व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पत्रीत अष्टमी दिवशीं या व्रतधारकांनी प्रातःकाळीं प्रासुक जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वखें धारण करा- बींत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर चतुर्विंशति तीर्थकर प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. देवापुढें शुद्ध आसनावर त्रिकालती- र्थकरांची नांवें उच्चारित ७२ बाहत्तर स्वस्तिकें काढून त्यांवर पार्ने मांडावींत. त्यांवर अष्टद्रव्यें लावावीत. नंतर श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें, ॐ हीं श्रीं ह्रीं ऐं अर्ह वृषभादिवर्धमानांत्यचतुर्विंशतितीर्थकरेभ्यो यक्षयक्षीसहि- तेभ्यो नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. श्री जिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशी शक्ती- प्रमाणें उपवास, एकमुक्ति, कांजिकाहार अथवा एकाशन करावें. ब्रम्हचर्य पाळावें.काली,
याप्रमाणें प्रत्येक अष्टमीस पूजाक्रम करावा. प्रतिदिनीं जिनेश्वरांस क्षीराभिषेक करून देवांपुढें ७२ अक्षतपुंज घालून प्रणिपात करावा.
या क्रमानें एक वर्षभर पूजाक्रम करणे हा उत्तम प्रकार समजावा. आठ महिनें पूजाक्रम करणें मध्यम आणि चार महिनें करणें जघन्य प्रकार समजावा. यांपैकी कोणत्याहि प्रकारें पूजाक्रम पूर्ण झाल्यावर पुढे येणाऱ्या अष्टान्हिकांत त्रिंशच्चतुार्शति (तीस चोविसी) विधान करून
या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळी चतुःसंघात चतुर्विधदानें द्यावीत. असा याचा पूर्ण विधी आहे. – कथा-
या जंबू द्वीपांतील भरत क्षेत्रांत अवंति नाम विशाल देश आहे. त्यामध्ये हास्तिनापुर नामक एक सुंदर नगर आहे. तेथे प्राचीन काळी जयंघर नांवाचा एक मोठा पराक्रमी व धर्मशील राजा नीतीने राज्य करीत असे. त्याला जयावती नामे एक पट्टराणी होती. ती अत्यंत रूपवती आणि गुणवती होती. ही दंपती मोठ्या आनंदानें राज्यभोगांचा अनुभत्र घेत असतां, एके दिवशी त्या नगराच्या बाहेर देवानंद उद्यान बनांत एक पांचशे ५०० मुनीश्वरांचा समुदाय येऊन अवतरला. तेव्हां तेथे असलेल्या वनपालानें राजप्रसादीं ही मुनी आल्याची शुभवाती राजांस मोठ्या उत्सुकतेनें कळविली. तेव्हां त्यांना अतिशय आनंद झाला. मग त्यांनी आपल्या सेवकांकडून नगरांत मुनि आगमनाची आनंदमेरी देबविली. नंतर तो आपले सर्व परिजन व पुरजन यांच्यासह पादमार्गे त्या उद्यानांत गेला व भक्तीनें मुनीश्वरांस तीन प्रदक्षिणा देऊन नमस्कार करून त्यांच्या सन्निध बसला. कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर त्यांची पट्टराणी जी जयावती तिनें अत्यंत विनयानें आपली दोन्हीं करकमळे जोडून त्या गणनायक मुनींद्रांस प्रश्न केला, – हे भवसागर- तारक स्वामिन् ! आज आपण आम्हांस सद्गति सुखाला कारण असे एक व्रतविधान सांगावें. हे तिचें विनयवचन ऐकून ते मुनींद्र तिला म्हणाले, हे कन्ये ! आतां तुला नित्यानंद व्रत हे पालन करण्यास योग्य आहे. कारण हें व्रत जे स्त्रीपुरुष पालन करतील त्यांना शुभ कर्माचे आस्रव होतात. त्यायोगें इहलोकी अनेक सुखें मिळून पुढें स्वर्ग प्राप्त होते आणि क्रमानें मोक्षप्राप्ति अवश्य होते. असा या व्रताचा प्रभाव आहे. असें म्हणून त्यांनी तिला सर्व विधी सांगितला. आणि म्हणाले, हें व्रत पूर्वकाळीं ज्यांनीं भक्तीनें गुरुजवळ घेऊन पाळून उद्यापन केलें त्यांची कथा संक्षेपांत सांगतो ऐक.
