व्रतविधी – मार्गशीर्ष मासांत ज्या दिवशीं कृत्तिका नक्षत्र असेल त्या दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि दुसरे दिवशर्शी म्हणजे रोहिणी नक्षत्रादिवशी (रोहिणी नक्षत्रावर) शुद्ध पाण्यानें अभ्यंग- स्नान करून अंगावर दृढ धौतवर्षे धारण करोति. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मांदरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर नवदेवता प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. पंच- पकान्नांचे चरु करावेत. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अई अर्हत्सिद्धाचायोपाध्यायसर्वसाधुजिन- धर्मजिनागमजिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसइस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत नऊ पानें छावून त्यांवर अष्टद्रव्यें आणि एक नारळ ठेवून महार्थ्य
करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. या दिवशी उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पा त्रांस आहारादि दानें यावींत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. याप्रमाणें महिन्यांतून एकदां रोहिणी नक्षत्रावर हूँ व्रत पूजन करावें. असे हे व्रत सात वर्षे करणें उत्तम, पांच वर्षे पालन करणें मध्यम, व तीन वर्षे करणें जघन्य समजावे. शेवटीं याचें उद्यापन मार्गशीर्ष मासांतच करावें. त्यावेळीं नूतन नवदेवता प्रतिमा आणवून पंचकल्याणपूर्वक तिची प्रतिष्ठा करावी. पंचवर्णाच्या अक्षतांनी अडीच द्वीपांचे मंडल काढून त्यांत नवदेवता प्रतिमा स्थापून ” तीस-चोवीसी ” विधान करावें. पंचपकान्नांचे चरु करावेत. पांच मुनि व आर्थिका यांना आहारादि दानें द्यावीत. पांच दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा विधी आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत आर्याखंड आहे. त्यांत अंग नांवाचा एक विस्तीर्ण देश असून त्यांमध्यें चंपापुर नामक एक सुंदर पट्टण आहे. तेथें पूर्वी मघव नांवाचा एक मोठा पराक्रमी रूपवान्, गुणवान्, धर्मनिष्ठ असा राजा राज्य करीत होता. त्याला श्रीमती नामें सुशील, सौंदर्यवती, गुणवती अशी धर्मपत्नि होती. त्यांना गुणपाल, अवनिपाल, वसुपाल, श्रीधर, गुणधर, यशोधर, रणसिंह व प्रतापसिंह असें आठ ८ पुत्र होते. आणि रोहिणी नामक एक रूप- वती, लावण्यवती, गुणवती सम्यक्त्वशालिनी अशी कन्या होती. या शिवाय या राजाचे मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापति वगैरे अनेक परिवार लोक होतें. या सर्व परिवारासह तो मघव राजा अति सुखानें राज्योपभोग घेत होता. त्याची ती रोहिणी कन्या उपवर झाल्यानें ती कोणास द्यावी यांविषयीं त्यांना अत्यंत चिंता उत्पन्न झाली. तेव्हां एके दिवशीं त्यानें आपल्या मंत्री जनांस सर्भेत बोलावून आपल्या कन्येविषयीं
विचार मांडला त्यावेळी सर्वांच्या संमतीने असें ठरलें कीं,” स्वयंवर करावा ” व सर्व राजपुत्रांस आमंत्रण द्यावें. वगैरे.
