व्रतविधि – श्रावण कृ० १ दिवशीं या व्रतधारकांनी शुचि-
जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें, मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह आणि नवदेवता प्रतिमा, षोडशभावना यंत्र स्थापून त्यांचा पंचामृतांनी मंत्रपुरःसर अभि- षेक करावा. शुद्धभूमीवर पंचवर्णानीं षोडशभावनायंत्रदळ चतुरस्र- पंचमंडळासह काढून अष्टप्रातिहार्य व अष्टमंगलकुंभ वगैरेनीं मंडप- श्रृंगार करून नंतर मध्यकळशावर चोवीस तीर्थंकर प्रतिमा, व षोडश- भावना यंत्र ठेऊन नित्यपूजाक्रम करून षोडशभावनापूजाविधान वाचावें. त्याप्रमाणें अष्टद्रव्यांनीं अर्चनाविधी करावा. विधानांतील षोड- शभावना मंत्रांनीं पुष्पें घालावींत. शेवटीं एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा करून मंगलारती करावी. ही व्रत-
कथा वाचावी. ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काळ घालवावा. त्या दिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशी आहारदान देऊन आपण पारणा करावी. तिसरे दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधी करावा. चौथे दिनीं पारणा करावी. या क्रमाने सोळा भावनांची पूजा पूर्ण करावी. हा प्रोषधोपवासविधीचा क्रम झाला.
ज्यांना एकदम सोळा उपवास क्रमानेंच करावयाचे असतील त्यांनी भाद्रपद शु. १ पासून वरील प्रमाणें पूजाक्रम यथासांग करून उपवास करावेत. ज्यांना उपवास होत नसतील त्यांनीं सोळा दिवस यथाशक्ति रसवस्तूंचा त्याग करून षोडशभावनांची पूजा करावी.
पूर्वोक्तविधीप्रमाणेच हें व्रतविधान माघ व चैत्र मासींहि करतां येते. याप्रमाणें हें व्रतविधान सोळा वर्षे करणें उत्तम. ९ वर्षे करणे मध्यम. २ व १ वर्ष करणें जघन्य विधी समजावा,
शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह नूतन तयार करवून तिची पंचकल्याणविधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. षोडशभावनाव्रतोद्यापनपूजाविधानांत सांगितल्या प्रमाणें यंत्रदल वगैरे काढून क्रमानें २५६ अर्चना करावी. २५६ चरु केले पाहिजेत. १६ वायनें षोडशपदार्थ घालून बांधावींत. आणि तीं अर्पण करावींत. चतुःसंघांस चतुर्विधदानें देऊन आवश्यक वस्तूंही द्याव्यात. असा याचा पूर्ण विधी आहे.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत मगध नांवाचा एक विशाल देश आहे. त्यांमध्ये राजगृह नामक नगर अतिशय मनोहर असून तेथें पूर्वी हेमप्रभ नांवाचा नीतिमान् राजा राज्य करीत होता. त्याला विजयावती नाम्नी अति सुंदर राणी होती. या राजाचा महाशर्मा नांवांचा चाणाक्ष पुरोहित होता. त्याला सोमशर्मी नामक सुशील स्त्री होती.
त्यांच्या पोटीं चंडमारी नांवाची अत्यंत कुरूपी, दुर्गंधी, कुबडी, दुर्गुणी अशी एक कन्या होती. तिला पाहून महाशर्मा अत्यंत दुःखांनी व्याकुल होऊन चिंता करीत असे.
