व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुक्लपक्षांतील अथवा कृष्णपक्षांतील चतुर्थी दिवशीं या ब्रतिकांनी एक-भुक्ति करावी आणि पंचमी दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्या-पश्थशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. नंदादीप देवापुढे लावावा. एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, फुले, अक्षता, फले, चरु, वगैरे ठेवावेत. नंतर अष्टद्रव्यांनी पंचपरमेष्ठींची अर्चना करावी. पंचभक्ष्य पायसादिकांचे चरु करावेत. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौ ह्र : अर्हत्सिद्धाचार्योपाध्याय सर्व साधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्ने घालावींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. हो व्रतकथा वाचावी. श्रीजिन-सहस्रनामस्तोत्र म्हणून एका पात्रांत पांच पाने व त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावा व त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्यादिवशीं उपवास करावा, सत्पात्रांस आहारदान द्यावे. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावें, तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्नध्यानांत काल घालवावा. याप्रमाणे पांच पूजा पूर्ण झाल्यावर याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचपरमेष्ठी विधान करून महाभिषेक करावा. १०८ कमल पुष्पें व फले अर्पण करात्रींत. चतुःसंघांस चतुर्विध दाने द्यावीत. दीन, अनाथ यांना भोजन द्यावे. जिनालयांत पांच कलश, घंटा, तोरणे, ध्वज, चामर वगैरे उपकरणें ठेवावीत. अता याचा पूर्णविधि आहे.
-कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड आहे. त्यांत अंग नामक विशालदेश आहे. त्यांमध्ये गुंडाळपुर नांवाचे रमणोथ नगर आहे. तेथे पूर्वी मेघरथ नांवाचा राजा आपल्या घनानंदी पट्टत्नोसह सुखाने राज्य करीत होता. त्यांना मेघकुमार नांवाचा एक सद्गुणी व सुंदर पुत्र होता. त्याला मनोरमा नांवाचो भार्या अतिशय कावण्यवती होती. तसेच सोमसेन मंत्रो व त्याचो पत्नि सोमदत्ता नामें होती. त्यांना सोमदत्त, सोमभूति, सोमिल असे तीन पुत्र होते. त्यांना अनुक्रमें हेमश्री, मित्रश्री व नागश्री अगा गृहिणी होत्या. या सर्व परिवारा सह तो मेघरथ राजा आनंदांत काल घालवीत होता.
एके दिवशो त्या नगराच्या उद्यानांत एक निर्भय महामुनीश्वर संघासह येऊन उतरले. ही शुभवार्ता वनरक्षकाकडून कळतांच राजा तत्काळ स्यांच्या दर्शनासाठीं पादमा परिवारासह गेला. तेथे त्यांचो वंदना, पूजा, स्तुति करून मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, हे ज्ञानसागर महामुने ! आतां आपण आम्हांस पारमार्थिक सुखाला कारण असे एकादें व्रतविधान निरूपण करावें. हे त्यांचे नम्र भाषण ऐकून ते मुनो त्यांना म्हणाले हे भव्य नरेंद्रा ! पंचपांडव व्रत है पालन करण्यास अत्यंत उचित आहे. असे म्हणून त्यांनी त्याचा सर्वविधि त्यांना सांगितला. तो ऐकून राजादि समस्त जनांस मोठा आनंद झाला. मग सर्वांनी त्यांच्या चरणीं नमस्कार करून दें बत स्त्रीकारिले. नंतर पुनः सर्वजन त्यांना वंदना करून आपल्या नगरीं परत आले. पुढे समयानुसार सर्वांनीं है व्रत यथाविधि पाळिले, राजाला वैराग्य उत्सन्न झालें. मग तो आपल्या विमळवाहन पुत्रांस राज्यमार देऊन सोमसेन प्रधानासह वनांत गेला. तेथे एका मुनी-श्वरांजवळ दोघांनी जिनदीक्षा घेतली. नंतर ते तपश्चरण करूं लागले.
इकडे विमळवाहन राजपुत्र हा सोमदत्त, सोमभूति व सोमिल या त्रिवर्ग मंत्रीसह सुखानें कालक्रमण करूं लागला. सर्वांना सुखकर असा बसंतऋतु प्राप्त झाला. तेव्हां एके दिवशीं तो विमळवाहन राजा आपल्या सर्व परिवारासह वनक्रीडा करण्यासाठीं गेला. स्यावेळीं सोमदत्तानें आपल्या दोघा भावांस आणि आपल्या व त्यांच्या दोघां स्त्रियांत राजाबरोबर वनकोडेस जाण्यास आज्ञा दिली, सगळे गेले. पण नागश्री ही श्रृंगार करीत मागे राहिली.
इतश्यांत अकस्मात् शीलभूषण महामुनि हे चीनेमित्त त्यांच्या घरासमोर आले. तेव्हां सोमदत्ताने त्या मुनीश्वरांचे प्रतिप्रश्ण करून आपल्या घरांत नेले. इतक्यांत एक राजदूत त्या सोमदत्तांस बोला-वणेस तेथे आला, तेव्हां त्या सोमदत्तानें आपल्या नागश्री नामक धाकट्या भावजईस मुनीश्वरांना यथाविधि आहार देण्यास सांगितले. माणि आपण तत्काल राजाकडे निघून गेला.
मग त्या नागश्रोनें ‘आपल्या वनक्रीडेस या मुनीनीं विघ्न्न आणले असे समजून मायाचारार्ने क्रोधाविष्ट होऊन विषमिश्रित आहार दिला. त्यामुळे ते मुनीश्वर विषारी अन्नाने तडफडू लागले. परंतु ते शांतवृत्तोनें सनाधि साधून तत्काल सर्व कर्मक्षय करून मोक्षास गेले.