त्यानी ठरल्याप्रमाणें स्वयंवरमंडप तयार केला. छप्पन्न देशांच्या राजपुत्रांस बोलावून आणिले. तेव्हां त्या रोहिणी राजकन्येनें त्या स्वयं- वर मंडपांत हस्तिनापुरचा राजा गतशोक व त्यांची धर्मपत्नि विमळगंगा यांच्या अशोक नामें पुत्रांस माळ घातली. हे पाहून बाकी सर्व राजपुत्र क्षुब्ध झाले. तेव्हां अशोक व इतर राजपुत्र यांच्यामध्यें युद्ध झालें. त्यांत अशोकानें सर्वांचा पराभव करून त्या रोहिणीशीं यथाविधी लग्न केलें. नंतर तो आपल्या धर्मपत्निसह आपल्या हस्ति- नापुरीं परत आला. आणि रोहिणीसह तो सुखोपभोगांत काळ घालवू लागला, क्रमाने यांना वीतशोक, जितशोक, नष्टशोक विगतशोक, धनपाल, स्थिरपाल व गुणपाल असे सात पुत्र आणि वसुंधरी, अशोकमति, लक्ष्मीमति, सुप्रभा अशा चार कन्या व शेवटीं लोकपाल नांवाचा एक कनिष्ठ पुत्र झाला. अशीं बारा अपत्यें झाली. यांच्यासह ती दंपती सुखानें कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं त्या हस्तिनापुर नगराच्या उद्यानांत अवधिज्ञान संपन्न असे सुवर्ण कुंभ व रौप्य कुंभ नामक दोघे चारणऋद्धिधारी मुनीश्वर येऊन उतरले. हे शुभवृत्त तेथील वनपालकद्वारें त्या अशोक राजास कळतांच तो आपले परिजन व पुरजन यांच्यासह पादमार्गे त्या मुनीश्व- रांच्या दर्शनार्थ गेला. तेथे गेल्यावर त्यांना तीन प्रदक्षिणापूर्वक भक्तीनें वंदनादि करून त्यांच्या समीप बसला.
त्या मुनीश्वरांच्या मुखानें कांही वेळ धर्मोपदेश श्रवण केल्यावर तो विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, हे ज्ञानसिंधो स्वामिन् ! ही राज्यविभूति, ही सुंदर धर्मपत्नि व हे सद्गुणी पुत्र व कन्या हीं सर्व कोणत्या पुण्योदयानें मला आतां प्राप्त झालीं आहेत ? हे मला सर्व आपण कृपा करून सांगावें.
हे त्याचें त्रिनयपूर्ण वचन ऐकून ते मुनीश्वरं त्यांस म्हणाले, हे भव्योत्तम राजन् ! आतां तुम्हां सर्वाचा भरप्रपंच निवेदन करितों, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, या इस्तिनापुर नगराच्या पूर्व दिशेस बारा योजनावर नीलगिरी नामक एक पर्वत आहे. तेथे पूर्वी यमधर या नांवाचें एक दिगंबरमुनि एका शिलेवर प्रति दिवशीं ध्यान करीत बसत असत. एके दिवशीं एक पारधी शिकार करण्यास तेथे आला त्या दिवशीं कांहींच शिकार मिळाली नाहीं. तेव्हां त्याच्या मनांत असें आलें कीं; या मुनींच्या प्रभावानेच आज मला शिकार मिळाली नाहीं; त्या करितां या मुनीश्वरांस येथून हाकलून द्यावे. त्या शिवाय मला शिकार मिळणार नाहीं. वगैरे विचार करून घरी गेला. आणि एके दिवशीं तेथे आला. त्यावेळी मासोपवासाच्या पारणें करितां ते मुनीश्वर अभयपुर नगरास गेले होते. मुनीश्श्र बसावयाचा दगड प्रखर विस्त- वानें त्यानें तप्त केला. इतक्यांत ते मुनीश्वर मिक्षा करून तेथे आले. तो दगड अतिशय तापून लाल झाला होता, तथापि त्याच दगडावर बसण्याचा त्यांचा नियम असल्यानें त्याच दगडावर बसले. तेव्हां त्या शिळेच्या प्रखर उष्णतेनें त्याचें शरीर जळून भस्म झाले. तेव्हां ते मुनीश्वर शांतवृत्तीनें होणारा परीषह सहन करून शुक्लध्यानाच्या योगानें सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेले. आणि तो पारधी बेरड उपसर्ग केलेल्या पापामुळे रोगाने शरीरांत किडे पडून मरून सातव्या नरकांत गेला, तेथे ३३ सागर वर्षे भयंकर दुःख भोगून तेथील आयुष्य पूर्ण झाल्यावर या तुझ्या पट्टणांतच अंवाल नांवाचा गोपाळ होता, त्याला गांधारी नांवाची स्त्री होती, त्यांना दंडक पुत्र होऊन जन्मला.
