व्रतविधि-श्रावण शु. ३ दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्र धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथंशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर पार्श्वनाथ तीर्थंकर प्रतिमा घरणेंद्र यक्ष व पद्मावर्ती यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करून घृतशर्करायुक्त पायसांचे चरु त्यांना अर्पण करावेत.
श्रुत व गुरु यांची पूजा करून यश्क्ष व यक्षी आणि श्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अहे श्री पार्श्वनाथ तीर्थकराय घर- चंद्रयक्ष पद्मावतीयक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक नारळ लावून महार्घ्य करून त्यांनें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. शक्तिप्रमाणें त्यादिवशीं उपवास अगर कांजिकाहार एकभुक्ति, एकाशन करून ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घाळबाधा. दुसरें दिवशीं चतुर्विध -संघास आहार दान देऊन तीन सुवासिनी स्त्रियांस भोजन करवून त्यांच्या ओटींत पान, गंधाक्षता, फळ, पुष्पें वगैरे धाळून आदर सत्कार करावा. नंतर आपण पारणें करावें.
या प्रमाणें भाद्रपद, आश्विन, कार्तिक या मासाच्या शु० ३ दिनीं पूर्वोक्त विधीप्रमाणें पूजाक्रम करावा. शेवटीं (कार्तिक शु. ३ ब्या दिवशींच) या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळी पार्श्वनाथ तीर्थकरांस महाभिषेक करून त्यांची अर्चना करावी. क्षेत्रपालास विधीपूर्वक तैला- मिषेक वगैरे करावें. पायस, सेवाया, १० तेलाच्या पोळ्या, १० पुर- णाच्या पिठाच्या पोळ्या, सुशोभित एक कलश करून त्यावर नारळ ठेवावा. केळी, भिजविलेले “हरभरे, तिळाचे १० लाडू, राळ्याचे गुळपीठ, (तंबिट्टु) गूळ यांनें देवास अर्चना करावी. सरस्वतीस पांच पोळ्यांचें नैवेद्य करावें. तसेंच गणधरांसहि करावें. पद्मावतीस ८ “पोळ्यांचा चरु करावा. क्षेत्रपालांस ५ पोळ्यांचा चरुरावा. वाळितोड करमणी पद्मावतीपुढे ठेवावें. ८ सुवासिनी श्राविकांना तेलाच्या पोळ्या फलपुष्पांसह द्याव्यात. शेवटी महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिखस तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. चतुर्विध संघास चतुर्विधदानें द्यावीत. त्यादिवशीं उपवास केल्यास दुसरें दिवशीं पारणें करतांना दान देऊनच करावें. असा यांचा पूर्ण विधी आहे.
या मनोहर जंबू द्वीपांतील पवित्र भरत क्षेत्रांत कांभोज नांवाचे एक रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी देवपाल नामक पराक्रमी राजा आपल्या लक्ष्मीमती राणीसह अतिशय हास्यविनोदांत सुखाने राज्य करीत होता.
एके दिवशीं त्या नगरोद्यानांत ज्ञानसागर नामक दिगंबर महामु निराज आगमनाचे वर्तमान वनपालकाने राजास येऊन कळविले. तेव्हां राजानें सिंहासनावरून उठून ज्या दिशेस मुनिराज आले होते, त्या • दिशेकडे सात ७ पाऊले चालून विनयपूर्वक प्रणिपात केला; आणि आपल्या अंगावरील वस्त्रालंकार त्या वनपालकांस दिले. नंतर तो मोठ्या समारंभाने परिजन व पुरजनसह पादमार्गे त्या उद्यानवनात गेला. मग मुनीश्वरांस तीन प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीनें त्यांची पूजा, स्तुति करून जवळ बसून धर्मोपदेश ऐकूं लागला. कांहीं वेळ धर्मश्रवण केल्यानंतर त्यांची सुशील धर्मपत्नी लक्ष्मीमति ही अत्यंत विनयानें आपले करकमल जोडून त्यांना म्हणाली, भो जगद्गुरो स्वामिन् ! आपण संसारसागरतारक आहात. आतां मला सुखदायक असे एकादें व्रतविधान सांगावें. हे तिचें नम्र वचन ऐकून ते तिला म्हणाले- हे भाविक कन्ये ! तूं पार्श्वतृतीयात्रत हैं व्रत पालन कर. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. असें म्हणून त्यांनी तिला सर्व व्रतविधी सांगितला. तें ऐकून लक्ष्मीमतीस फारच आनंद झाला. मग ते सर्व जन गुरुराजांस नमोस्तु करून नगरी परत आले. पुढे कालानुसार तिनें हें व्रत पाळून शेवटी याचे उद्यापन केलें व अपूर्व पुण्य संचय केला. त्यायोगें ती सर्व अभ्युदय सुखें भोगून क्रमानें त्रीलिंग छेदून मोक्षास गेली.