या भरत क्षेत्रांत आर्या खंड आहे. त्यांत मगध नांवाचा एक विशाल देश आहे. त्यांत राजगृह नांवाचे मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी सिंहस्थ या नांवाचा एक महापराक्रमी, नीतिमान् व गुणवान असा राजा राज्य करीत होता. त्याला छक्ष्मीमति या नांवाची एक रूपवती, गुणवती व धर्मशील अशी पट्टराणी होती. इच्यासह तो सुखानें राज्यो पभोग करीत असे, त्या नगरांतच धनपाल नांवाचा एक धनिक गृहस्थ राहत होता. त्याला नंदावती नामें गुणवती खी असे. इच्या- पासून त्याला सुरदत्त, विमल व विकार या नांवाचे तीन पुत्र जन्मले होते. यांच्यासह तो गृहस्थ सुखानें काउक्रमण करीत असतां, एकदां त्यांच्या मनांत या क्षणिक संप्ताराविषयी वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो बनांत जाऊन एका मुनीश्वराजवळ निर्मथ दीक्षा ग्रहण करून तपश्चर्या करूं लागला.
इकडे त्याचा ज्येष्ठ पुत्र सुरदत्त हा सप्तव्यसनी अत्यंत आसक्त होऊन आपल्या जीवितांतीं मृत्यु पावून तिसऱ्या नरकास गेला. तेथे अतिशय दुःख भोगून पूर्वभवार्जित पुण्यानें तेथील आयुष्य संपल्यावर तो या लोकीं येऊन, या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत विजयार्ध नामें एक पर्वत आहे. त्याच्या दक्षिण भागी भेघकूट नांवाचे एक पुर आहे. तेथे रुद्रदत्त नांवाचा एक वैश्य असून त्याला विमला नांवाची एक खी होती तिच्या पोटीं तो पूर्वोक्त नारकी जीव पुत्र झाला. त्याचे नांव दुर्मुख असे ठेविलें. त्याचे आई बाप बालपणीच मेल्यामुळे तो परगृहीं मोठ्या कष्टाने वाढला. परंतु तो केवळ आपल्या नांवानेंच दुर्मुख नेसून रूपानेंहि तसाच होता. त्या कारणाने तेथील सर्वलोक त्याची नाना प्रकारांनी निंदा करूं लागले. ते ऐकून तो आपल्या मनांत रात्रंदिवस झुरत असे.
पुढे एके दिवशी विमलवाइन नामक महामुनि दिव्यज्ञानधारी चर्या निमित्त त्या पुरीं आले. त्यांना पाहून दुर्मुखाच्या मनांत असा
विचार उत्पन्न झाला की, हे मुनीश्वर चर्या करून जेव्हा यांत जातील तेव्हां आतां आपणहि त्यांच्या बरोबर वर्नात जावें.’ मुनिराज आपली चर्या पूर्ण झाल्यावर वनी निघाले त्यावेळी हा दुर्मुखहि त्यांच्या पाठीमागून चाळला. मग ते मुनीश्वर अरण्यांत जाऊन एका अशोक- वृक्षाच्या खालीं एका स्फटिकशिलेबर बसले. तेव्हां दुर्मुखहि तेथे जाऊन त्यांना भक्तीनें साष्टांग नमस्कार करून त्यांच्या सन्निध बसला. ते महा- मुनिवर त्याला पाहून संतुष्ट झाले, आणि आपल्या अवधिज्ञानाने हा भव्यजीव आहे असे जाणून दयार्द्रबुद्धीनें त्यास म्हणाले, हे बाळा ! तूं आपल्या पूर्वभवांमध्ये नरकांत अनेक दुःखें भोगून आतां येर्थे मनुष्य होऊन जन्मला आहेस. आतां तुझें आयुष्य केवळ तीन दिवस राहिले आहे. हे मुनीश्वरांचे वचन ऐकतांच तो आपले करयुग जोडून त्यांना म्हणू लागला कीं; भो महागुरो ! आतां आपण माझ्या पापांचा परि- हार होण्यासाठीं मला एकादा उपाय सांगावा. कुमाराचें हें दीनवचन ऐकून ते मुनींद्र त्यांत म्हणाले, हे पुत्रा ! तूं जिनदीक्षा ग्रहण कर हाच तुला आमचा महाप्रसाद आहे. असे समज. हें त्यांचे दयापर वचन ऐकतांच त्याला आंधळ्यांस डोळे मिळाल्या इतका अति संतोष झाला. मग तो त्यांच्या जवळ जिनदीक्षा घेऊन तिसऱ्या दिवशीं समा- धिविधीनें मरण पावून ब्रम्ह कल्पांत देव होऊन जन्मला. त्या ठिकाणीं तो पुष्कळ काळपर्यंत दिव्यमुखांचा अनुभव घेऊं लागला.