एके दिवशीं तो दंडक त्या नीलगिरी पर्वतांत गाई राखण्याकरितां गेल्यामुळे तेथील त्या दगडास पाहून त्याला जातिस्मरण झालें. तेव्हां पूर्वी या दगडावर बसलेल्या मुनीश्वरांत उपसर्ग केल्यामुळे नरकांत जन्मून घोरदुःख भोगावें लागले वगैरे त्याला स्मरण झाल्याने तो पश्चात्ताप करूं लागला. इतक्यांत तेथील वनांत दावाग्नि अकस्मात् पेटल्याने तो त्यांत सांपडून मरण पावला. आणि तोच तूं या नगरांत राजा होऊन राज्य करीत आहेस. असो.
आतां रोहिणीचा भवप्रपंच ऐक-याच हस्तिनापुर नगरांत पूर्वी बसुपाल राजा आपल्या वसुमति राणीसह राज्य करीत होता. त्याचा राजश्रेष्ठि घनमित्र या नांवाचा होता. त्याला धनमित्रा नांवाची धर्मपत्नि होती. त्यांना दुर्गंधी नावांची एक कन्या होती. पूर्वकर्मामुळे तिचें शरीर अत्यंत दुर्गधी होतें. म्हणून तिला दुर्गंधी असें म्हणत होते. तेथेच सुमित्र नांवाचा एक वैश्य राइत असे. त्याला सुकांती नांवाची धर्मपत्नि होती. व्यांना श्रीषेण नामक एक पुत्र होता. हा सप्त व्यवसनांत आसक्त होता. एके दिवशीं राजाच्या अपराधांत सांपडला. तेव्हां त्याला शिक्षा देत असतां, त्यांतून त्याला सोडवून आणिलें. मग बलात्कारें त्या दुर्गंधी कन्येशी त्याचा विवाह्न केला. मग तो तिच्या जुगुप्सेनें तिला सोडून तेथून निघून गेला. मग ती दुर्गंधी माहेरी येऊन राहिली. आणि धर्ममार्गानें वागूं लागली.
एके दिवशी गुणमति या नांत्राची एक आर्यिका चर्येनिमित्त त्या धनमित्राच्या घरी आली. तेव्हां त्या दुर्गंधीनें त्या आर्थिकेस नवधा- भक्तीनें आहारदान दिलें याप्रमाणें धर्मक्रियेंत आयुष्य घालवू लागली.
या प्रमाणे १२ वर्षे गेल्यावर श्रीपिहितास्त्रव नामक महामुनि महाराज त्या नगराच्या उद्यानांत आले. तेव्हां ते राजे व नगरांतील श्रावक लोक हे त्यांच्या दर्शनास गेले. त्यावेळी ती गुणमति आर्यिका व ती दुर्गंधी ह्याही तेथे गेल्या होत्या. त्या मुनीश्वराच्या मुखानें कांहीं वेळ धर्मोपदेश श्रवण केल्यावर ती दुर्गंधी त्या मुनीश्वरांस आपलीं दोन्ही करकमले जोडून विनयानें त्यांना म्हणते, हे दयासागर स्वामिन् ! पूर्वजन्मीं मी कोणतें पाप केले होतें ? त्यामुळे आतां मला हे दुर्गंधी शरीर प्राप्त झाले आहे. हे मला कृपा करून सांगावे. हें तिचें नम्र
भाषण ऐकून ते मुनीश्वर तिला म्हणाले, हे कन्ये! पूर्वी सौराष्ट्रदेशांत गिरी नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथे बसुपाल नांत्राचा राजा राज्य करीत होता. त्याला वसुमति नामक एक सुंदर श्री होती, त्यांचा राजश्रेष्ठी गंगदच नांवाचा होता. त्याला सिंधुमति नांवाची एक धर्मपत्नि होती.
