एके दिवशीं श्रुतकीर्ति हा आपल्या प्रियभार्येसह नंदन वनांत गेला होता. ती बंधुमती तेथे एका वृक्षाच्या छायेंत निजली व तो श्रुतकीर्ति फुळे तोडण्यासाठीं दुसरीकडे गेला. त्यावेळीं इकडे त्या बंधु- मतीस सर्पदंश होऊन ती मृत्यु पावली. मग श्रुतकीर्ति तिच्या जवळ येऊन पाहूं लागला, तों ती मृत होऊन पडली होती, हे पाहून तो अत्यंत दुःखाकुळ होऊन शोक करूं लागला, मग तिच्या परिवार जनांनी तिचा दहनसंस्कार केला आणि त्या श्रुतकीर्तीचे अनेक प्रकारें सांत्वन केलें व त्याला घरी आणिलें. तथापि तो मोहानें शोक करीच. एके दिवशीं तिच्या दानपूजादि उत्तरक्रिया सर्व झाल्या. मात्र तो श्रुतकीर्ति आपल्या पत्नीच्या शोकानें भ्रमिष्ट होऊन बसू लागला.
इकडे रत्नसंचयपुरांतील रत्नशेखर राजाच्या आयुध शाळेत अजिंक्य चक्ररत्न उत्पन्न झाले. तेव्हां तो राजा आयुध शाळेत जाऊन त्या चक्ररत्नाची पूजा करून सर्व सैन्यांसह दिग्विजयास गेला. षट्खंड पृथ्वी साध्य करून तो आपल्या नगरी परत आला आणि सुखानें मोठ्या ऐश्वर्यात काळक्षेप करूं लागला.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|