तेथील आयुष्य संपतांच च्यवून या मृत्युलोकीं तो (दुर्मुखजीव स्वर्गीय देव) या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत विजयार्द्ध पर्वताच्या दक्षिणश्रेणीवर रथनुपुर म्हणून एक सुंदर पट्टण आहे. तेथें वज्रबाहु नांवाचा राजा राज्य करीत असे. त्याला विनयावती नामक पट्टराणी होती. तिच्या उदरीं अनंतवीर्य नामें पुत्र झाला. तो यौवनावस्थेत येऊन अत्यंत कलाप्रवीण झाला.
पुढें एके दिवशीं तो मेरुपर्वतावर अकृत्रिम चैत्यालयांची बंदना करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे एका चैत्याठ्यांत अभयघोष नांवाचे एक चारण महामुनि बसले होते. तेव्हां हा त्यांना पाहून त्यांच्या समीप जाऊन भक्तीने त्यांच्या चरणीं नमस्कार करून धर्मश्रवण करीत बसला. कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यानंतर तो त्यांना विनयाने म्हणाला, हे संसारसागरतारक स्वामिन् ! आतां आपण आम्हांला संसार दुःख नाशक व नित्यसुखदायक असें एकादें व्रतविधान सांगावें. ही त्याची बिनयोक्ती ऐकून ते चारणऋषी त्याला म्हणाले, हे भव्योत्तमा ! आतां तुला’ नित्यानंद’ व्रत पाचन करण्यास योग्य आहे. कारण हे व्रत मानवांस सर्व सुखें प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा सर्वविधी त्याला सांगितला. ते ऐकून त्याला मोठा आनंद झाला. नंतर त्यानें त्यांना भक्तीनें वंदना करून ते व्रत ग्रहण केलें. मग सर्वांनीं त्या मुनीश्वरांस नमस्कार करून आपल्या नगरी प्रयाण केलें. पुढे समयानुसार त्यांनीं ते व्रत यथाविधी पालन करून अंती त्याचें उद्यापन केलें. या व्रताच्या पुण्यप्रभावानें तो त्रिज्ञानधारी होऊन कित्येक दिवस राहिला. मग जिनदीक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागला. शुक्लघ्या- नाच्या सामर्थ्यानें स्नर्वकर्माचा क्षय करून शेवटीं तो मोक्षास गेला. मग तेथें नित्य अनंतसुख भोगूं लागला.
हें सर्व कथन व पूर्वोक्त व्रतविधी त्या मुनीनायकांच्या मुखानें ऐकून सर्वांत मोठा आनंद झाला. मग ते जयंधर महाराज आणि त्या विन- यावती राणी हे दोघेहि हैं व्रत गुरुजवळ घेऊन त्यांना वंदना करून सर्व लोकांसह आपल्या नगरी परत आले. पुढें कालानुसार त्यांनीं हूँ व्रत पाळून त्याचे उद्यापन केलें. आयुष्यावसानीं ते स्वर्गादि सुखे अनुभवून क्रमानें मोक्षास गेळे आणि तेथे अनंत सुखांत निमग्न झाले.