एके दिवशी तो वसुपाल राजा तो गंगदत्त राजश्रेष्टी हे आपा- पल्या परिवारासह निघाले असतां, रस्त्यांत चर्येसाठी नगरांत येत असलेले एक दिगंबर मुनी त्यांच्या दृष्टीस पडले. हे पाहून तो गंगदत्त श्रेष्ठी आपल्या स्रीस म्हणाले, हे प्रिये! हे मुनीश्वर आहाराकरितां नगरांत चालले आहेत. तेव्हां तूं घरी जाऊन त्या मुनीश्वरांना यथाविधी आहार दे. मग तूं मागाहून वनक्रीडेस ये, असें सांगून आपल्या भार्येस त्यानें घरी पाठविले. मग ती सिंधुमति वनक्रीडेस अडथळा आल्यामुळे क्रोधाविष्ट होऊन घरी परत गेली. आणि तिने घोड्याच्या बत्तीस मसा- ल्याचे औषध मिश्रित आहार तयार केला व मुनीना आहारदान दिले. नंतर ती लगबगीनें वनाकडे गेली.
इकडे ते मुनीश्वर जिनालयांत येऊन बसले असतां त्या उष्ण आहारामुळे त्यांच्या अंगांत अत्यंत दाइ उत्पन्न झाला. आणि त्यामुळे ते मुनीश्वर समाधि साधून अच्युत कल्पांत इंद्र झाले. ही वार्ता ऐकून त्या बसुपाल राजास अत्यंत क्रोध आला. व तो राजश्रेष्ठि गंगदत्त ‘ आपल्या भार्येनें आपली अपकीर्ति केष्ठी’ असे जाणून तो संसारापासून विरक्त झाला. आणि वनांत जाऊन एका मुनीजवळ जिनदीक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागला. आणि इकडे त्या राजानें त्या सिंधुमतीचे नाक, कर्ण, स्तन छेदून धिंड काढून तिला नगरांतून हाकलून दिले. पुढें सात दिवसांतच तिच्या शरीरांत असाध्य रोग उत्पन्न होऊन ती मरून सहाव्या नरकांत गेली. तेथे ती बावीस सागर वर्षे अत्यंत घोर दुःख भोगून आयुष्यांतीं तेथून मरून येथे येऊन कुत्रा झाली. पुनः
अन्नींत पडून मरून दुसऱ्या नरकांत गेली. तेथे तीन सागर वर्षे दुःख भोगून पुनः कौसांधी नगरांत डुकर होऊन जन्मली. तेथे कुत्रा चावून मेल्यानें कौशल देशांतील नंदीग्रामांत ती उंदीर झाली. तेथे मांजरानें मारल्यामुळे नदींन जळवा झालो. एक म्हैस पाणी प्यावयास आली असतां तिच्या नाकांत जाऊन मेल्यानें पांढरा कावळा झाली. तेथे ही मरून उज्जयनी नगरांत एका महाराच्या घरी कन्या झाली. तेथे ज्वरार्ने मृत्यु पावून छत्र नामक नगरांत गाढव झाली. तेथे रोगग्रस्त होऊन मेल्यानें या हस्तिनापुरांत एका ब्राम्हणाच्या घरी गाय झाली. तेथे पाणी प्यावयास नदीवर गेली असतां (गाळांत) चिखलांत सांप- डून मेळी. तेथून कर्माचा कांहीं उपशम झाल्यामुळे आतां वं दुर्गधी होऊन जन्मली आहेस.
याप्रमाणें आपला पूर्वभव प्रपंच ऐकून तिला अतिशय दुःख झालें. तेव्हां ती पश्चात्तापाने व्याकुळ होऊन दीनमुद्रेनें त्या मुनीश्वरांस म्हणाली, हे दयाघन स्वामिन् ! आतां आपण या पातकाचा परिहार होण्यासारखा एकादा उपाय सांगावा. हे तिचें दीन वचन ऐकून ते पिहितास्त्रव भट्टारक महामुनि महाराज तिला म्हणतात, हे कन्ये ! आतां तूं रोहिणीव्रत कर म्हणजे तुझें सर्व पातक नाश होऊन शरीर सुगंधित होईल. आणि पुढे सुखसंपत्तिही प्राप्त होईल. आतां त्या व्रताचा काल व विधी सांगतो. ते उक्षपूर्वक ऐक, असें म्हणून त्यांनी तिला सर्व विधि सांगितला. Se swing In
हें व्रतविधान ऐकून त्या दुर्गधीस मोठा आनंद झाला. मग तिनें त्या मुनीश्वरांसः प्रार्थना करून हे व्रत स्वीकारिले. पुढे तीनें कालानुसार यथाविधि हैं व्रत पाळून याचें उद्यापन केलें त्या योगाने ती अच्युत कल्पांत देवी झाली. आणि तेथील आयुष्य पूर्ण झाल्यावर तेथून व्यवून ती आतां तुला रोहिणी नामें स्त्री झाली आहे.
