व्रतविधि – भाद्रपद शु. ११ दिवशीं प्रातःकाळीं या व्रत धार- कांनीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनें- द्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर पंचपरमेष्ठी मूर्ती यक्ष, यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें पूजन करावें. पंचपकान्नांचे पांच चरु करून त्यांना केळी, साखर, तूप, दूध ते लावावें. ॐ हां हीं हूं हौं छः असिआ- उसा अनाहतविद्यायै नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हा व्रतविधी पाहून शास्त्रस्वाध्याय करावा. एका पात्रांत पांच पानें मांडून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून एक महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घाढून मंगळा- रती करावी. त्या दिवशी उपवास करावा. मम्चर्यपूर्वक चर्मव्यानांत काळ घालवावा. दुसरे दिवशी सत्पात्रास आधारदान देऊन आपण पारणे करावें.