व्रतविधि-चैत्रादि बारा महिन्यांतून कोणत्याहि महिन्याच्या शुक्लपक्षांतील ४ दिवसीं या ब्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि दिवशीं पातःकाळों शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे धारण करावीत. मग सर्व पूजा सामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रोजिनेंद्रांस मक्तोने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीमूलनायक पोठावर श्रीपंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका पाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यांवर पांच पाने मांडवींत. आणि त्यावर गंधा-क्षता, फळे, पुष्पें वगैरे ठेवावीत. मग श्रोपंचपरमेष्ठीचों अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करात्री, तसेच श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. आणि यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसइस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्र स्वाध्याय करावा. ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांत पांच पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्थ करावा. आणि त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करून धर्म ध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहा-रादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे. नमः
याच क्रमाने महिन्यांतून एकदां त्याच तिथीस हा पूजाक्रम करावा. याप्रमाणें पांच महिन्यांत पांच पूजा पूर्ण झाल्यावर शुभदिवर्शी या व्रताचे उद्यापन करावं. त्यावेळों श्रीपंचपरमेष्ठी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघात चतुर्विध दार्ने द्यावीत. पांच मुनि समुदा-यांस आहार देऊन श्रुतवर्षे, शाखें, जयमाळा वगैरे आवश्यक वस्तू द्याव्यात. तसंच आर्थिकांनाहि द्यावे. दीन अनाथ यांना अभयदान द्यावे. पांच दंपत्तीस मोजन करवून बश्न, पान, सुपारी, नारळ, फलें, कुळे वगैरेनी त्यांचा सम्मान करावा. असा या नांचा पूर्ण विधि आहे.
-कथा-
है व्रत आपल्या तिसन्या भवांत एका बाम्हणाने यथाविधि पाळून बाचे उद्यापन केले होते. त्या योगाने त्याला सर्व सांसारिक सुख मिळून कभाने मोक्षनुस्खहि पाप्त झाले आहे. असा या व्रताचा दृष्टांत आहे.