व्रतविधि – भाद्रपद शु.७ दिवशीं या व्रतिकांनीं प्रासुक पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथ शुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडप श्रृंगार करून देवापुढें शुद्धभूमीवर –
मध्यभागीं सात प्रकारच्या धान्यांची एक राशि करावी. त्याच्या सभोंवतीं पंचवर्णानीं अष्टदलकमल काढावें. त्या राशीवर न्हीं कार बीज मंत्र लिहून त्यावर दुधानें भरलेला मोठा कुंभ सुशोभित करून ठेवावा. ‘त्याला वस्त्र गुंडाळावें. श्रीपीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजययक्ष व कालीयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह दुधानी भरलेल्या त्या कुंमांत ठेवावी. आदिनाथापासून सुपार्श्वनाथापर्यंत सात तीर्थ- करांचीं अर्चना अष्टद्रव्यांनी करावी. सात प्रकारच्या भल्याचे सात चरु करून अर्पण करावेत. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अई श्रीसुपार्श्वना- थाय नंदिविजययक्ष-कालीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीसुपार्श्वनाथचरित्र वाचून ही व्रतकथाहि वाचावी. सात बार्ने वगैरे अष्टद्रव्ये एक नारळ एका पात्रांत ठेऊन महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी, त्यादिवशीं उपवास करावा. ब्रह्मचर्यपूर्वक भक्त्यादि स्तोत्रे पुण्यपुरुषांची चरित्रे वाचीत ती रात्र धर्मध्यानांत घालावी.
दुसरे दिवशीं प्रातःकाळीं शुचिर्भूत होऊन त्या कुंभांतील मूर्ति बाहेर काढून तिच्या पंचामृतांनीं अभिषेक करावा, त्यांचीं अष्टद्रव्यांनी अर्चना करून सात प्रकारच्या भक्ष्याचें सात चरु करून अर्पावेत, सत्पात्रांस आहारादि दानें देऊन आपण पारणें करावें.
याच क्रमानें हैं व्रत सात वर्षे करून शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळी श्रीसुपार्श्वनाथ तीर्थकरप्रतिमा नंदिविजययक्ष व कालीयक्षीसद नूतन बनवून तिची पंचकल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. सात मुनीश्वरांस आहारदान देऊन सात ७ सुवासिनी त्रियांस वायनें द्यार्वीत. असा या व्रताचा पूर्णविधी आहे.
– कथा –
या जंबू द्वीपांतील भरत क्षेत्रामध्यें आर्य खंड असून त्यांत पृथ्वी- भूषण नावाचा एक विशाल देश आहे. त्यामध्ये दलवर्तन नामक मनो- हर पट्टण आहे. तेथे पूर्वी पृथ्वीपालक नांवाचा सदाचारी राजा आपल्या सुशील मदनमाला नाम्नी पट्टराणीसह राज्य करीत असे. त्यांचा अईदास नांवाचा राजश्रेष्ठी होता. त्याला रूपलक्ष्मी नामें सुशील, रूपवती, गुणवती व सौंदर्यवती अशी स्त्री होती. पूर्वजन्मीं तिनें हें व्रत पाळिलें होतें. म्हणून तिला तिळमात्रहि कशाचेंहि दुःख नव्हते. तिच्या उदरीं पांच पुत्र व एक कन्या अशी सहा अपत्यें जन्मास आली. हा श्रेष्ठी ६६० सहारों साठ कोटी धनांचा अधिपति होता त्याकारणानें जिन- पूजा, दान, यात्रा, प्रतिष्ठा वगैरे सत्कार्यात तो त्या धनाचा व्यय करीत असे. खरोखर तो सम्यक्त्वचूडामणी होता, अशा रीतीनें तो श्रेष्ठी सुखा- नुभवांत कालक्रमण करीत असे.