एके दिवशीं पुरोहितांच्या घरी त्यांच्या भाग्योदयानें चर्येकरितां (आहाराकरितां) मति सागर व अमितसागर नांबांचे दोघे चारणऋद्धिधारी मुनीश्वर आकाशमार्गे येऊन उतरळे, त्यांना पाहून त्यांस मोठा आनंद झाला. त्यांच्यापुढे जाऊन त्यांना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार करून आंत आणिलें आणि नवधाभक्तीने निरंतराय आहारदान दिलें. आहार झाल्यावर त्यांना आसनावर बसवून सर्वांनी नमोस्तु केला. मग पुरोहि- तानें आपले दोन्ही हात जोडून विनयाने त्यांना प्रश्न केला कीं; हे तपोनिधे गुरुराज ! ही माझी कन्या अशी कुरूपी वगैरे होऊन निपजली आहे याचें कारण काय ? तें कृपा करून सांगावें, हे त्याचे विनम्रवचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले, हे पुरोहिता ! पूर्वभवाचा वृत्तांत सांगतों ऐक. या भरत क्षेत्रांत अवंति नांवाचा एक विस्तीर्ण देश असून त्यांत
विशाल नामक नगर आहे. तेथे पूर्वी देवपाल नामें धर्मिष्ठ राजा राज्य
करीत होता. त्याला देहली नाम्नी सद्गुणी राणी होती. त्यांचा पुरोहित
देवसेन नामें महाज्ञानी होता. त्यांला देवनीति नांवाची साध्वी स्त्री
होती. त्यांच्या उदरी विशालमति नांवाची अत्यंत रूपवती व सुंदर
कन्या होती. तिला आपल्या सौंदर्याचा अतिशय अभिमान वाटत असे. एके दिवशीं ज्ञानसूर्य नामक महामुनिवर्य राजवाड्यांत येऊन निरंतराय आहार करून वनाकडे परत निघाले होते. त्यावेळीं विशालमति ही आपल्या माडीवर बसून खिडकींतून मार्गातून जाणारा जनसंचार पाहात होती. तोच त्या गृहाजवळ ते मुनीश्वर आले. तेव्हां ती नग्न व मळकटरूप पाहून किळसवानें त्यांच्यावर थुंकली. मुनीश्वर मनांत क्षमा धारण करून पुढें चालले. हा प्रकार पुरोहिताच्या दृष्टीं पडला. मग त्यानें तत्क्षणीं मुनीश्वरांजवळ जाऊन त्यांना प्रार्थना करून घरीं आणिलें
आणि प्रासुक पाण्यानें मुनीश्वरांचे सर्व अंग पुसून स्वच्छ केलें. हे आपल्या कन्येचें उन्मत्ततेचे आचरण पाहून तो तिच्यावर फारच रागा- वला. नंतर मोठ्या भक्तीनें त्यांची पादपूजा करून आपल्या मुलीनें केलेल्या अपराधाबद्दल त्यानें क्षमा मागितली. हे पाहून ती विशालमति कन्या मनांत अति लज्जित झाली आणि आपण हे फारच निंय व अयोग्य कृत्य केलें, असें वाटून ती त्या मुनीश्वराजवळ आळी आणि गहींवरून मोठ्या त्रिनयभक्तीनें त्यांना नमोस्तु करून म्हणाली, हे स्वामीमहाराज ! मी अज्ञानपणामुळे आपला मोठा अपराध केला. याज- बद्दल आपण सदय अंतःकरणाने माझ्यावर क्षमा करावी. हे तिचें विनयपूर्ण वचन ऐकून त्यांनी तिला धर्मोपदेशानें समाधान केलें. नंतर ते निघून गेले.
पुढे कांहीं दिवसांनी ती विशालमति मरणपावून त्या पापोदयानें तुझ्या पोटीं आतां ही अशी विद्रूप, दुर्गधी वगैरे होऊन जन्मली आहे. हे त्या चारणमुनींचे भाषण ऐकून महाशर्मा पुरोहित त्यांना म्हणाला, आतां याला उपाय काय करावा ? तेव्हां ते म्हणाले, ‘जर या कन्येनें कर्मनिर्मूलन करण्यास कारणीभूत असे षोडशभावनाव्रत (षोडशकारण व्रत) घेऊन यथाविधि पालन केले तर ती दीक्षा घेऊन तपश्चरण करून स्त्रीलिंग छेदून सोळाव्या स्वर्गात देव होईल. आणि पुढें मोक्षास जाईल.