हा नागश्रीचा अन्याय व पापकर्न त्या सोमदत्तादि तिथे बंधू जाणून त्यांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाले. मग ते तत्काल वनांत गेले. आणि निश्रथ महामुनीश्वराजवळ जाऊन दिगंबर दीक्षा घेऊन बोरतपश्चरण करूं लागले. तेव्हां हेमश्री व मित्रश्री ह्यांनो हि आर्थि केचो दीक्षा घेतलो. त्यादि तपश्चरण करूं लागल्या.
पुढे तपप्रभावाने सोमदत्तादि तिथे बंधु सोळाव्या स्वर्गात महर्दिक देव झाले. आणि हेमश्री व मित्रश्री या दोषी आयिकांहि तपश्चरणाने स्त्रीलिंग छेडून त्याच सोळाव्या स्वर्गात महर्दिकदेव झाल्या तेथे ते पांचहि देव चिरकाल स्वर्गीय सुख मोगू लागले.
तिकडे त्या विमलवाहन राजाने त्या नागश्रीस नगराबाहेर घालविले. मग ती दुर्धर पापामुळे नरकांत जाऊन घोर दुःख भोगूं लागली. नंतर पुढे ती तिर्यचादि अनेक योनीमध्ये पुष्कळ काल दुःख मोगून कांहीं कर्माच्या उपशमामुळे अंगदेशांतील चंपापुर नगरांत एका मांगाच्या घरी कन्या होऊन जन्मलो, बालपणीच आई-बाप मरण पावल्यामुळे ती घरोघरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करूं लागली.
पुढे एके दिवशी त्या चंपापुर नगराच्या उद्यानांत एक महाज्ञानी सुनीश्वर आपल्या संघासह येऊन उतरले. ही शुभवार्ता तेथोल महिपालक राजांस कळतांच तो आपल्या सर्व परिवारांसह त्या मुनीश्वरांच्या दर्शनास गेला. मोठ्या भक्तीनें त्या मुनीश्वरांस त्रिपद-क्षिणापूर्वक वंदनादि करून त्यांच्या समीप बसला. कांहीं वेळ धर्मो-पदेश ऐकल्यावर त्या राजाने व पुष्कळ श्रावक श्राविकांनी अनेक व्रते घेतली. आणि ते सर्वजन त्या मुनीश्वरांस वंदना करून आपल्या नगरी परत गेले.
हे पाहून ती चांडाळ मातंग कन्या त्या मुनीश्वरांस वंदना करून म्हणाली, हे दीन दयानिधे! स्वामिन् ! राज्जादि समस्त लोकांस आपण जे कांहीं दिल, ते मलाहि कृपा करून द्यावे. हे तिचे नम्र वचन ऐकून त्या मुनीश्वरांनी तिला मद्य, मांस, मधुस्यागाचे व्रत दिले. पुढे ती व्रत आनंदाने पाळून अंती शांतवृतोर्ने मरण पावून एका श्रेष्ठीच्या घरी सुकुमारी नामें कन्या होऊन जन्मली. पूर्वजन्मींच्या पापामुळे तिचे शरीर अत्यंत दुर्गंधी झाले.
त्याच नगरांत धनदेव नांवाचा एक सावकार राइत होता. त्याला जिनदेव व जिनदत्त असे दोघे पुत्र होते. त्यांतील जिनदेव नामक ज्येष्ठ पुत्रास त्या सुकुमारीस तिच्या बापाने दिले. ती सुकुमारी अत्यंत दुर्गंधी असल्यामुळे तो जिनदेव वैराग्ययुक्त होऊन जिनदीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागला. आपल्या पति-वियोगामुळे त्या सुकुमारीस अत्यंत दुःख झाले.
पुढे एके दिवशीं सुव्रतमुनीश्वर तेथे आले असतां, त्यांच्या जवळ जाऊन त्या सुकुमारीनें आपला भवप्रपंच विचारला. तेव्हां मुनीनीं सर्व सविस्तर भवपपंच सांगितला. तैं ऐकून तिला मोठा पश्धाचाप झाला. नंतर वैराग्ययुक्त होऊन ती त्या मुनीश्वराजवळ आर्थिकेचो दीक्षा घेऊन तप करूं लागली. त्यावेळीं तिर्ने पूर्वभवींचा तो सोमिल (अच्युत स्वगीतील देव) पुढील जम्भांत आपला पत्ति व्हावा, असे निदान बांधिले. त्यामुळे ती त्याच स्त्रगीत देवी होऊन जन्मली, तेथे सुख ओगू लागली
इकडे ते सोमदत्त, सोमभूति, सोमिल, हेमश्री व मित्रश्री हे त्या अच्युत स्वर्गातील पांच देव आयुष्यांतीं तेथून च्यवून पंडु राजाचे धर्म, भीम, अर्जुन, व नकुल, सहदेव या नांवाचे पांच पुत्र होऊन जन्मले, आणि ती स्वगीतील देवी (पूर्व भवांतील नागश्री) ही अर्जुनाची धर्मपत्नी द्रौपदी झाली. या प्रमाणे यांचा पूर्व मींचा वृत्तांत आहे. असो.
या पंचपांडवांनी अनेक राज्यैश्वर्य भोगून संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे वनांत जाऊन एका मुनीश्वरांजवळ जिनदीक्षा धारण केली. धर्म, भीम व अर्जुन हे विषे अनेक घोरोपसर्ग सहन करून अंतीं शुक्लध्यानाने सर्वकमाचा नाश करून मोक्षास गेले. आणि नकुळ व सहदेव हे दोघे तपश्चरणाच्या प्रमावाने सर्वार्थसिद्धींत अहभिद्रदेव झाले. अता या व्रताचा महिमा आहे.