व्रतविधि – कार्तिक शु. ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करून पंचमीच्या दिवशीं प्रातःकाळी सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयांस जावें. येथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊ ईर्यापधशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास सक्तीनें साष्टांग प्रणि- पात करावा. मंडप श्रृंगारून वरती यंत्रयुक्त चंद्रोपक बांधायें. देवापुढेंच शुद्धभूमीवर पंचवर्णानीं श्रुतस्कंध यंत्र वारा व चौदा दांचे यंत्र-काढून त्यांच्या सभोवती चतुरस्र पंचमंडळे काढावीत. आठ-मंगलकुंभ व अष्टमंगळ द्रव्ये ठेवावीत. पंचवर्णसूत्र व नूतनवन गुंडाळावे. मध्यभागी एक सुशोभित कुंभ ठेवून त्यावर एक ताट ठेवावा. त्यांत अष्टगंधानें श्रुतस्कंध यंत्र काढावें व २६ पार्ने डावून त्यांवर अष्टद्रव्ये ठेवावीत. त्यानंतर श्रीपीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह व श्रुतस्कंध यंत्र स्थापून त्यांचा पंचमृतांनी अभिषेक करावा. मग चोवीस तीर्थकर प्रतिमा व श्रुतस्कंधयंत्र मंडपामध्ये यंत्रदळांतील ताटांत ठेवून त्यांचीं आराधना करावी. नित्यपूजाक्रम वै श्रुतस्कंध विधान वाचून क्रमानें अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. नैवेद्ये २६ करावीत. विधानांतील पुष्पमंत्र किंवा जाप्य- मंत्र यांनें १०८ वेळां पुण्वें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांत २६ पानें मांडून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्थ करावें. आणि त्यानें ओवाळित मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी, त्यादिवशी उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. ब्रम्हचर्य पाळावे.
पुढें एके दिवशी यशोधर नामक नगराच्या उद्यानांत येऊन उतरले. ही महाअवधिज्ञानी महामुनि त्या शुभवार्ता त्या नगरांतील राजांस कळतांच तो आपल्या सर्व परिवारजन व पुरजन यांच्यासह त्या मुनी- श्वरांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्यांना तीन प्रदक्षिणा घालून • त्यांचे दर्शन, पूजन व स्तवनादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला. मगकांही वेळ त्यांच्या मुखानें धर्मोपदेश ऐकल्यावर तो सोमदत्तराजपुरोहित विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्या मुनीश्वरांना म्हणतो, हे दयासागर महामुने आमच्या या कन्येची वाचा एकदम बंद झाली आहे ! याचें कारण काय ? याला काय उपाय करावा ? हे कृपा करून मला सांगावे. हे त्याचें बिनयपूर्ण वचन ऐकून ते यशोधर महामुनि आपल्या अबधि- ज्ञानानें त्या कन्येची सर्व परिस्थिती जाणून म्हणाले, हे सुविचारी पुरोहिता ! या नगरामध्ये कांही दिवसापूर्वी सुगुप्ताचार्य नामक महा- ज्ञानी मुनिराज मासोपवासी आहारानिमित्त आले असतां – तुझ्या ह्या कन्येनें त्यांच्या अंगावर जुगुप्तेनें धुंकिळे होते. त्या पापामुळे तत्काळ हिची वाचा बंद झाली आहे. आतां तिनें बृहत् श्रुतस्कंधव्रतविधान यथाविधी पालन करावे, म्हणजे त्यायोगाने तिची वाचा फुटेल. असे म्हणून त्या व्रताचा सर्वविधि सांगितला. हे ऐकून सर्वाना आश्वर्यपूर्वक आनंद झाला. मग तो विजयंधर राजा, सोमदत्त व ती सोमवा पुरोहितकन्या यांनी हे व्रत त्या मुनीश्वरांस प्रार्थना करून घेतलें. मग सर्वजन त्या मुनीश्वरांना भक्तिनें नमस्कार करून आपल्या नगरों परत आडे. पुढें कालानुसार त्यांनी ते श्रुतस्कंधत्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केलें. त्या व्रतपूजनांस प्रारंभ होतांच त्या कन्येची वाचा पूर्ववत् फुटली. मग पुढे ती सोमदत्ता एका आर्थिकेजवळ जाऊन – ब्रम्हचर्य ‘व्रत घेती झाली. पुढे तिनें आर्थिकेची दीक्षा घेऊन अंतकाळीं समाधि मरण साधिले. त्यायोगें ती त्रिलिंग छेदून सोळाव्या अच्युत स्वर्गात इंद्र झाली. तेथें तो देवेंद्र दीर्घकाळ पुष्कळ सुख भोगू लागला.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|