असा आशिर्वाद कोणीहि दिला नाहीं. मुनीश्वर ध्यानांत निमग्न आहेत असें जाणून राजा नगरी परत निघाला. मार्गात मंत्री म्हणू लागले कीं; – हे सर्व मुनी मूर्ख आहेत. म्हणून ते ‘ आपटी मूर्खता छपविण्यासाठी’ मौन धरून बसले आहेत. वगैरे प्रकारांनी त्यांनी मुनींची व धर्माची निंदा केली. इतक्यांत नगरांतून आहार करून संघाकडे परत येत असलेले श्रुतसागर हे महाराज त्यांच्या दृष्टीं पडले. त्यांना पाहून मंत्री राजास म्हाणाले, – महाराज ! हा पहा ! ढोंगी साधु बैलासमान पोट भरून येत आहे, वगैरे तिरस्कार करून बोलले. मग मुनीश्वर हे सर्व भाषण ऐकून त्यांना म्हणाले, – अहो ! तुम्ही आपल्या ज्ञानाची अशी व्यर्थ प्रौढी मिखूं नका, तुम्ही माझ्याशीं शास्त्रार्थ करा, म्हणजे तुम्हांस यथार्थ निश्वय होईल कीं, कोण बैल आहे.? मग मंत्री व मुनीश्वर यांच्यांत मोठा वाद-विवाद झाला. त्यांत मुनींनी मंत्रीचा पराभव करूनः स्याद्वादाची महिमा प्रकट केली. नंतर इताश होऊन सर्वजन नगरी गेले. मंत्रींच्या मनांत द्वेष तीव्र शल्याप्रमाणें सकूं लागला.
१०० इकडे श्रुतसागर मुनीनीं आपल्या गुरूजवळ येऊन मार्गात घढ- बेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हां आचार्य महाराजांनी हा समाचार ऐकून खेद प्रकट केला. आणि ते म्हणाले, हाय ! हाय ! सर्व नाश ! तूं आपल्या संघावर कुठाराचा आघात केळास. आतां आमच्या
कल्याणाचा हा एवढाच मार्ग आहे कीं; ” ज्या ठिकाणी शास्त्रार्थ झाला आहे, तेथे जाऊन कायोत्सर्ग ध्यान धर व सर्व संघाचे संरक्षण कर, ” ” मग तत्काळ ते मुनि गुर्वाज्ञेप्रमाणे तेथे जाऊन ध्यानस्थ राहिले.
तिकडे चौघेहि मंत्री त्या दिवशी रात्रीं मुनींचा प्राण घेण्याच्या विचाराने निघाले. इतक्यांत मार्गातच तो मुनी ध्यानस्थ दिसला. मग चौघांनी मुनींचे शिर छाटण्यासाठीं एकदम मानेवर तलवारी उगारल्या तोंच तेथे नगरदेवता येऊन त्यांनीं त्यांचे हात जेथल्या तेथेच खिळले. त्यांच्या दुष्टपणाचे शासन त्यांना मिळाले. प्रातःकाळी ही बातमी नगरांत कळतांच नगरांतील लोक राजासह येऊन एकस्वरांत मंत्र्यांची ही दुष्ट कृती प्रत्यक्ष पाहून त्यांचा धिक्कार करूं लागले. केव्हांही जे पापीलोक निरपराधी साधुजनांशी द्वेष व विरोध करतात; ते नरकांत असह्य दुःख भोगतात.
