व्रतविधि – भाद्रपद शु. ४ दिवर्शी या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि ५ दिवशीं उपोषण करावे. शुचिर्भूत होऊन पूजा द्रव्य घेऊन मंदिरास जात्रे, मूलनायक भगवंतांचा पंचामृतांनी अभिषेक पूजा करून सायंकाळीं जिन मंदिरावर उघड्या जागेवर चोवीस तीथ-करांच्या आसघने करितां चतुरस्र पंचमंडळे पंचवर्षांनी काढून-मंडप-शृंगारादि करून चोवीस तीर्थकरांचा पंचामृतांनी अभिषेक करून यंत्र दळामधे एका कुंभावर स्थापना करून सकलीकरणादि नित्यपूजाक्रम करावा. नंतर चोवोस तीवेकराराधना करावी, प्रत्येक महाला स्नपन आणि अर्चन करावें. याप्रमाणें चार वेळां पूजाक्रम करावा. शेवटीं ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं वृषभादिचतुर्विशतितीर्थंकरेभ्यो यक्ष यक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ सुगंधो पुष्ये घालावीत, णपोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. ही व्रतकथा वाचावो. महार्घ्य करून त्याने ओवाळोत तीन प्रदक्षिणा घालून मंग-लारती करावी. दुसरे दिवशों पूजा व दान करून पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
याप्रमाणे पांच वर्षे हे व्रत पूजन करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळी चोवीस तीर्थकराराधना विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. पांच मुनी, आर्थिका यांना पुस्तकादि आवश्यक वस्तू द्याव्यात. पांच दंपतीस भोजन करवून बस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. मंदिरामध्ये ५ घंटा, दर्पण, छत्र, चामर इत्यादि आवश्यक उपकरणें ठेवावीत, अप्ता याचा पूर्णविधि आहे.
कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांमध्ये सोरठ नांवाचा देश असून त्यांत तिलकपुर नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी महिपाळ नामक राजा आपल्या विचक्षणा राणीसह हास्यविनादामुळे सुखाने राज्य करीत होता. तेथेच भद्रशहा नांवाचा एक व्यापारी आपल्या नंदा नामें स्त्रीसह नांदत होता. त्यांना विशाला नांवाची एक कन्या होती. ती रूपवती व गुणवती होती. परतु पुढे तिच्या ओठाला पांढरा कोढ भरला. स्यामुळे तिच्याशी कोणी लग्न करेना. तेव्हां ती उदास डोणे साहजिकच आहे. त्यामुळे तिच्या मातापित्यांसहि फार दुःख होऊं लागले. एकदां तिची माता तिला म्हणालो दे बाळे! आपण कांडी पाप कर्म केले असेल त्याचे फल भोगले पाहिजे, तेव्हां तू आता धर्मकृत्याकडे पूर्ण लक्ष लाव, म्हणजे है दुःख नाहीसे होईल, ते ऐकून तो नित्य देवपूआ, स्तुति, वंदना, मंत्रजाप्य, दान वगैरे धर्मकृत्यै शुममावनेने काळजीपूर्वक करूं लागलो, बते नियम यांत नेहमी ती मग्न असे.