त्याच पट्टणांत दुसरा एक धनपति नांवाचा सम्यग्दृष्टी श्रावक राहात असे. तो चांगला भाविक असल्यामुळे त्याला राजाकडून फारच मान मिळत होता. तो सांपत्तिक दृष्ट्याहि मोठा धनाढ्य होता. त्याला सुनंदा नामक सद्गुणी, रूपवती स्त्री होती. त्यांना मुरारी नांवाचा एकुलता एक पुत्र असून तो फारच लाडका होता. जस जसा तो मोठा होऊ लागला, तस तसा अधिक सौंदर्यवान् मासू लागला. त्याची माता रात्रीच्या वेळीं त्याला दूधभात खाऊं घाळीत असे. ‘रात्रींच्या वेळीं दूं मुलांस जेवू घालूं नकोस’ म्हणून पति, गुरु, नातलग वगैरे लोकांनीं
तिला पुष्कळदां सांगितलें तरी तिनें त्यांचे न ऐकतां आपला क्रम तसाच चालू, ठेविला. ती रोज दूध शिंक्यावर ठेवीत असे.
एके दिवशी त्या शिक्यावरील दुधांत एक सर्प’ गरळ ‘ सोडून गेला होता. नित्याप्रमाणें ती मुरारीस दुधमात साखर घालून दिली. तो आनंदानें जेवला. पण विषप्रभावानें तत्काळ मरण पावला. मग ती सुनंदा पुत्रवियोगानें फारच शोक करूं लागली. आणि म्हणू लागली कीं; मी आपल्या पुत्रास स्वहस्तानें रात्री जेवावयास घालून मारिलें, वगैरे रीतीनें ती अतिशय दुःख करूं लागली.
” रात्री भोजन केल्या पासून असले दुष्परिणाम मनुष्यांवर ओढ- वतात, यास्तव शास्त्रामध्ये रात्रीभोजनाचा निषेध केला आहे. “
त्या पुत्राच्या शोकानें आक्रोश करून ती वारंवार रडत असे. तिचे हे रुदन ऐकून रूपलक्ष्मी सेठाणी आपल्या सखींना म्हणाली, – इतक्या उच्चस्वराने कोणती श्री गात आहे. पाहूं चाला. (असें ती म्हणण्याचे कारण – ती सदा हास्यविनोदांत आनंदानें काल घालवीत असल्यामुळे तिला आजन्म कधींच लोकांप्रमाणें दुःख माहीत नव्हते.) असें म्हणून ती आपल्या मैत्रीणीसह सुनंदेच्या घरी आली आणि तिला विचारूं लागली. हे बाई! हे असले गायन तूं कोठें शिकलीस ? कोणी शिकविलें. ? हे तिचे वचन ऐकतांच त्या सुनंदेला अति क्रोध आला आणि ती तिला म्हणाली, हे बाई ! तूं आतां येथून निघून आपल्या घरी जा. हे गायन तुला पाहिजे असल्यास मी मागाहून तुझ्या घरी पाठवून देते. मग तुंही ते गायन आनंदानें करीत बैस. हे ऐकून ती रूपलक्ष्मी म्हणाली, अहो बाई !’ ते गायन लौकर पाठवून द्या. ‘ असें म्हणून ती आपल्या घरी निघून गेली.
मग सुनंदा विचार करूं लागली, इतक्यांत एक मांत्रिक जोगी तिच्या घरी आला. तेव्हां त्याला तिनें असें सांगितलें कीं, त्या रूपलक्ष्मीस पुत्रशोक होईल असा कांहीं तरी उपाय कर.’ मग त्यानें
भूतपिशाच, वेताळ यंत्र-मंत्र-तंत्र वगैरे पुष्कळ प्रयत्न केले. परंतु सद्धमर्माच्या योगानें-प्रभावानें-त्या रूपलक्ष्मीच्या पुत्रावर कांहींच परिणाम झाला नाहीं. नंतर त्यानें एक कृष्णसर्प धरून एका कुंभांत घालून सुनंदेस आणून दिला; आणि सांगितलें. कीं, यांत भयंकर विषारी काळा साप आहे. आतां हा कुंभ तूं तिच्याकडे पाठवून दे. आणि तिला सांग कीं; – यांत एक अमूल्य रत्नहार आहे. तो तुमच्या पुत्राकडूनच काढून ध्या व आपल्या गळ्यांत घाला म्हणजे तुम्हाला उत्तम तन्हेनें गातां येईल, असें सांगून ये. तेव्हां तिनें तो कुंभ एका मनुष्याकडून रूपल- क्ष्मीच्या घराकडे सर्व माहिती सांगून माणसानें तो कुंभ नेऊन तिच्याकडे पाठवून दिला. ठरल्याप्रमाणें त्या दिला, आणि सर्व माहिती सांगि- तली. मग त्याप्रमाणें तिनें त्या कुंभांतील रत्नहार आपल्या मुलांकडून काढवून आपल्या गळ्यांत घातली. त्याचा प्रकाश घरभर पसरला. हैं पाहून तिला मोठें कौतुक बाटलें. परंतु गायन करतां कां येईना ? म्हणून विचार करूं लागली.