आपल्या प्रधानांची दुष्टबुद्धि प्रकार पाहून राजानेंहि त्यांचा अतिशय धिक्कार केला. नंतर तो म्हणाला कीं;” हे पापिष्ठांनों ! तुमची दुष्टकृति मला चांगली आठवतोंच, तुम्हीं माझ्या पुढे सर्व जगावर उपकार करणाऱ्या मुनीश्वरांची निंदा केली. परंतु आज तुम्ही निर्दोष मुनीश्वरांना ठार मारण्यास उद्यत झाला. तुम्ही अत्यंत दुष्ट आहात. तुमच्या सारख्या दुर्जनांचे मुख पाहणें पाप आहे. तुम्हाला प्राणांत शिक्षा देणे योग्य आहे. परंतु तुम्ही ब्राम्हण आहात, शिवाय तुमचे वाडवडील मंत्रीपद स्वीकारीत आले आहेत. यांसाठीं तुम्हांला प्राणांत शिक्षा न देतां आमच्या राज्यांतून हद्दपार करणें योग्य आहे. ” मग राजानें आपल्या सेवकांस अशी आज्ञा केली कीं; चौघांना गाढवावर बसवून राज्यसीमेच्या बाहेर हाकलून द्या. नंतर तत्काळ सेवकांनीं राजाज्ञेप्रमाणे मंत्र्यांना गर्दभारोहण करून धींड काढून राज्याबाहेर हाकलून दिलें. सत्य आहे कीं; – पापी लोकांना या प्रमाणे दंड मिळणें अगदीं योग्य आहे. त्यावेळीं हा जिनधर्माचा अपूर्व चमत्कार व महिमा
पाहून सर्व छोकांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. त्यामुळे आनंदाच्या भरांत एकमुखें सर्वजन जयजयकार करूं लागले, अशा रीतीने आपल्या सर्व मुनीश्वरांवरील घोरसंकट टळल्यानें सर्वांना शांति बाटू लागली. मग तेथून त्यांचा संघ दुसरीकडे निघून गेला. असो.
हस्तिनापुरांत पद्मरथ राजा राज्य करीत होता. त्याला कुंभपूर नगरीचा बलाढ्य राजा सिंहबाहू हा उपद्रव करीत होता. त्यामुळे राज्यांत सदा अशांतता पसरली होती. सिंहबाहूच्या ताब्यांत एक मजबूत किल्ला होता. तेथे जाऊन तोछपून राहत होता त्यामुळे शत्रूचे त्याच्यावर कांही चालत नसे. मात्र पद्मरथ राजा सतत चिंताक्रांत असे. हा उप- द्रव कसा शांत होईल ? या विचारांत अहर्निश गढून गेला होता, अशा प्रसंगी ते उज्जयिनी नगराडून निघालेले चौघे मंत्री हस्तिनापुरीं येऊन पोंचले. ते मंत्री राजाचा कष्टप्रद प्रसंग ऐकून त्या पद्मरथास जाऊन भेटले. सर्व समाचार त्यांनी ऐकून घेतला. आणि आपला प्रसंग आम्ही नाहींसा करतों’ असे बोलून सर्व सैन्य घेऊन त्या सिंह- बाहूवर आक्रमण केलें; व युद्धांत त्याचा पराभव करून त्याला पकडून पद्मरथाच्या दरबारांत हजर केलें. तेव्हां राजा मंत्र्यांची वरिता तथा चलाखी पाहून प्रसन्न झाला, आणि म्हणाला, ‘ तुम्हांस काय पाहिजे तें मागा.’ तेव्हां मंत्री म्हणाले, हा वर तुमच्या भांडारांत असू द्या. पाहिजे त्यावेळी आम्ही मागून घेऊ. बरें आहे. असें म्हणून राजानें त्यांना मंत्रीपद देऊन आपल्या पदरीं ठेवून घेतलें. अशा रीतीनें पद्मरय राजा शांतीनें व निश्चितपणे राज्य करूं लागला.
पुढें कांही दिवसांनी ते अकंपनाचार्य आपल्या ७०० मुनीसं- घांसह विहार करीत करीत हस्तिनापूरच्या उद्यानवनांत येऊन उतरले. ही वार्ता नगरांत कळली. तेव्हां नगरांतील लोक दर्शनास जाऊं लागले. त्यासमयीं ते सर्व राजमंत्री क्रोधित होऊन त्यांचा सूड घेण्याचा विचार करूं लागले. त्यांपैकी एकानें म्हटलें, आतां ही संधी दवडूं नये.
