व्रतविधि – आषाढ मासांतील शुक्लपक्षांत प्रथम शुक्रवारी आणि कृष्णपक्षांत अंत्य शुक्रवारी या व्रतिकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन चैत्यालयांस जावें जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ- शुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठांत श्रीजिनेंद्राची प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. मंडपशृंगार करून देवापुढें शुद्ध भूमीवर अष्टदलकमल यंत्र चतुरस्रपंचमंडळे युक्त पंचवर्णानी काढावें. त्यामध्यें एक भाताची राशि पसरून त्यावर स्वस्तिक काढावें. आणि चांगला एक कुंम पाण्यानें भर- लेला सूत गुंडाळून ठेवावा. त्यावर नारळ, पान ठेवून त्यास गंध, हळद, कुंकू लावून फुलांची माळ घालावी. पुढें एका चौरंगावर क्रमानें १०८ स्वस्तिकें काढून त्यांवर पानें गंधाक्षता, फल पुष्पें ठेवावींत. नंतर जिनें- द्राची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. तीन शेर तांदळाच्या पीठाचे पुरण घालून नऊ कानवले करावेत. त्यांतून जिनेंद्रास तीन व पद्मावती देवीस तीन अर्पावेत व तिच्यापुढें भिजवलेले हरभरे पुंज, वाळितोड करमणी ( पादहस्तभूषण-काळेमणी) (तंबीट्टु) राळ्याचे लाडू, तिळाचे लाडू, पानसुपारी यज्ञभाग ठेवावे, ॐ हीं परमब्रम्हणे अनंतानंतज्ञानशक्तये अईत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालवींत. श्रीजिनसहस्रनाम स्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. कथा सांगणाऱ्यांस २१ पार्ने व सुपाऱ्या द्याव्यात. घरी येऊन सत्पात्रांस आहारदान देऊन मग आपण ते उरलेलें तीन कानबले खाऊन एकभुक्ति करावी.
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रामध्यें आर्य खंड प्रसिद्ध असून त्यांत मगध नांवाचा विशाल देश आहे. त्यामध्यें राजपुर नांवाचें एक सुंदर पट्टण आहे. तेथें पूर्वी जिनदत्त नांवाचा एक राजश्रेष्ठी राहत असे. त्याला अनंतमती नाम्नी प्राणवल्लभा होती. तिला कनकमंजर नामें सुंदर, रूपवती कन्या होती. तिला नवयौवन प्राप्त झाले होतें. एके दिवशीं ती चैत्यालयांत जाऊन श्रीजिनेंद्रांस भक्तीनें वंदना करून अशी प्रार्थना करूं लागली कीं; भो श्रीजिनपते ! मला जर लोकोत्तम पुरुष वर होईल, तर आपल्या चरणीं मी सहस्रदलकमल वाहीन. याप्रमाणे प्रतिज्ञा करून ती आपल्या घरी निघून गेली. पुढें कांहीं दिवसांनीं पुंडरीक या नांवच्या एका चक्रवर्तीच्या पुत्रांशीं इचा विवाह झाला. मग ती आपल्या पतिगृहीं जाऊन सुखानें कालक्रमण करूं लागली. असे कित्येक दिवस गेल्यावर एकदां त्या कनकमंजरीस. पुत्रसंतती नसल्यानें ती चिंताक्रांत होऊन रात्रीं निजली असतां, – यक्षी देवी तिच्या स्वप्नांत येऊन तिला म्हणाली, हे कनकमंजरी ! तूं मागें एकदां श्रीजिनेश्वरांच्या चरणीं सहस्रदलकमल वाहणेची प्रतिज्ञा केली आहेस. तिची तुला अगदीच विस्मृती झाली आहे. त्या कारणानें अद्यापि तुला पुत्रसंतती झाली नाहीं. आतां तूं आपली प्रतिज्ञा पूर्ण कर, म्हणजे तुला पुत्रसंतान होईल.’ हे तिचें वचन ऐकत आहे तोच ती एकदम जागी झाली आणि प्रातःक्रिया सर्व करून ती तत्काळ उद्यान वनास गेली. तेथील सरोवरांत ती प्रवेश करून चोहोंकडे पाहूं लागली, इतक्यांत त्या सरोवराच्या मध्यभागी एका नवरत्नमंडपामध्ये बसलेली ऐश्वर्यसंपन्न श्रीदेवी दृष्टीं पडली. तिची ती अपूर्व विभूति पाहून या कनकमंजरीस अत्यंत आश्चर्य वाटलें. तेव्हां ही अगदीं हास्यमुद्रेनें देवीस म्हणाली, हे देवी ! आतां तुम्हाला इतकें ऐश्वर्य व पूज्यता कोणत्या पुण्यफलानें प्राप्त झाली आहे ? हें तिचें वचन ऐकून देवी म्हणते- हे राज्ञी ! मी पूर्वभवांत शुक्रवार व्रत यथाविधि पाळून त्याचें उद्या- पन केलें होते; म्हणून त्या व्रतपुण्यफलानें मला आतां हें पूज्यत्व व ऐश्वर्य मिळाले आहे. तूंहि हें व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळ म्हणजे तुजाहि हें सर्व ऐश्वर्य अवश्य मिळेल. हें भाषण ऐकून कनकमंजरीस मोठा संतोष वाटला. मग तिनें त्या सरोवरांतील एक सहस्रदल कमळ आणून शुचिर्भूत होऊन देवांस वाहिले. पुढे काळानुसार है शुक्रवार व्रतहि यथाविधि पाळिले. त्यायोगानें तिला गर्मोत्पत्ति होऊन नवमास पूर्ण झाल्यावर सनत्कुमार या नांवाचा एक महापराक्रमी पुत्र झाला. पुढे हा मोठ्या आनंदानें राज्योपभोग करूं लागला. ही कनकमंजरी आपल्या कालावसांनी समाधिपूर्वक मरण पावून व्रतपुण्यफलानें येथे ऐश्वर्यसंपन्न ज्वालामालिनी देवी झाली आहे. हे कथन ऐकून त्या प्रजापति महाराजांत मोठा आनंद झाला. मग पुनः ते महाराज • म्हणाले, – भो स्वामिन् ! पूर्वी हे व्रत आणखी कोणी पाळिलें आहे ? हे वाक्य ऐकून ते गणराज त्यांस म्हणतात. ऐका या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत काश्मीर नामक विस्तीर्ण देश असून त्यांमध्यें मधुरा नांत्राची एक सुंदर नगरी आहे. तेथे पूर्वी अरविंद नांवाचा अत्यंत गुणवान् व पराक्रमी असा राजा राज्य करीत असे. त्याला देवश्री नामें एक पट्टराणी होती. इच्यापासून त्याला अशनिवेग नामें एक पुत्र झाला होता. हा यौवनावस्थेत आला होता. यांच्यासह तो राजा सुखानें राज्योपभोग भोगीत असे.
पुनः ते प्रजापति महाराज गणेंद्रास म्हणतात- भो दयाळु स्वामिन् ! हे व्रत पुनः कोणी पाळिलें आहे काय? हा विनम्र प्रश्न ऐकून गणधर म्हणाले – हे राजन् ! या व्रताबद्दल तुम्हांस आणखी एक दृष्टांत सांगतो. ऐका –
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|