या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांमध्यें अवंती नामें विस्तीर्ण देश असून त्यांत उज्जयनी नांवाची एक सुंदर नगरी आहे. तेथे पूर्वी सिंहसेन नामक मोठा पराक्रमी, गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमती नाम्नी एक लावण्यवती पट्टस्त्री होती. त्यांचा जिनदत्त या नांत्राचा एक राजश्रेष्ठी असून त्याला जिनमती नामें सुशील, सदाचारिणी अशी स्त्री होती. हे दोघे सुखानें नांदत असतां, – एके दिवशीं अतिमुक्त नांवाचे एक निर्भथ महामुनी चर्येकरितां श्रेष्ठींच्या घरासमीप आले. तेव्हां श्रेष्ठीनें त्यांचें प्रतिग्रहण करून त्यांना आंत आणिलें आणि नवधाभक्तिपूर्वक निरंतराय आहार दिला. मग मुनीश्वर त्यांना आशिर्वाद देऊन वनांत निघून गेले. नंतर तीन दिवसांतच श्रेष्ठीच्या शरीरांत कुष्ठरोग उत्पन्न झाला. हे पाहून त्याची धर्मपत्नि जिनमती ही ‘ आपला पति कुष्ठरोगी झाला. आतां याला काय उपाय करावा. वगैरे म्हणून चिंताकुल होऊन बसू लागली. परंतु जिनेश्वरांवर तिची अति दृढभक्ति असल्यामुळे ती आपल्या पतीचे शरीर पूर्ववत् निरोगी व्हावें’ या उद्देशानें प्रतिदिवशीं जिनेश्वरांचा अभिषेक करून त्यांचें गंधोदक आणून आपल्या पत्तीस देत असे. मग ह्या जिनमतीची दृढभक्ति पाहून ज्वालामालिनी देवीचे आसन कंपायमान झालें. तेव्हां ती देवी अवधिज्ञानानें या जिनमतिचे दुर्धर संकट जाणून तत्काळ तिच्या सन्निध आली. आणि म्हणूं लागली कीं; हे सौभाग्यशालिनी जिनमते ! तूं अशी चिंताक्रांत कां झाली आहेस ? हे ऐकून ती म्हणते, हे देवी! माझ्या पतीचें शरीर कुष्ठ रोगानें ग्रस्त कां झालें आहे ? आतां कोणत्या उपायांनें दूर होईल ? इत्यादि विचाराने मी दुःखाकुल झाली आहे. तेव्हां ती देवी म्हणते, हे जिनभक्ते ! जेव्हां अतिमुक्त मुनि हे तुमच्या गृहीं आहारासाठीं आले होते, तेव्हां तूं रजस्वला होतीस. त्यामुळे त्यांना आहार देण्याची इच्छा तुझ्या मनांत नव्हती; तथापि दुराग्रहानें तुझ्या पतीनें तुझें सहाय घेऊन त्यांना आहारदान दिलें. त्या कारणानें आतां त्याला कुष्ठरोग झाला आहे. आतां तूं चंद्रषष्ठत्रित पाळून त्याचें गंधो- दक नेऊन त्यांना दे. म्हणजे त्या रोगाचा परिहार तत्काल अवश्य होईल.” असे म्हणून तिनें त्या व्रताचा सर्वविधी यथासांग सांगितला. ते सर्व ऐकून जिनमती म्हणते, हे भगवती देवी ! आपण कोण आहात ? आपलें स्थान कोणते ? या व्रताचा विधी वगैरे आपणांस कोणी सांगितला ? हे तिचे प्रश्न ऐकून देवी म्हणाली, – मी ज्वाला- मालिनी देवी आहे. पूर्वविदेह क्षेत्रांत पुंडरीकिणी नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथील सीमंकर नामक उद्यानांत मी राहतें. तेथें एक चैत्यालय आहे. त्यांत एकदां सुमती नांवाची आर्थिका आली होती. कांही भक्तलोक त्या ठिकाणीं येऊन त्या आर्थिकेजवळ चंद्रषष्ठी व्रताचे विधान विचारीत होते. तेव्हां तिच्या मुखानें मी या व्रताचा सर्व विधी ऐकिला आहे. तोच सर्वविधी मी तुछा आतां सांगितला आहे. असे म्हणून ती अदृश्य झाली.
Add reaction
|