त्यांनी आमचा अनेक प्रकारें छळ व अपमान केला आहे. त्यांचा पूण-
पूर्ण सूड उगवून घेतला पाहिजे. दुसरा म्हणाला, राजा त्यांचा पूर्ण भक्त आहे. मग आमची इच्छा कशी सफल होणार? इतक्यांत बळी प्रसन्न चित्ताने म्हणाला, त्याबद्दल तुम्ही कां काळजी करतां ? राजाने पूर्वी आम्हांस एक वर दिला आहे. तो वर आतां आम्ही निःशंकपणे मागून घेऊ. ” सात दिवसांचे राज्यच आम्ही मागून घेऊं म्हणजे आमची सर्व इच्छा अवश्य सफल होईल”. मग बळी मंत्री राजाजवळ जाऊन म्हणाला, हे दीनबंधु राजन् ! आतां आपण आपले वचन पालन करण्यास इच्छित असाल तर कृपा करून ‘सात दिवसांचे राज्य’ अर्थात् ‘सात दिवस हां राज्याधिकार आमच्या स्वाधीन पूर्णपणे करावा.’ अशी आमची प्रबल इच्छा आहे. तेव्हां राजा आश्चर्यचकित होऊन मोठ्या विचारांत पडला. परंतु त्यांचा मायाचार कळला नाहीं. शेवटीं निरुपाय होऊन राजानें पूर्वोक्त बचनाप्रमाणें बलीस ‘सात दिवसांचा राज्याधिकार दिला.’ त्यावेळी बळीस अपरिमित आनंद झाला. आपल्या विषयी कोणाच्याहि मनांत शंका येऊ नये, आणि आपला इष्ट हेतू कोणांस कळू नये, म्हणून एक महायज्ञ करण्याचा निश्वय बळी राजानें जाहीर केला. यज्ञमंडप तयार करून त्याच्यामध्ये मोठा यज्ञ कुंड तयार करविला. मंडपासभोवती खंदक खणवून त्यांत पूर्ण इंधन भरून ठेवलें. यज्ञमंडपांत मुनिसंघांस आणून बसविले. नंतर वेदोक्त ऋच्या मंत्रानें पशुंचे बलिदान देऊं लागले. त्यामुळे चोहोंकडे असह्य दुर्गंध सुटला. दुर्गंधित धूमानें आकाश व्यापून गेले. हें महापाप पाडूं नये म्हणूनच की काय सूर्य अस्तास गेला. त्यावेळीं सर्व मुनीश्वर भयं- कर घोरोपसर्ग मोठ्या शांतवृत्तीनें सहन करूं लागले. मेरूपर्वताप्रमाणें ते निश्चल आसनीं बसून आत्मध्यानांत निमग्न झाले. आपल्या कर्माचा हूँ। उदय आहे. असे समजून आपलें अंतःकरण दृढ केलें. खरें आहे. खरे जैन साधु अत्यंत भयंकर असे कष्टहि सहज रीर्तानें सहन कर-
तात. मग असल्या या कष्टांचा त्यांच्यापुढे काय पाड ! ते मोठ्या धैर्यानें सर्व कष्ट सहन करूं लागले. तिकडे मिथिलापूर नगर।मध्ये श्रुतसागर मुनीश्वर आपल्या
निमित्तज्ञानानें ७०० सातरों मुनीश्वरावर अकस्मात् उपस्थित झालेला घोरोपसर्ग जाणून त्यांच्या मुखांतून हाय! हाय ! मुनीश्वरांना किती कष्टप्रद उपसर्ग ! असा दुःखाचा उद्गार निघाला. तेव्हां तेथे त्यांच्या सन्निध असलेले त्यांचे शिष्य क्षुल्लक पुष्पदंत गुरूंस म्हणाले, अहो गुरुराज ! कोणत्या ठिकाणीं मुनीश्वरांस उपसर्ग होत आहे ? मग महाराज म्हणाले, ” हस्तिनापुरांत