हे अशोक राजन् ! आतां तुझ्या पूर्वभवप्रपंच सांगतो; तें
उक्षपूर्वक ऐक- विंध्य पर्वताच्या अरण्यांत ताम्रकर्ण व श्वेतकर्ण असे दोन इत्ती होते. ते दोन्ही एका इत्तिणीसाठीं परस्पर लहून मेले. मग ते उंदीर ष मांजर झाले. तेथे ही ते वैरभावानें मरून मुंगूस झाले. त्तेयेंही ते मरून क्रमाने कोबडे, सर्प, मीन, सुसर, डुकर, कुत्रा, कबूतर होऊन मरून पूर्वी या इस्तिनापुरांत सोमप्रभ नामक राजा असून त्याला कनकर्मभा नांवाची स्त्री होती. त्यांच्या पुरोहित, वीरस्वामि नांत्राचा असून त्याला सोमश्री नांवाची भार्या होती. त्यांच्या पोटी ते सोमशर्मा व सोमदत्त या नांवाचे पुत्र झाले. त्यांची सुकांता व लक्ष्मीमती यांच्याशी लग्न केली. त्या सोममभ राजानें राजपूज्य, विद्वान सोमदत्त नार्ने कनिष्ठ पुत्रास पुरोहित पद दिले. मग पुढें त्या सोमशर्माची सुकांता ही व्यभिचारीणी आहे असे समजल्यामुळे तो सोमदत्त संसारापासून विरक्त होऊन वनांत गेला. आणि त्यानें एका मुनीश्वराजवळ जिनदीक्षा घेऊन तपश्चर्येस प्रारंभ केला.
मग इकडे त्या सोमशर्मास त्या राजानें पुरोहित पद दिले. नंतर एके दिवशीं तो सोमप्रभराजा एका विशिष्ट शुभकार्यासाठी चालला होता. त्यावेळी त्यांच्या समोर सोमदत्त मुनी आले. हे पाहून तो सोमशर्म राजपुरोहित राजांस म्हणाला, हा अपशकुन झाला. आतां पुढें जाणे योग्य नाहीं. हें ऐकून त्याच्या वचनाकडे लक्ष न देतां पुढें चालला. इतक्यांत विश्वसेन नामक एक पुरोहित त्यांना म्हणाला- हे राजन् ! मुनीश्वर पुढें येणें हा शुभशकुनच आहे. कारण – याविषयीं शास्त्रांत अशी उक्ती आहे की, श्रमणस्तुरगोराजा। मयूरः कुंजरो वृषः ॥ प्रस्थाने च प्रवेशे च । सर्वसिद्धिकराः स्मृताः ॥ १ ॥ या साठीं आतां आपण येथेंच राहावें. पांच दिवसांत आपली कार्य- सिद्धी अवश्य होईल.
हे त्या पुरोहिताचें वचन ऐकून तो तेथेंच स्वस्थ राहिला. पुढे तिसऱ्या दिवशींच त्याचें इष्टकार्य सफल झालें. त्यामुळे त्यांस मोठा
आनंद झाला. मग त्यानें त्या विश्वसेन नामक पुरोहितास राजपुरोहित पद देऊन त्या सोमशर्मास नगराबाहेर काढले. त्या कारणानें त्या सोमशर्माच्या मनांत अतिशय क्रोध उत्पन्न झाला. तेव्हां त्यानें पूर्व वैरा- मुळे त्या श्री सोमदत्त मुनीश्वरांस रात्रीं ठार मारिलें, तेव्हां ते मुनीश्वर शुभ भावनेनें समाधि साधून सर्वार्थसिद्धींत अहमिंद्र देव शाळे. आणि तेथे ते चिरकाल सुख भोगूं लागले.
