व्रतविधि – आषाढ मासीं शुक्लपक्षाच्या शेवटच्या रविवारी या व्रतधारकांनीं प्रातःकाळीं उष्णोदकांनें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ- धौतवस्खें धारण करावींत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईयपथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत पार्श्वनाथ तीर्थ- कर प्रतिमा धरणेद्रयक्ष पद्मावती यक्षीसह स्थापून पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई श्रीपार्श्वनाथतीर्थकराय धरणेंद्रपद्मावतीयक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। यांमंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत ९ पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्यें लावून एकनारळ ठेवून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा. ब्रह्मचर्य पूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणें करावें.
त्याप्रमाणें नऊ रविवारी क्रमाने करावी. हें व्रत नऊ वर्षेपर्यंत करावें. पहिल्यावर्षी नऊ ९ रविवारी उपवास करावेत. दुसऱ्या वर्षी मिठावांचून (शेंदेलोणाशिवाय) आंबलि भोजन करावें. तिसऱ्या वर्षी एकाशन, चवथ्या वर्षी कांजिकाहार, पांचव्या वर्षी ताकभात, सहाव्या वर्षी एकाशन, सातव्या वर्षी गोरस सोडून भोजन, आठव्या वर्षी तूप सोडून भोजन, नवव्या वर्षी एकाशन करावें.
याचा आणखी एक विधी असा आहे कीं, लागोपाठ क्रमानें एक्यांशीं ८१ रविवारी पूजा करून उपवास अगर लवणवर्जित भोजनें अथवा एकाशनें करावीत.
या प्रमाणें व्रतपूजा झाल्यावर शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळी रविवारत्रतोद्यापनपूजा विधानांत सांगितल्याप्रमाणे सर्व पूजाक्रम करावा.
– कथा –
जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत काशी नांवाच्या देशामध्ये वाराणसी नामें नगर आहे. हल्ली त्याला बनारस म्हणतात. तेथे पूर्वी महीपाल नांवाचा राजा राज्य करीत असे. त्याच नगरांत एक कोट्यधीश साव- कार राहत होता. त्याला गुणसुंदरी नामें एक धार्मिक स्त्री होती. तिचे पोटीं सात मुळे होते. त्यांपैकी सहा जनांची उग्ने झाली होतीं. सातवा गुणधर लहान असल्यानें विद्याभ्यास करीत होता.
एके दिवशीं शहराजवळच्या वनांत गुणसागर नामक महाज्ञानी मुनीश्वर आले. हे ऐकून राजा आपल्या परिजन व पुरजन यांच्यासह दर्शनात गेला. मुनीना तीन प्रदक्षिणा घालून भक्तीनें साष्टांग नमस्कार करून त्यांच्या समीप धर्मोपदेश ऐकत बसला. त्यानंतर ती गुणसुंदरी मोठ्या नम्रतेनें दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाली, हे दीनोद्धारक स्वामिन् ! आतां आपण मला आत्महितार्थ एकादें व्रत द्यावें. असें म्हटल्यावर मुनीश्वरांनी तिला श्रावकांचीं बारा व्रतें आणि षट्कर्माची (देवपूजादिकांची) माहिती सांगितली आणि रविवारव्रतहि करण्यास सांगितलें. तसेंच त्याचा सर्वविधीहि सांगितला. तो ऐकून तिनें हें व्रत धारण केलें व घरी परत आल्यावर आपल्या पतीस आणि मुलांस व्रत घेतल्याविषयीं कळविलें. ते ऐकून पति व मुलांनी त्या व्रताची फार निंदा केली. त्यायोगानें त्यांना लागलीच दारिद्य प्राप्त झालें. मुळे आईबापांस विचारू लागले, येथे आमचे पोट भरेना. तेव्हां आम्ही परदेशीं जातो. याप्रमाणें सांगून तीं सगळीं मुळे आपापल्या बायका घेऊन निघाली आणि साकेत (आयोध्या) नगरी जिनदत्त श्रेष्ठीच्या घरी येऊन राहिलीं. श्रेष्ठीच्या आज्ञेप्रमाणें वागूं लागीं.
