व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्छ-पक्षांतील पंचमी दिवशीं या बत ग्राहकांनी एकमुक्ति करावी. आणि षष्ठो दिवशीं पातःकाळीं शुद्धोदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ-धौतबस्ने धारण करावीत. मग सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून इंर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक – श्रीजिनेंद्रास साष्टांग नमस्कार करावा, नंदादीप लावावा. नंतर श्रीपोठावर पद्मप्रभ तीर्थकर प्रतिमा, कुघुमवर यक्ष व मनोवेगा यज्ञी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर गंधाने सहा स्वत्तिकै काढून त्यांवर गंधाक्षता, फळे, फुले वगैरे ठेवावीत. मग वृषभापासून पद्मप्रभपर्यंत सहा तोर्थकरांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करात्री, पंचमक्ष्यपायसांचे चरु करावेत. नंतर श्रुत व गुरु यांचो अर्चना करावी. मग यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं श्रीपद्मप्रभतीर्थंकराय कुसुमवरयक्ष मनोवेगायक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्रीपद्ममभ तीर्थंकर चरित्र आणि चारुदत्त चरित्रहि वाचावे. ही व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत सहा पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावा. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारतो करावी, त्या दिवशी उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने यात्रीत. दुसरे दिवशीं जिनपूजा व दान करून आपण पारणे करावे, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
बापमाणें हैं व्रतपूजन महिन्यांतून एकदां त्याच तिथीस करून अशा सहा पूजा पूर्ण झाल्यावर शेवटी या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळी श्रीपद्ममम तीर्थंकर विधान करून महाभिषेक करावा. बहुःसंघांत आहारादि चारों दाने द्यावीत. शक्ति असल्यास नूतन चैत्य चैत्यालय निर्माण करून त्यांची पंचकल्याणविधी पूर्वक प्रतिष्ठा करावी. जोर्ण चैत्य चैत्यालयांचा उद्धार करावा. सहा मिथुनांस भोजन करवून त्याचा वस्ने, फळे, पुष्पें, पान सुपारी वैगैरेनीं सन्मान करावा. दोन अनाथांना अभयदान द्यावें. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
हे व्रत पूर्वी आपल्या पूर्व भवांत चारुदत्त श्रेष्ठीनीं केले होते. त्यायोगाने तो तेहतीस कोटि धनाचा मालक असूनहि वेश्या संगतीने महादरिद्री बनला. तथापि कांहीं निमित्ताने त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्याने जिनदीक्षा धारण करून समाधिर्धावधीनें मरून सद्-गत्ति सुखहि मिळविले आहे. असा या व्रताचा प्रभाव आहे.