इकडे तो सोमशर्मा आयुष्यांती मरून त्या मुनिवधाच्या पातका- मुळे सातव्या नरकांत गेला. तेथे तेहतीस सागर वर्षे दुःख भोगून तेथून स्वयंभूरमण समुद्रांत महामत्स्य झाला. मग तो तेथे मरण पावून सहाव्या नरकांत गेला. तेथे २२ सागर वर्षे दुःख भोगून तेथून येऊन सिंह झाला. नंतर तो मरून पांचव्या नरकांत गेला. तेथे १७ सागर वर्षे दुःख भोगून तेथून येऊन बाघ झाला. मग तो मरून चौथ्या नर- कांत गेला. तेथे १० सागर वर्षे दुःख भोगून तेथून येऊन डुकर झाला. मग तो मरून तिसऱ्या नरकांत गेला. तेथे ७ सागर वर्षे दुःख भोगून तेथून कोल्हा झाला. नंतर तो मरून दुसऱ्या नरकांत गेला. तेथे ३ सागर वर्षे दुःख भोगून बैल झाला. मग तो मरून पहिल्या नरकांत गेला. तेथें एक सागर वर्षे पर्यंत दुःख भोगून कांहीं कर्माचा उपशम झाल्याने मयध देशांतील सिंहपुरीचा राजा सिंहसेन व त्यांची धर्म- पत्नि हेमप्रथा यांच्या पोटीं दुर्गंध नामें पुत्र झाला.
पुढें कालांतरानें त्या नगराच्या उद्यानांत विमलवाहन केवळी श्वर येऊन अवतरले. हैं शुभवृत्त कळतांच तो राजा आपले परिजन व पुरजन यांच्या सह पादमार्गे त्यांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर मोठ्या आदरानें तीन प्रदक्षिणा घालून त्याची वंदना, पूजा, स्तुति वगैरे करून योग्यस्थानी बसला. तेव्हां त्या केवळी जिनेंद्रास पाहतांच तो दुर्गंध राजकुमार एकदम मूर्छित होऊन पडला. तेव्हां तो सिंहसेन राजा आपले दोन्ही हात जोडून मोठ्या विनयाने त्या केवळी
भगवंतांस म्हणाला, हे जगत्प्रभो ! हा माझा पुत्र आपणांस पाहांच मूर्छित होऊन पडण्याचे कारण काय? हे ऐकून ते केवली जिनेश्वर त्यांस म्हणाले, हे भव्य राजन् ! तुझ्या या पुत्राचा व आमचा पूर्वसंबंध कसा आहे? हे तुला सांगतो; ऐक असे, म्हणून त्या केवळी जिनेश्वरांनीं हत्तीच्या भवांपासून त्या पुत्राच्या दुर्गंध भांपर्यंत सविस्तर भवप्रपंच सांगितला. मी पूर्वी सोमदत्त भवांमध्यें जिनदीक्षा धारण करून अंतीं समाधि विधीनें मरून सर्वार्थसिद्धींत अहमिंद्र देव झालों होतो. तेथून च्यवून विमलवाहन नामें क्षत्रिय कुळांत राजा झालो. आणि संसारापासून विरक्त होऊन जिनदीक्षा घेऊन तपश्वरणानें घाति- कर्माचा नाश करून आतां केवली झालों आहे. असा त्याचा व आमचा पूर्व भवाचा संबंध आहे.