इकडे ती सुनंदा आपल्या मनामध्ये मोठा आनंद मानून आपल्या मैत्रीणीस म्हणते, – रूपलक्ष्मी कशी काय गायन करते ते पाहूं चला. असे म्हणून आपल्या मैत्रिणीसह ती तिच्या घरी गेली. रूपलक्ष्मी सुनंदेला पाहतांच म्हणाली, अहो बाई ! तुम्ही सांगितल्याप्रमाणें सर्व कृती करून हार गळ्यांत घातला पण तुमच्या सारखें गायन करतां कां येईना ? तेव्हां ती आश्चर्यचकित होऊन कोणत्याहि प्रकारें तिची समजूत घालून मुकाट्यानें आपल्या घरी निघून गेली. आपण केलेल्या दुष्कृत्याबद्दल तिला मोठा पश्चात्ताप झाला. मग ती मनांत विचार करूं लागली कीं; – ती रूपलक्ष्मी फारच भाग्यशाली असल्यानें तिच्यावर आमच्या उपायांचा कांहींच परिणाम झाला नाहीं. मीं हें जे केंडे ते अगदीं अयोग्य केलें. असें नानापरीनें ती रात्रंदिवस चिंतन करूं लागली.
हे भव्यजन हो ! तुम्हीहि असली दुर्भावना आपल्या मनांत केव्हांही करूं नका. “
नित्यनियमाप्रमाणें ही रूपलक्ष्मी जिनदर्शनार्थ मंदिरांत गेली होती. वंदनादि करून घरांकडे परत येत असतांना मार्गातून तेथील राजाची महाराणी जी मदनमाला ती वनविहार करण्यासाठीं पालखीत बसून चालली होती. तेव्हां रूपलक्ष्मीच्या गळ्यांतील प्रकाशमान हार राणीनें पाहिला. ती मनांत विचार करूं लागली कीं; – माझ्या वाड्यांत पुष्कळ रत्नहार आहेत; परंतु इतका सोज्वळ व मनोहर हार त्यांत एकही नाहीं. तेव्हां तिच्या गळ्यांतील हार कोणत्याहि रीतीनें आणवून घ्यावा. अशा विचारानें वनविहार करून परत आली. नंतर राजांस आपल्या मनांतील तिनें कळविला. राजानें त्या अईद्दास श्रेष्ठीस बोलावण्यास दूत पाठविला. दूतानें राजाज्ञेप्रमाणे श्रेष्ठीस बोलावून राजसभेत आणिले. राजा श्रेष्ठीस म्हणाला, – हे श्रेष्ठिवर्य ! आपल्या घरी एक अमूल्य रत्नहार आहे असें ऐकतों. तो आम्हांस पाहावयाचा आहे. तेव्हां तो हार तुम्ही आणून दाखवा. कारण राणीचें मन त्या हारावर गेल्या कारणानें तसला एक नूतन हार तयार करावयाचा आहे. हे ऐकून श्रेष्ठी म्हणाला, हे राजन् ! हे सर्व ऐश्वर्य आपलेंच आहे. आपलाच आधार सर्वास आहे. आपल्या आज्ञे- प्रमाणें तो हार आपल्या सेवेंत सादर करितो. असें सांगून श्रेष्ठीनें तो हार तत्काळ आणून राजांस दिला. त्यावेळी त्याचें तेज सर्व सर्भेत चोहीकडे पसरलें. त्या हारांस पाहून त्यावेळीं सर्वास मोठें आश्चर्य वाटलें. राजा तर फारच विस्मित झाला. नंतर त्यानें तो हार राणींच्या महालीं