अकंपनाचार्याच्या सातशे मुनी- श्वरांना दुष्ट बलि राजा घोर उपसर्ग करीत आहे !” तेव्हां क्षुल्लक म्हणाला, हे देव ! त्या मुनीश्वरांत्ररील उपसर्ग दूर होण्यास आतां कोणता उपाय आहे ? मुनिराज म्हणतात की, ‘हां ! तो उपसर्ग दूर होण्यास आतां हा एकच प्रबल उपाय आहे. सांप्रत श्रीविष्णुकुमार मुनींस विक्रियाऋद्धि प्राप्त झाली आहे. तिच्या योगाने ते तो उपसर्ग सहजी निवारण करूं शकतील.’ हे गुरुवचन ऐकून त्यांच्या आज्ञेनें ते क्षु. पुष्पदंत विष्णुकुमार मुनिसन्निध गेला. मुनीश्वरांस होत असलेल्या उपसर्गाबद्दल वार्ता त्यानें त्यांना श्रुत केली. तेव्हां विष्णुकुमार मुनीनीं आपणांस ऋद्धि प्राप्त झाली आहे की कसे ? हे पाहण्यासाठीं आपला हात वर लांब केला. ऋद्धि प्राप्त झाली आहे असा विश्वास पटतांच तत्क्षणीं निघून ते हस्तिनापुरास आले. आपले थोरले बंधु पद्मरथ राजे यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाले, ” हे प्रियबंधो ! हे काय आरंभिले आहे ? हाय ! हाय ! आपण जैनधर्मी आहोत. आपल्या सारख्या धर्मात्म्यापुढें असला निंद्य अनाचार होणे योग्य आहे काय ? असला अत्याचार आजपर्यंत आपल्या कुलांत केव्हां झाला होतां काय ? आपल्या सद्गुरूंवर असें घोर संकट आल्यानें आपल्यावरही संकट येण्याचा संभव आहे. साधु जनांचे संरक्षण करणे आणि दुर्जनांस शासन
देणें हें आपले मुख्य कर्तव्य आहे. या अत्याचारास आपण निरोध केला पाहिजे. नाहीं तर आपणांस भयंकर दुःखें सहन करावी लागतील. ” इत्यादि महत्वपूर्ण शिक्षायुक्त परिणामकारक सदुपदेश ऐकून तो पद्मरथ राजा नम्रतेनें म्हणतो, असा घोर प्रसंग येईल म्हणून मला समजलें नाहीं. मी त्यांच्या वरवचनांत सांपडलो होतो, म्हणून त्यांच्या मागणी प्रमाणें त्यांना सात दिवस राज्यांधिकार दिला आहे. या साठीं आतां आपणच याला कांहीं तरी उपाय करावा. आपण हरतहेर्ने नानाविध युक्तीनें हे संकट दूर करण्यास समर्थ आहात. हे ऐकून ते विष्णुकुमार वामन ब्राम्हणाचा वेष धारण करून वेद-मंत्र उच्चार करीत बलीच्या यज्ञ मंडपांत गेले. तेव्हां तेथें जितके लोक उपस्थित होते, ते सर्व ही नूतन आगत ब्राम्हणाचे वेदमंत्र ऐकून मुग्ध झाले. बलीच्या आनंदास पारावर नव्हतां. बली विव्हल होऊन त्यांस म्हणाला, – हे ब्राम्हण श्रेष्ठ हो ! मी आपल्या शुभागमनाचे स्वागत करितो. आपण या यज्ञमंडपांत येऊन आमच्यावर मोठी कृपा केली. आज मी आपणांस पाहून अत्यंत प्रसन्न झालों आहे. यावेळीं आपणांस जें इष्ट असेल तें. मागा . मी आनंदानें देण्यास समर्थ आहे.