तिच्या या प्रभावामुळे एके दिवशी एक पिंगल नामे वैद्य तेथे आला आणि म्हणाला, अहो श्रेष्ठी! ह्या तुमच्या कन्येवा रोग बरा केल्यावर हो मुलगो तुम्हीं मला द्याल काय? बाप म्हणाला, बरे. नंतर वैद्याने श्रीसिद्धचक्राचें पूजन करून औषध दिले. त्यामुळे तिचा तो रोग बरा झाला. मग त्या भद्रशहाने लग्नविधि करून आपको कन्या त्शंस दिलो. नंतर तो पुष्कळ दिवस तेथेच राहून पुढे आपल्या स्त्रीसह आपल्या गांवाला निघाला. जातांना मेवाड देशांत चितोडगड येथे आला. तेथील भिल्ल लोकांनी त्याला गांडून त्याच्या जवळील सर्व चोजवस्त लुटून नेको. इतकेच नव्हे तर त्या पिंगलास ठार मारिलें. नंतर तो विशाला त्या चितोडगढ शहरांत आली. आणि तेथील जिनमंदिरांत गेलो, भगवंतांचे दर्शन केले. सभामंडपांत मुनीश्वर बसले होते. त्यांच्या समोप जाऊन वंदनादि करून बसून आपली सर्व इत्थंभूत हकिगत तिने त्यांना सांगितली. आतां मी काय करूं? मला कांीं सुचेना. तेव्हा विशाला मोठ्या संकटांत पडली आहे हे जाणून त्यांना तिचो दया आली. आणि ते म्हणाले, हे कन्ये ! आपण केलेलें कर्म भोगल्याशिवाय सुटत नाहीं. पूर्वजन्मीं जे पातक कैलें आहेस व ज्यांचे फळ इल्लीं तूं मोगीत आहेस त्याचे वर्णन करून सांगतों ऐक.
पूर्वी एका जन्मांत तू ह्याच शहरांत वारांगना होतीस. तूं स्वरू-पार्ने फार सुंदर असून नृत्य करण्यामध्ये अतिशय कुशल होतीस. एके दिवशी सोमदत्त नामक महामुनि या नगरांत आले, श्रावक लोकांना आनंद झाला. दररोज अनेक प्रकारचे उत्सव होऊं लागले. राजाच्या इत्तीवरून त्यावर श्रुतदेवी विराजमान करून मोठ्या थाटाने मिरवणूक जिनमंदिरांत आणली. ते शास्त्र घेऊन दररोज मुनिराज सांगत होते. लोक मोठ्या उत्कंठेनें नेमलेल्या वेळीं येऊन उपदेश श्रवण करीत असत डा सगळा महोत्सव पाहून ब्राह्मणलोक द्वेष करूं लागले. त्यांनी मुनीशीं मोठा वाद केला. त्यांत मुनींनीं ब्राम्हणांस जिंकिले, ते पाहून सगळ्या श्रवकांना संतोष झाला. मात्र ब्राम्हणांच्या मनांत द्वेष बाहूं लागला.
त्यांनी मुनींचा छळ करण्याचा दुसरा एक उपाय योजिला. तो असा, तुझा जीव त्यावेळीं कलावंतीण स्वरूपाने होता. तेव्हां त्यांनीं एक कलावंतीण जी बोलाविली ती तूंच. मग त्यांनीं तुला सांगितले कीं; जर त्या मुनीचे ब्रम्हचर्य तूं भ्रष्ट करशील, तर तुला पुष्कळ द्रव्य देऊ. मग तूं द्रव्याच्या लोभाने श्राविकेचे सोंग घेऊन रात्री एकटोच देवळांत जाऊं लागलीस व मुनींना मोहांत पाडण्यासाठीं अनेक प्रकारचे प्रयत्न करूं लागलीस. शेवटीं मुनींना आलिंगन देखील दिलेस. तथापि मुनी आपल्या ध्यानापासून चलायमान झाले नाहींत. मेरुपर्वताप्रमाणे निश्चल बसले होते. तूं निरुपाय होऊन मनांत लाजलीस. तुला मोठें आश्चर्य वाटलें कीं;-एका नेत्रकटाक्षानें जी मी मोठमोठ्याला नादीं लावणारी प्रसिद्ध