इकडे वाराणसी नगरांत एके दिवशीं मुनीश्वर आळे. तेव्हां मतिसागर व गुणसुंदरी त्यांना विचारतात कीं, हे भवसिंधुतारक गुरुराज ! आम्हांला है दारिद्य दुःख कोणत्या कर्मानें भोगावें लागत आहे ? हे कृपा करून सांगा. मग मुनीश्वर म्हणाले, – उत्तमशा व्रताची तुम्ही फारच निंदा केली. त्यामुळे हें दारिच भोगीत आहात. जर तुम्ही रविवारव्रत स्त्रीकाराल तर तुमचे द्रारिय नाहींसें होईल. अर्थात् तुमच्या घरांत पुनः संपत्ति येईल. मग त्यांनी हें व्रत विधिपूर्वक कालानुसार केलें. त्यामुळे घरांत पुनः संपत्ति आली.
इकडे सात बंधु मोठे काबाडकष्ट करून उदर भरीत होते एकदां गुणधर धाकटा बंधु रानांतून गवताचा भारा बांधून घरी येत असतां खुरपें (त्रिळा) रानांतं विसरून आला. भुकेनें फार व्याकुळ झाल्यानें घरी येऊन मालाकणबाईस जेवावयास मागू लागला. तेव्हां ती म्हणाली, खुरपें कोठें ठेवून आलास, अगोदर ते घेऊन ये, म्हणजे जेवावयास तुला मिळेल. हैं ऐकून तो तसाच भुकेला रानांत गेला. आणि पाहतो तो त्या खुरप्याचे सभोवती एका नागसर्पानें बेटाळा घातला आहे. हे पाहून तो हात जोडून त्या नागसर्पाशीं खुरपें मागू लागला. खुरपें मिळत नाहीं असें पाहून त्याला आपल्या कर्माविषयीं पश्चात्ताप वाटला. आणि वीतराग सर्वज्ञ परमेष्ठीचें स्तवन अनन्यभावानें तो करूं लागला. त्यायोगें पाता- ळांतील भुत्रनेंद्राचें असन कंपायमान झालें. त्यानें अवधिज्ञानानें जाणले कीं; कोणी जिनेंद्रभक्त संकटांत पडला आहे. तेव्हां त्यानें-धरणेंद्रानें पद्मावतीस आज्ञा केली कीं; तो गुणधर मुलगा अर्हताचा खरा भक्त आहे. त्याचे मातापिता पार्श्वनाथ स्वामींच्या भक्तींमध्यें तत्पर असून त्यांचें आचरण उत्तम आहे. यास्तव त्या बाळाला तुम्ही जाऊन प्रसन्न व्हा आणि संकटांतून त्याला सोडवा. हे ऐकून पद्मावती गुणधरा समीप आळी आणि त्याला म्हणाली, हे वाळा ! भिऊं नको. हैं सोन्याचें खुरपें घे. हा रत्नाचा हार घे. ही पार्श्वनाथाची मूर्ति तुला देते. ती घेउन जा. आणि तिचे भक्तिभावानें पूजन कर. असे म्हणून ती अदृश्य झाली. मग गुणधर ते सर्व घेऊन घरी आला.
आपला बंधु पुष्कळ संपत्ती घेऊन आला, हे पाहून सर्वजन त्याचा सःकार करूं लागले. मग त्यानें त्यांपैकी पुष्कळ द्रव्य खर्च करून जिन- मंदिर बांचविले आणि त्यांत तीर्थकर प्रतिमा पंचकल्याणविधिपूर्वक स्थापिली. चतुर्विवसंचास दानें दिलीं. हा सर्व थाटमाट पाहून तेथील राजाला त्यांच्या द्रव्यांविषयीं संशय आला. मग त्यानें बोलावून हे द्रव्य कोठें सांपडले वगैरे विचारिलें. नंतर गुणधरानें घडलेली सर्व हकिगत सांगितली. ती ऐकून राजाला फार संतोष झाला आणि तो गुण- धराची प्रशंसा करूं लागला. इतकेंच नव्हे तर त्यानें आपली कन्या त्याला देऊन मोठ्या समारंभानें त्याचा विवाह केला. त्याला वस्त्रालंकार, दासदासी वगैरे देऊन त्याचा मोठा सन्मान केला. मग हे सर्व बंधू कांहीं दिवस तेथे राहून राजाला विचारून आपल्या बापाच्या गांवीं जाण्यास निघाले. बापांच्या घरी येऊन त्यांच्या पाया पडले. पुढे त्या व्रतभक्ति यांमुळे त्यांच्या जवळ दुप्पट द्रव्य झाले. पुढें हें व्रत विधिपूर्वक त्यांनीं पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन केले. तेणेकरून त्यांची कीर्ति सर्व पृथ्वीभर पसरली. आणि सुशील स्वभावादिकांमुळे ते स्वर्गास गेलें व पुढे दोन जन्मांतच ते सर्व मोक्षास गेले.