हे ऐकून सर्वाना सखेद आश्चर्य वाटले. मग तो सिंहसेनराजा त्यांना म्हणतो, हे दीनदयानिधे ! महास्वामिन् ! आतां या पुत्राच्या शरीराचा दुर्गंध नाहींसा होण्यासारखा एकादा उपाय आपण सांगावा. हें त्याचें विनय भाषण ऐकून; ते केवळी भगवान् त्यांस म्हणाले, हे भव्योत्तमा राजेंद्रा ! आतां तुम्ही रोहिणी व्रत है विधिपूर्वक पाळून त्याचें उद्यापन करा. म्हणजे त्याच्या शरीराचा दुर्गंध जाऊन तें सुगंधी होईल. आणि तुम्हां सर्वास उत्कृष्ट सुखसंपत्ति प्राप्त होईल. असें म्हणून त्या व्रताचा काल व विधि सर्व सांगितला. मग त्यांनीं त्या केवळी भग- वंतास वंदना करून ते व्रत ग्रहण केलें. नंतर सर्वजन त्या विमल- वाहन केवली मुनीश्वरांस मोठ्या भक्तीनें नमस्कार करून आपल्या सिंहपुरीं परत आले. पुढें कालानुसार त्यांनीं हैं रोहिणी व्रत यथा- विधी पाळून त्याचे उद्यापन केलें. त्यायोगानें त्याच भवांत त्या दुर्गंध पुत्राचें शरीर सुगंधित झालें. मग त्याला लोक सुगंध, सुगंध असे म्हणू लागले. Stream or I જવ હા
वि. मग कालांतरानें थोड्याच दिवसांत त्या सिंहसेन राजाच्या मनांत
संसाराविषयी विरक्ति झाल्यामुळे तो आपला राज्यभार सुगंध पुत्रास देऊन बनांत गेला. तेथे एका मुनीश्वराजवळ जिनदीक्षा घेऊन धोर तपश्चरण करूं लागला. शुक्रुध्यानाच्या योगाने सर्व कर्माचा नाश करून मोक्षास गेला.
पुढे तो सुगंध राजा कांही दिवस ऐहिक सुखाचा अनुभव घेऊन त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यानें आपल्या जयकुमार नामक पुत्रांस राज्यभार देऊन वनांत गेला. तेथे एका मुनीश्वराजवळ जिनदीक्षा धारण करून तपश्चर्या करूं लागला. आयुष्यांर्ती शुभध्यानानें समाधि साधून अच्युत कल्पांत देव झाला. तेथें पुष्कळ दिवस स्वर्गीय सुखांचा अनुभव घेऊन आयुष्यांती तेथून घ्यवून तो या जंबूद्वीपांतील पूर्व विदेह क्षेत्रांत पुंडरिकिणी नगर आहे. तेथे विमलकीर्ति नामकः राजा व त्यांची धर्मपत्नि पद्मश्री यांच्या पोटीं अर्ककीर्ति नांवाचा पुत्र झाला. पुढें तो चक्रवर्तिराजा होऊन षट्खंडाचा अधिपति झाला. पुष्कळ दिवस तो राज्यैश्वर्य भोगून त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्या- मुळे तो आपल्या जितशत्रु नांवाच्या पुत्रास राज्यभार देऊन वनांत गेला. तेथे एका महामुनिजवळ जिनदीक्षा धारण करून तपश्चर्या करूं लागला. अंतीं समाधिविधीनें मरण पावून अच्युत स्वर्गात इंद्र झाला. तेथे चिरकाल दिव्य सुखाचा अनुभव घेऊन आयुष्यांतीं तेथून च्यवून आतां तूं या हस्तिनापुर नगरांत अशोकराजा होऊन जन्मला आहेस. हें ऐकून त्यांना आश्वर्यानंद झाला. असो. हे राजन् ! आतां तुमच्या पुत्रांचा भवप्रपंच कथन करितो. तें तुम्ही शांतचित्तानें ऐका, – उत्तर मथुरंत सूरसेन नांवाचा एक मोठा पराक्रमी व न्यायवान् असा राजा होता. त्याला विमलमति या नांवाची एक सुशील व सुंदर अशी राणी होती. त्यांना पद्मावती नामें एक सुंदर कन्या होती. त्याच नगरांत अग्निशर्मा नांत्राचा एक ब्राम्हण राइत होता. त्याला सावित्री नांत्राची एक गुणवती स्त्री होती. यांच्या पोटीं शिवशर्मा, अग्नि-
भूति, श्रीभूति, वायुभूति, विशाखभूति, सोमभूति व सुभूति असे सात पुत्र जन्मले होते.
