या जंबूद्धोपांतील भरत क्षेत्रांत कुंथल कर्नाटक नामक एक विस्तीर्ण देश आहे. त्यांत रायबाग नांवाचे एक मनोहर पूर आहे. तेथे पूर्वी बंकसेन नांवाचा एक मोठा शूर, सद्गुणी व न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमति नांत्राची एक सुशोल, धर्मनिष्ठ व गुणवती अशो पट्टश्ची होती. त्यांना धनसेन नांत्राचा एक सुंदर पुत्र होता. याशिवाय त्याला मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापति वैगैरे पुष्कळ परिवारजन होते. यांच्यासह तो बंकसेन राजा मोठ्या सुखाने कालक्रमण करीत होता.
व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुक्ल अथवा कृष्ण पक्षांतील शुभ दिवशींच्या पूर्व दिवशीं व्रत आहकांनी एकभुक्ति करावी. आणि दुसरे दिवशीं (निश्चयदिवशीं) मातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर नूतन धौतवस्ने धारण करा-बोत. आणि सर्व पूजा सामग्रो हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वैगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, नंदादीप लावावा. श्रीपीठावर नत्रदेवता प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर गंधाने नऊ स्वस्तिके काढून त्यांत्रर नऊ पाने मांडावींत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फलें, फुले, वगैरे द्रव्ये ठेवावीत; त्यांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचपकान्नांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधुजिनधर्म जिनागम जिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावींत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्त्रनामस्तोत्र म्हणून शास्त्र स्वाध्याय करून ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांज नऊ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्य व एक नारळ ठेवून महार्घ्य करावा. आणि त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे या नऊ पूजा पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळीं नवदेवता विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघांस चार प्रकारचीं दाने बाबींत. दीन अनाथांना अभयदान द्यावें. नऊ मिथुनांस भोजन करवून त्यांना पान, सुपारी, नारळ, फड़े फुर्के गंधाक्षतां वगैरे देऊन त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
है व्रत पूर्वी सुदर्शनश्रेष्ठोनें आपल्या पूर्व मत्रामध्ये यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केले होते. त्या योगानेच तो पुढे सुदर्शन नामक सर्व धनकनकादि संपन्न श्रेष्ठी झाला आहे. आणि तो सर्व सांसारिक सुखे भोगून अंतीं जिनदीक्षा धारण करून यति झाला आहे. व समाचिविधीने मरून स्वगौत महद्धिक देव झाला. तेथे पुष्कळ सुख अनुभवून कमाने मुक्तीस गेला आहे. असा या व्रताचा दृष्टांत आहे.
हा दृष्टांत व पूर्वोक्त व्रतविधान श्रीगुणमद्राचार्याच्या मुखानें ऐकून बँकसेनादि त्याच्या कुटुबी जनांस मोठा आनंद झाला. मग त्यांनी त्या मुनीश्वरांना नमोस्तु करून हे सुदर्शनश्रेष्ठो व्रत घेतले. नंतर ते मुनीश्वर सर्वांस शुभाशिर्वाद देऊन निघून गेले.
त्यानंतर कालानुसार तो बंकसेन राजा आणि त्याची धर्मपत्ति लक्ष्मीमति यांनीं ते व्रत यथाविधी पाळून उद्यापन केले. त्या योगानें ते अंतकाळीं शुभध्यानाने मरून स्वर्गास गेले.