बलीचें हें वचन ऐकतांच विष्णुकुमार मुनींनीं आश्चर्य व्यक्त करण्यासाठीं गोष्ट सांगितली. हे दयालु राजन् ! मी गरीबांडून अत्यंत गरीब असा आहे. त्यामुळे मला आपली धनसंपत्ति नको. माझी गरीबी मजजवळ असो. आपल्या वचनाप्रमाणें कांहीं न मागतां राहणे योग्य वाटत नाहीं. या करितां आतां आपल्याजवळ एवढेच मागतों कीं, मला तीन पाऊलें भूमी देण्याची कृपा करावी. म्हणजे या गरीब ब्राम्हणावर मोठे उपकार होतील. बस्स आहे. या शिवाय दुसरें कांहीं नको. त्यामध्यें मी आपली झोपडी बनवून वेदाध्ययन करीन. जर आपण एवढी दया केली तर मी निश्चित होईन
हें त्याचें भाषण ऐकून तेथील अन्य ब्राम्हण आश्चर्यचकित होऊन
म्हणाले – आपण हैं काय केलें ? असली ही यःकश्चित् मागणी काय केली ? आपण इतके संतोपी आहात काय ? आपण कांहीं तरी मोठा वर मागावा, बली राजाही विस्मित होऊन म्हणाला, आपण हैं काय केलें ? आपल्या या क्षुल्लक याचनेने मी इताश झालों आहे. माझ्या शक्तीला अनुरूप असें पुनः दुसरें कांहींही मागायें, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल. मी पुनः आपणांस संधी देतो. आतां ही सुवर्णसंधी दवडूं नका. हे बलीचें भाषण ऐकून तो वेषधारी ब्राम्हण म्हणाला, – हे दात्या ! मी जें आपणांस मागितलें आहे. तेवढेच मला पुरे आहे. त्यांपेक्षां अधिक वस्तूंची मला आवश्यकता नाही. अधिक दान देण्याची इच्छा असल्यास या ठिकाणीं पुष्कळ ब्राम्हण आहेत त्यांना यथेच्छ दान देऊन तुम्ही आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी. मला फक्त तीन पाऊलें भूर्माच पाहिजे. बरें योग्य आहे म्हणून बलीनें त्यांच्या हातावर दान संकल्पाचें जल सोडविलें.
त्यानंतर त्या ब्राम्हणाने (श्रीविष्णुकुमार मुनीनें) मोठें विक्राळ रूप धरून आपलें एक पद मेरूपर्वतावर ठेवलें. दुसरें पद मानुषोत्तर पर्वतावर ठेविलें. आतां तिसरें पद कोठें ठेवू? कोठें ही स्थान नाहीं. असें दरडावून कर्कश शब्दाने त्या बळी राजास विचारिळे त्यावेळीं पृथ्वी कांपूं लागली. पर्वत हालू लागले. समुद्र खवळले. स्वर्गात देवांचे रथ परस्पर थडकूं लागले. तेव्हां प्रळय काळ प्रवर्तला काय ? असे सर्वांना भासू लागले.
हा मुनीश्वरांवरील घोरोपसर्गाचा प्रसंग आपल्या अवधिज्ञानानें स्वर्गातील देवांनी जाणून तत्काळ त्या ठिकाणीं येऊन बलीस बळींत टाकले आणि म्हटले कीं; – तूं मोठा अपराधी आहेस. तेव्हां या महर्षीस शरण जा म्हणजे तुला या बंधनांतून मुक्त करितो. हे ऐकून बलीनें तत्काळ त्या वामनरूपधारी – श्रीविष्णुकुमार-मुनींना साष्टांग प्रणि- पात करून क्षमा मागितली. आपल्या दुष्कर्माबद्दल त्याला अंतःकरणपूर्वक पश्चात्ताप झाला. मग अंकपनाचार्यादि सर्व मुनीश्वरांना साष्टांग नमस्कार करून त्यांच्या जवळ ही क्षमा मागितली.
हा सर्व धर्मप्रभाव पाहून सर्वांनी यथोचित जैनधर्माचा स्वीकार करून आपल्या मनांतील दुराग्रही मिथ्या अभिमान सोडला, असा जैनधर्माचा अगाध महिमा आहे. ते स्वर्गीय देव सर्व लोकांसइ भक्तीनें त्या मुनीश्वरांचे यशोगायन करून आपल्या ठिकाणी निघून गेले.
या प्रमाणे मुनिसंघावरील घोरोपसर्ग श्रीविष्णुकुमार मुनींनी आपल्या विक्रियाऋद्धि सामर्थ्यानें दूर करून साधर्मिक लोकांवरील वात्सल्य भाव व्यक्त केला. शेवटी ते घोर तपश्चर्येने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गे