इकडे त्या पद्मावती राजकन्येस पाटलीपुर नगराच्या सिंहसेन राजास देण्याचा निश्चय करून लग्नसमारंभ होत असतां – तें राज्यैश्वर्य व तो लग्न सोहळा पाहून त्या ब्राम्हणाच्या सप्त पुत्रांनी असे निदान बांधलें कीं, पुढच्या भवांत यांच्यासारखे आम्हांसही ऐश्वर्य प्राप्त व्हावें आणि यांच्या संयोगही मिळावा, असे निदान करून त्या ब्राह्म णाच्या सातही पुत्रांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झालें. आणि ते सीमंकर मुनीश्वराजवळ जाऊन जिनदीक्षा घेऊन तपश्वरण करूं लागले. शुभ ध्यानानें अंतीं समाधिमरण साधून सौधर्म स्वर्गात देव झाले. आणि पुढें तो सिंहसेनही त्या पिहिताश्रव भट्टारक महामुनिजवळ श्रावकांची व्रतें घेऊन पाळू लागला. कालांतरानें समाधि साधून त्या सौधर्म स्वर्गातच देव झाला. ते सौधर्म स्वर्गातील आठ ही देव आयुष्यांती तेथून व्यवून क्रमानें तुला हें आठ पुत्र झाले आहेत. असो.
आतां तुझ्या कन्यांचा भवप्रपंच सांगतों. ऐक, या जंबूद्वीपां तीळ पूर्वविदेह क्षेत्रांत विजयार्धपर्वताच्या दक्षिण श्रेणीवर अल- कापुर नामक एक सुंदर नगरी आहे. तेथें पूर्वी मरुदेव नांवाचा राजा आपल्या कमलावती नामक स्त्रीसह राज्य करीत होता. त्यांना पद्मा- वती, पद्मगंधी, विमलश्री व विमलगंधी या नांवाच्या चार कन्या होत्या. श्री समाधिगुप्त मुनिजवळ जाऊन त्यांनीं एकदा श्रीपंचमीव्रत घेतलें. आणि विधिपूर्वक पाळून त्याचें उद्यापन केलें. पुढें एके दिवशीं त्यांच्यावर आकस्मिक विद्युत्पात होऊन त्या मरण पावल्या. त्या पंचमी व्रताच्या पुण्योदयानें त्या चारही कन्या सौधर्मस्त्रर्गात देवी झाल्या. तेथे पुष्कळ दिवस सुख भोगून त्या आयुष्यांतीं तेथून च्यवून आतां तुला चार कन्या झाल्या आहेत.
या प्रमाणे त्या सुवर्णकुंभ मुनीश्वरांच्या मुखानें सर्वांचा भवप्रपंच
ऐकून अतिशय आनंद झाला. मग त्या अशोक राजाने आपल्या कुटुंबी जनांसह हें रोहिणीव्रत त्यांच्या जवळ ग्रहण केलें. नंतर सर्वजन त्या मुनिद्वयांस नमस्कार करून आपल्या हस्तिनापुरीं परत आले. आणि इकडे सुवर्णकुंभ व रौप्यकुंभ हे दोघे चारणमुनीश्वरहि आकाशमार्गे निघून गेले.
पुढें कालानुसार त्या अशोकराजानें आपल्या कुटुंबी जनांसह है रोहिणी व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केलें. त्या अशोक राजानें आपल्या चारी कन्या देऊन त्या भूपाल नामें आपल्या भगिनीच्या पुत्रास (भाचास) देऊन त्यांचा विवाह केला. पुढे त्या अशोक राजाच्या मनांत या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्या- मुळे त्यानें आपल्या ज्येष्ठपुत्रास राज्यभार देऊन श्रीवासुपूज्य तीर्थकर समवसरणांत जाऊन जिनदीक्षा घेतली. आणि तो तेथे एक प्रतिष्ठित गणधर झाला. आणि ती रोहिणी ही तेथील अर्जिकेजवळ दांक्षा घेऊन आर्यिका झाली. शेवटीं समाधिविधीनें मरून स्त्रीलिंग छेदून अच्युत स्वर्गात देव झाली. असे या व्रताचे माहात्म्य आहे.
या करितां हे भाविकजन हो ! तुम्हीही हे व्रत श्रीगुरुजवळ घेऊन यथाविधि पाळून त्याचे उद्यापन करा. म्हणजे तुम्हांसही सर्व अभ्युदय सुखें मिळून शेवटीं मोक्ष सुखही अवश्य मिळेल.