या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत अवंति नांवाचा एक देश असून त्यांत चंपापुर या नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी श्रीपाल नामक एक महामंडलेश्वर राजा सुखाने राज्य करीत असे. तो इरिवंशरूपी आकाशांत सूर्याप्रमाणें भासत असे. तसेंच तो जगाचा चूडामणी जणं काय सद्धर्माचे रक्षण करणारा असल्यानें रक्षामणिच होता. त्याला मदनावळी नामे एक गुणवान्, रूपवान्, सद्धर्मशालिनी अशी पट्टराज्ञी होती. या शिवाय त्याला अत्यंत सुंदर व सद्गुणी चार हजार ४००० त्रिया होत्या. आठ हजार ८००० मुकुटबद्ध राजे, एकवीस लक्ष २१००००० भद्रहस्ती, आहेचाळीस- कोटि ४८००००००० पायदळ वगैरे होते. यांच्यासह तो राजा साम्राज्याचा अनुभव घेत असतां, एके दिवशी श्रीपाल राजा आपल्या आस्थानांत (सभामंडपांत) आनंदानें बसला होता. त्यावेळी एक वनपाठक त्यांच्याजवळ येऊन मोठ्या आदरानें त्यांच्यापुढे मनोहर फल- पुष्पे ठेऊन आपले करयुग जोडून विनयानें म्हणतो- भो देव ! आपल्या शुम दैवयोगानें आपल्या बहिरुयानांत अवधिज्ञानसंपन्न असे एक सहस्रकीर्ति नामक निर्भध भट्टारक मुनिराज येऊन राहिले आहेत. त्यांच्या आगमनानें सर्व वन प्रफुल्लित झाले आहे. हे त्यांचे शुभवचन ऐकतांच त्या रायाचे शरीर आनंदभराने रोमांचित झाले. तत्काल राजा सिंहासनावरून उठून त्या दिशेकडे सात पाऊले चालत जाऊन परोक्ष साष्टांग नमस्कार करता झाला आणि आपल्या अंगावरची बखाभरणे उतरून त्या वनपालकास देतां झाला. नंतर तो आपल्या किंकरांकडून नगरांत आनंदमेरी देववून अंतःपुर परिजन व पुरजन यांच्यासह पादमार्गानें त्या उद्यानांत गेला. मग मुनीश्वरांस तीन प्रदक्षिणा करून मोठ्या भक्तीनें साष्टांग नमस्कार करून त्यांच्या सन्निध बसला. कांहीं वेळ एकाग्रमनानें त्यांच्या मुखांतून प्रकट होणारा सद्धर्मोपदेश ऐकल्यानंतर तो राजेंद्र आपले दोन्ही हात विनयानें जोडून मुनींद्रास म्हणाला, भो भवोद्धारक महास्वामिन् ! या मदनावली सुंदरीवर माझा इतका स्नेह उत्पन्न होण्याचे कारण काय ? या भवांत राज्यभ्रष्ट होण्याचें कारण काय? मला कुष्टरोग उत्पन्न होऊन समुद्रांत पडण्याचें कारण काय ? तसेंच कित्येक जनांकडून मला चांडाळ म्हण- वून घेण्याचें कारण काय ? हे कृपा करून आपण निरूपण करावें. है त्याचें दीनोद्गार ऐकून ते सहस्रकीर्ति भट्टारक मुनींद्र त्यांस म्हणाले, – हे भव्योत्तम राजन् ! तूं आपल्या मागच्या भवांत या चंपापुर नगरांत पद्मरथ नांवाचा राजा होतास. तेव्हां ही मदनावली तुझी पद्मावती नांवाची स्त्री होती. इच्यासह तूं त्यावेळीं सुखानें राज्योपभोग करीत होतास. परंतु दर्शनमोहनीय कर्माच्या उदयानें तुझे परिणाम विपरीत झाले. मात्र तुझी पद्मावती ही पंचवीस दोषांनी रहित असें सम्यक्त्व पालन करीत होती. पूजा, दान संतोषानें करीत असे.
पुनः एके दिवशीं तो राजा पूर्वीप्रमाणें वनक्रीडार्थ उद्यानवनांत गेला असतां, – एका सरोवराच्या तटावर पिहितास्त्रव नांवाचे दिगंबर महामुनिराज ध्यान करीत बसले होते. ते पाहून राजानें दुष्टबुद्धीनें त्यांना सरोवरांत लोटून दिलें. परंतु पुनः आपल्या राणीच्या भयामुळे आणि असा मुनींना त्रास दिल्यामुळे आपल्या हातून प्रमाद दोष घडला असें समजून आल्यामुळे त्यानें त्या मुनींद्रांस योग्य आसनावर पूर्ववत् आणवून बसविलें. नंतर आपण निघून गेला. तेव्हां ही दुर्वार्ता पुनःराणीस कळलीच. त्यावेळीं ती आपल्या मनांत विचार करूं लागली कीं; ह्या पापिष्ठ राजानें व्रत घेतलें असतांहि पुनः मुर्नीस उपसर्ग केला. तर आतां आपण वनीं जाऊन दीक्षाच घ्यावी आणि तपश्चरण करून परलोक साधावा. बेंच योग्य वाटते. असें समजून ती तशीच तत्काल बाहेर पडली आणि त्या तळ्यावर त्या मुनीश्वरांजवळ गेली. त्यांना तीन प्रदक्षिणा घालून वंदना करून विनयानें आपले दोन्ही हात जोडून म्हणाली, भो दयासागर महागुरो ! दुरात्मे माझे पतिराज यांनीं अज्ञानपणामुळे आपणांस भयंकर उपसर्ग केला. त्याबद्दल आपण त्यांना क्षमा करावी. आणि मला आर्थिकेची दीक्षा कृपा करून द्यावी. याप्रमाणें प्रार्थना करूं लागली.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|