व्रतविधि – चैत्रादि बारा मांसांतील कोणत्यादि मासाच्या शुक्ल अथवा कृष्ण पक्षांतील चतुर्थी दिवशी या ब्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि पंचभो दिवशी प्रातःकाळों शुचि जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वर्षे धारण करावीत. नंतर सर्व पूजा सामग्रो आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांत भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादोन लावावा. श्रीपीठावर श्रीपंच-परमेष्ठी पतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा, देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पांच पाने मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फड़े फुले वगैरे ठेवावीत. नंतर पंचपरमेष्ठींचों अष्टके, स्तोत्रे व जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावी. पंचपक्क नांचे चह करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करात्रो. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावे. ॐ ह्रींअर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिन सहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावीं. मग एका पात्रांत पांच पाने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्ध करावा. आणि त्याने ओवाळीत तीन प्रद क्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे,याच कमाने महिन्यांतून एकदां त्याच तिश्रीस पूजाक्रम करावा. या मनाणे पांच पूजा पूर्ण झाश्यावर या बताने उथापन करावें, त्यावेळीं ओपंचपरमेष्ठोविधान करून महाभिषेक करावा. बतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. नूतन चैश्यालय बांधवून त्यांत नूनन प्रतिमा पंचकल्याण विधोपूर्वक प्रतिष्ठा करून स्थापशवी, जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करावा. असा या प्रताचा पूर्णविधि आहे.
आतां है बत्र पूर्वी यथाविधीं पालन केल्यामुळे ज्यांना संतवि संपत्ति, सङ्गति सुश्त्व पाप्त झाले आहे, त्यांचो कथा सांगतो. ते तुम्ही एका मनाने ऐका,
– कथा –
या जंबूद्रोपांतोल भरतक्षेत्रांत अवंति नांवाचा एक विस्तीर्ण देश आहे. त्यांत उज्जयनी नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी प्रधोतन नामक राजा राज्य करीत होता. त्याच नगरांत सुरेंद्रदच नामक एक मोठा गुणी, सुंदर, शीलवान् असा श्रेष्ठो राहात होता. त्याला यशोभद्रा नामें एक सुंदर, सुशोल, अशी श्री होती. हे बत्तीस कोटिषनाचे मालक होते. परंतु त्यांच्या पोटीं पुत्र संतान नसल्यामुळे ते चिंताक्रांत होऊन काल क्रमीत होते.
पुढे एके दिवशीं त्या नगराच्या उद्यानांत ‘शीलसागर’ नामक महामुनि संधासहित्त येऊन उतरले. ही शुभ वार्ता तेथील राजांस कळ-तांच तो आपल्या परिजन व पुरजन यांसह त्या मुनीश्वरांच्या दर्शनास गेला. तेथे गैश्यावर भक्तोर्ने त्यांना तीन पदक्षिणा घालून वंदनादि करून त्यांच्या समीप बसला. मग कांहीं वेळ त्या मुनीश्वरांच्या मुखानें धर्मोपदेश ऐकल्यावर तो सुरेंद्रदत्त श्रेष्ठो मोठ्या विनयाने आपलीं दोम्हीं कर कर्मले जोडून त्या मुनीश्वरांना म्हणाला, हे ज्ञानसिधो स्त्रामिन ! आपल्या कृपण प्रसादाने सर्व संपत्ति प्राप्त झाली आहे. मात्र आमच्या पोटीं पुत्र संतान नसल्यामुळे आम्ही अत्यंत चिंताक्रांत झालो आहो. आंता आम्हांस पुत्रसंतान होईल की नाहीं! त्या करितां कोणता उपाय करावा ? हे आपण कृरा करून आम्हांस सांगावे. हे त्यांचे नम्र वचन ऐकून ते मुनोचर स्यांना म्हणाले -३ मध्प श्रेष्ठोन् ! आतां तुम्हांस मोठा पुण्यवान् व सद्नुगशालो असा पुत्र होणार आहे. ध्या करितां तुम्ही सुकुमारवत है पालन करावे, असे म्हणून त्यांनी त्या जताचा सर्वविधि सांगितला. ते ऐकून त्यांना मोठा आनंद झाला. मग ते सर्वजन त्या मुनीश्वरांस मोठ्या भक्तीने नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढे कालानुसार सुरेंद्र दत्तश्रेष्ठो व त्यांचो धर्मपत्नि यशोभद्रा यांनी ते व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केले.
त्यानंतर त्या यशोभद्रा श्रेष्ठीणीस गर्भ राहिला. पुढे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला पुत्ररत्न प्राप्त झाले, त्याचे नांव ‘सुकुमार’ बसे ठेविलें. पुत्रमुख पाइतांच त्या सुरेंद्रदत्त श्रेष्ठोस वैराग्य उत्पन्न झाले. मग तो जिनदीक्षा धारण करतां झाला. आणि घोर तपश्चर्या करून अंतीं तो समाधिविधोनें प्राणत्याग करून स्वर्गात देव झाला. तेथे तो चिरकाल सुख भोगू लागला.
इकडे तो सुकुमार युवावर्खेत आल्यावर त्यांच्या मातोश्रीने ३२ कन्याशीं त्याचा विवाह करून दिला. त्यांच्यासह तो मोठ्या सुखाने कालक्रमण करूं लागला. पुढे एके दिवशीं त्यांच्या घरासमीप असलेच्या उद्यानांत एक अवधिज्ञानी महामुनि चातुर्मासानिमित्त येऊन उतरून त्यांनी तेथे वर्षायोग धारण केला.
एके दिवशीं प्राप्तःकाळीं ते मुनीश्वर भक्ति, स्तवन केल्यावर मोठ्या गंभीर वाणीनें त्रिलोक प्रज्ञप्ति शास्त्राचा पाठ म्हणू लागले. तेव्हां तो पाठ त्या सुक्कुमार श्रेष्ठोच्या कानांवर पूर्णपणे पडतांच त्याला पूर्वभवाचे स्मरण झाले. त्यामुळे त्याच्या मनांत या क्षणिक संसाराविषयीं अत्यंत वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां तात्काल तो त्या मुनीश्वरांच्या सन्निध गेला. मग त्या मुनीश्वरांनी त्यांची सर्व परिस्थिती आपल्या अवधिज्ञानाने जाणून त्याला मागील भवांचा प्रपंच सांगितला. आणि पुनः ते त्यांस म्हणाले, हे भव्य नरोत्तमा ! आतां तुझे आयुष्य केवळ तीन दिवस उरले आहे. त्या करितां तूं आतां आपले आस्महित करून थे. हे ऐकून त्याला हि सखेद आश्चर्य वाटले मग त्याने त्या मुनीश्वरांना मोठ्या विनयाने प्रार्थना करून त्यांच्या जवळ दिगंबर दीक्षा घेतलो आणि तो घोरोपसर्ग सहन करून अंतीं समाधिविधीने मृत्यु पावून अच्युत स्वगौत महर्दिक देव झाला. तेथे तो देव चिरकाल पुष्कळ सुख भोगू लागला. असे या बठाचे माहात्म्य आहे.