पाठ- बिला. सर्वांस तो हार पाहतांच मोठा संतोष झाला. मग राणीनें तो हार मोठ्या उत्सुकतेनें आपल्या गळ्यांत घालतांच तत्काळ कृष्णसर्प झाला. मग तत्काळ ती भिवून काढून टाकली आणि राजास कळविली. तेव्हां राजा क्रोधायमान होऊन त्या श्रेष्ठीस म्हणाला, हा काय प्रकार आहे ? श्रेष्ठी म्हणाला- मला कांहीं माहीत नाहीं. श्रेष्ठी घरी जाऊन
सर्व वृत्तांत आपल्या पत्नीस- (रूपलक्ष्मीस) सांगून तिला राजसमेत घेऊन आला. तेव्हां ती म्हणाली, प्रत्यक्ष हा हार असून तुम्हांस सर्प दिसतो. हे केवढे आश्वर्य असे म्हणून तिनें तो आपल्या कंठांत घातला. हे पाहून पुनः राणीनें मांगून घेऊन आपल्या गळ्यांत घातला पुनरपि तो सर्पच झाला. तेव्हां ती पूर्ववत् काढून टाकिली. हा सर्व प्रकार पाहून समेतील सर्व जनांस मोठें आश्वर्य वाटले. हा संदेह दूर होण्याकरितां ते सर्व जन एक महाज्ञानी मुनीश्वराकडे गेले. आनंदाने सर्वांनी त्यांना नमस्कार करून प्रश्न केला. हा रत्नहार रूपलक्ष्मीनें घालतांच आहे तसा असतो, मात्र राणीने घालतांच सर्प होतो. याचे कारण काय असावे ? मुनीश्वर त्या रत्नहाराबद्दल पूर्वीच्या सर्व वृत्तांत त्यांना सांगून म्हणाले ह्यांत आश्वर्य ते काय ? जे प्राणी पुण्यवान् असतात, त्यांना कोणत्याहि प्रकारें अपाय होत नाहीं. सद्धर्म प्रभावामुळे अपकारी वस्तु उपकारी होतात, विष्नें टळतात, सर्व कार्यात यश मिळते. पहा ! ह्या रूपलक्ष्मीनें आपल्या पूर्वभवांत ‘ निर्दोष सप्तमी ‘ व्रत यथाविधि पाळिलें म्हणून काळा मुजंगहि आतां तिच्या गळ्यांत उज्ज्वल रत्नहार होत आहे. या करितां हे भव्य दीन जनहो ! तुम्हीही हे व्रत वगैरे धर्मसाधन करून पुण्य संपादन करा.
या प्रमाणें मुनीश्वरांच्या मुखानें हा सर्व वृत्तांत व धर्मोपदेश ऐकून सर्व जनांस मोठा आनंद झाला. मग राजानें हें व्रत त्यांच्याजवळ प्रार्थना करून घेतलें. तसेंच रूपलक्ष्मीनेंहि घेतलें. सर्वविधि त्यांनीं समजावून सांगितला. नंतर सर्वजन त्यांना नमस्कार करून पट्टणीं परत आले. पुढे काळानुसार रूपलक्ष्मीनें यथाविधि हे व्रत करून उद्यापन केलें. त्यायोगे ती स्त्रिलिंग छेदून स्वर्गात देव झाली. पुढें तो देव तेथून आयु- ष्यांतीं च्यवून या लोकीं एक राजा झाला. कांहीं निमित्तानें त्याला वैराग्य उत्पन्न झालें. मग त्यानें एका मुनीजवळ जिनदीक्षा घेतली. घोरतपश्वरणानें तो सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला.