या प्रमाणें अष्टमीस व चतुर्दशीस पूजाक्रम करीत नऊ पूजाक्रम पूर्ण झाल्यावर याचें उद्यापन करावें. (श्रावणांत ४ पूजा, भाद्रपदांत ४, आश्विन शु० ८ ची १ मिळून नऊ पूजा होतात प्रतिदिनी चोवीस तीर्थकरांस क्षीराभिषेक करावा. नंदादीप लावावा. सायंकाळी कर्पूर दीप व धूप यांनीं पूजा करावी.) त्यावेळीं चतुर्विंशति तीर्थकर प्रतिमा नूतन तयार करवून तिची पंचकल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. पांच प्रकारचे पायस, पोळ्या, करंज्या, लाडू यांचे नऊ चरु करावेत. एका पाटावर नऊ स्वस्तिकें काढून त्यांवर नऊ पार्ने मांडावीत. नंतर त्यांवर अष्टद्रव्यें लावून अक्षत पुंज ठेवावेत. आणि नऊ केळी, नारळ, तिळाचे लाडू, राळ्याच्या पीठाच्या ठाडू, भिजलेले हरभरे पुंज, खडीसाखर (कळशोगर) बाडितोड करमणी (पादहस्तभूषणे.) हीं सर्व क्रमानें ठेवावीत. (चरु-चोवीसतीर्थकर) श्रुत, गणधर, पद्मावती, ब्रम्हदेव यांना अर्पण करावेत. ब्रम्हदेवास ब्रम्हवत्र द्यावें. चतुर्विधसंघास चतुर्विध दानं व आवश्यक वस्तू द्याव्यात. असा याचा पूर्णविधी आहे.