या जंबू द्वीपांतील भरत क्षेत्रांत अवंति नांवाचा एक मोठा देश आहे. त्यांत चंपापुर नामक एक रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी श्रीपाल या नांवाचा एक मोठा सद्गुणी, शूर, नीतिमान् असा राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमति नांवाची एक रूपवती, गुणवती, सुशील, अशी पट्टराणी होती. अशा रीतीनें तो राजा सुखाने कालक्रमण करीत असतां, त्या नगराच्या उद्यानांत श्रुतसागर नामक एक अवधिज्ञानी महामुनि आपल्या संघासहित येऊन उतरले. हैं शुमवृत्त तेथील वन- पालकांकडून त्याला कळतांच; तो आपल्या सर्व परिवार जन व पौर- जनांसह मोठ्या थाटानें पादमार्गे त्या मुनीश्वरांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर राजानें त्यांना तीन प्रदक्षिणा घालून भक्तीनें नमस्कार करून त्यांच्या सन्निध जाऊन बसला. त्याच्या मुखानें कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर लक्ष्मीमति राणी आपले दोन्ही हात जोडून विनयाने त्या मुनीश्वरांस म्हणाली, हे दयासागर स्वामिन् ! आज आपण आम्हांस परम सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान सांगावें. हे तिचे विनयपूर्ण भाषण ऐकून ते मुनीश्वर तिला म्हणतात, हे कन्ये ! आतां तुला दुरितनिवारण है व्रत पालन करण्यास अतिशय योग्य आहे. हें व्रत जे पाऊन करतात त्यांच्या पापांचा नाश होऊन अपार पुण्यंबंध होतो. त्यायोगें त्यांना ऐहिक सुखसंपत्ति प्राप्त होऊन क्रमाने मोक्षसुख ही अवश्य मिळतें. असा या व्रताचा प्रभाव आहे. आंता या व्रताच्या काळ व विधि तुला यथास्थित सांगतो ऐक असें म्हणून, यांनी या व्रताच्या काल व विधी सर्व सांगितला.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|