त्यांच्या मुखानें हैं भवांतर ऐकून ती चंडमारी त्यांना म्हणाली- ‘भो गुरुवर्य ! हे व्रत मला कृपा करून द्यावें आणि त्याचा सर्वविधि सांगावा. मग त्यांनीं तिला व्रत देऊन सर्वविधी सांगितला. नंतर ते चारणमुनीश्वर आकाशमार्गे निघून गेले. मग ती चंडमारी आपल्या मनांत म्हणते, – चंद्रावाचून रात्र, सूर्याशिवाय दिवस, पाण्याविना कमल, दया नसता धर्म हैं जसें शोभत नाहींत तद्वत् गुरुव्यतिरिक्त शिष्य शोभत नाहीं. अर्थात् त्या दयाघन व परोपकारी गुरुवाचून माझे जिणे
व्यर्थ आहे. मग ती आनंदानें धर्मकार्यातच कालक्रमण करूं लागली. देवशात्रगुरूंवर दृढ भक्ती बसली पुढे भाद्रपदमास येतांच तिनें हैं व्रत यथाविधी पाळून पूर्ण केलें. त्या व्रतपुण्यप्रभावानें ती त्रीडिंग छेदून सोळाव्या स्वर्गात देव झाली, तेथें बावीससागर वर्षे सुखोपभोग भोगून आयुष्यांतीं ब्यवून तो चंडमारीचर देव या जंबूद्वीपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत अमरावती नांवाचा विस्तीर्ण देश आहे. त्यांत गंधर्वनगर नामक एक रमणीय शहर आहे. तेथे सीमंकर नांत्राचा धर्मानुरागी नीतिमान् राजा राजीवनयनी महादेवी राणीसह राज्य करीत होता. त्यांच्या उदरीं- येऊन अवतरला, तत्पूर्वी सहा महिनें इंद्राज्ञेनें कुबेर त्यांच्या वाड्यावर रत्नष्वृष्टी करीत होता. नऊ महिनें पूर्ण झाल्यावर ती महादेवी तीर्थकर पुत्ररत्न प्रसूत झाली. तेव्हां चतुर्णिकाय देव येऊन जन्मकल्या- णिकाचा उत्सव करून जीवंधर असें नाम ठेवते झाले. पुढें तो युवा- वस्थेत आल्यावर राज्यसुखाचा अनुभव घेतां झाला. कांहीं कारणाने त्यांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे स्वर्गाहून लोकांतिकदेवांनीं येऊन पुनः उपदेश केला. मग सर्वानीं समारंभानें त्यांना पालखींत बसवून वनांत नेलें. तेथे स्वतः जीवंधर तीर्थकरांनी सर्व परिग्रहांचा त्याग करून ‘ नमः सिद्धेभ्यः’ हा मंत्र म्हणत आपले केश उपटून घेऊन दिगंबर दीक्षा घेतली आणि घोर तपश्चर्या केली. त्यायोगें त्यांना केवल- ज्ञानाची प्राप्ति झाली. तेव्हां चतुर्णिकाय देवांनीं येऊन प्रत्येक कल्या- णिका प्रमाणे हा केवलज्ञान कल्याणिकाचा उत्सव समवसरणाची रचना करून केला. नंतर समवसरणासह देशोदेशीं विहार करीत ते लोकांस धर्मामृत पाजूं लागले. शेवटी समवसरणाचे विसर्जन करून एकांत स्थळीं अघातिकर्माचा क्षय करून निर्वाणपदास प्राप्त झाले. मग चतु- र्णिकाय देव येऊन निर्वाण कल्याणचा उत्सत्र करून स्वस्थानीं निघून गेले. अशी ही भवांतरकथा आहे. या प्रमाणें तो चंडमारी कन्येचा जीव या व्रतमाहात्म्यानें क्रमानें मोक्षास गेला आहे.