जारिणी असूनहि हा मुनि डोळे उघडून पाहात देखील नाहीं. हे केवढे आश्चर्य ! धन्य धन्य ह्या योग्याचो ! शाबास त्यांच्या जितेंद्रियपणाला ! याप्रमाणे मनांत म्हणून ती परत ब्राम्हणाकडे आली आणि तिने खरी हकिगत त्यांचे द्रव्य न घेतां सांगितलो व म्हणाली, – पुरुषांना कामविकार उत्पन्न करण्यासाठीं माझे जितके कसव हो ततके सर्व भीं केले. परंतु मुनाने आपले चित्त ढळू दिलें नाहीं. हैं ऐकून ते सर्व निर श झाले. त्यानंतर तुला फार पश्चात्ताप झाला. तूं म्हणालीस कीं, अरेरे! मीं मुनींना विनाकारण उपसर्ग केला. दुष्ट लोकांच्या सांगण्यावरून मी ह्या योग्याला छळिलें, धिःकार असो या माझ्या जन्माला अहा हा! केवढो ही जैनधर्माचो महिमा | श्रावकांच्या कुळांत जन्म होणे केवढे भाग्याचे आहे ? इत्यादि अनेक प्रकारे तुला पश्चात्ताप झाला. पुढे तुला कोड रोग उत्पन्न झाला आहे. मरणानंतर तुं त्या पातकामुळे चौथश नरकांत गेलीस तेथे दडामागर वर्षेपर्यंत दुःस्वांत आपले आयुष्य घाल-विलेस, तेथून पश्चात्तापाच्या कांहीं पुण्याईने भद्रशाडाच्या पोटी तूं हा जन्म घेतलोस. तेथे तुला पांढर कोढ उत्पन्न झाला. मग तो पिंगल नामक एका वैद्याने बरा केला, आणि तुझशीं त्याने विवाह केला. पिगलाच्या फांदी पातकाच्या उदयामुळे त्याला चोरांनी ठार मारिलें. मग तूं येथे आलीस. अशी तुझ्या जन्मांतरींची कथा आहे. आपण केलेली पातर्फे धर्म केल्याने नाहींशो होतात. तेव्हां आतां तू धर्माचर-णाच्या अंगीकार कर म्हणजे ह्या पापाच्या त्रासांतून सुटशोल. प्रथम तूं मम्यक्त्वासह दारा व्रते ग्रहण कर. नंतर आकाशपंचमी म्हणून उत्तम व्रत आहे. ते घे. असे म्हणून त्यांनी त्याचा सर्वविधि सांगितला.
यापमाणे सद्गुरुमहाराजांच्या मुखाने हे सर्व ऐकून विशालाक्षीन हे व्रत घेतले. आणि सभयानुसार यथोक्त रीतीने त्याचे पालन केलें. शेवटीं आयुष्यांतों व्रत-तप-फलाने तो चौथ्या स्वगीस गेलो. तेथे तो जीव मणिपीठ विमानामध्ये मणिभद्र नांवाचा देव झाला. स्वर्गीय सुख मोगीत जिनकेवली समवसरणदर्शन, तीर्थयात्रा, बंदनादि करीत सात ७ सागर वर्षे आयुष्य तो घालविला. नंतर तेथून च्यवून तो-मालत्र देशांतील उज्जयनी नगरांत प्रियंगसुंदर राज्जाची राणी तारामती तिचे उदरीं जन्मला. त्याचे सदानंद असे नांव ठेविले. थोर झाल्यावर श्रावकांची बारा व्रते पाळून युवराजपदाचे सौख्य मोगू लागला.
एके दिवशों त्या नगराच्या उद्यानांत एक महामुनीश्वर येऊन उतरले. तेव्हां त्यांच्या दर्शनास सदानंद गेला. त्यांच्या मुर्ख धर्मा-धर्माचे स्वरूप ऐकून त्याला वैराग्य उत्पन्न झाले. सर्वसुखाचो आशा सोडून त्याने जिनदीक्षा त्यांच्या जवळ घेतलो, घोर तपश्चरणाने व शुक्लध्यान बलाने त्याला केवलज्ञान प्राप्त झाले. मग मव्याल्यांना धर्मामृत पाजवून तो शेवटीं मोक्षास गेला.