व्रतविधि – आषाढ मांसांतील नंदीश्वर पर्वात शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं सुखोष्णजळांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. कोणतेहि धान्य हातीं वेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथ शुद्धि वगैरे क्रिया करून आपण नेलेल्या धान्याचे नऊ ९ पुंज ” नवदेवतांचीं अरहंत-सिद्ध-आचार्य, उपाध्याय-सर्वसाधु-जिनधर्म-जिनागम-जिनचैत्य-जिनचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ” म्हणत घालून जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. याच क्रमानें कार्तिक शु. १५ पर्यंत नित्य शुचिर्भूत होऊन करावें. शक्ति असल्यास रोज पंचामृताभिषेक पूजा केल्यास उत्तम आहे. ब्रह्मचर्य पाळावे, फारच उत्तम आहे. शेवटीं याचें उद्यापन करावें. त्यावेळीं नवदेवतांस पंचामृतांनीं महाभिषेक पूजा करून एक शेर धान्यांचे वरील मंत्रानें नऊ पुंज घालून नमस्कार करावा नऊ प्रकारच्या भक्ष्यांचे नऊ चरु करून देवांस क्रमानें अर्पावेत. नऊ पानें क्रमानें देवापुढे मांडून त्यांवर अष्टद्रव्यें लावावीत. नऊ पोळ्या, नऊ पुष्पमाळाहि अर्पण कराव्यात. ही व्रतकथा वाचात्री. शेवटों नवदेवतांच्या नांवानें १०८ पुष्पे घालून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रद- क्षिगा घालून मंगलारती करावी. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत सुगंधी नामक एक मोठा विस्तीर्ण देश आहे. त्यांत रत्नसंचय नामें नगर रमणीय आहे. तेथे प्राचीन काळीं देवपाल नांवाचा एक महापराक्रमी, नीतिमान्, गुणवान् असा राजा राज्य करीत असे. त्याला लक्ष्मीवती नाम्नी रूपवती, धर्मशील, सुंदर पट्टराज्ञी होती. ही दंपती राज्यैश्वर्यादि भोगामध्यें सुखानें काल क्रमीत असे.
एकदां या नगराच्या बाहेरील रम्य अशा उद्यानांत श्रुतसागर नांवाचें महामुनीश्वर येऊन उतरले. ही शुभवार्ता वनपालकाच्या द्वारें राजास कळली. तेव्हां राजा आपल्या सर्व परिजन आणि पुरजन यांच्या- सह पादमार्गे उद्यानाकडे गेला व मुनीश्वरांना तीन प्रदक्षिणा देऊन भक्तीनें वंदनादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांही वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर राणीनें मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून मुनीश्वरांस विचारिलें, भो दयाघन स्वामिन् ! आज आपण आम्हांस अनंतसुखाला कारण अप्से एकादें व्रतविधान सांगावें. ही नम्रोक्ति ऐकून- ते म्हणाले, हे कन्ये! आतां तुम्हांस नवनिधि भांडार हें व्रत पालन करण्यास योग्य आहे. कारण जे भव्य स्त्रीपुरुष हें व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळतात; त्यांना शुभकर्माचे आस्रव होऊन या लोकीं अनेक इष्टार्थ मिळतात व परलोकीं अनेक सुखैश्वर्य मिळून शेवटीं क्रमानें मोक्षसुख मिळतें. असें म्हणून त्यांनीं त्याचा सर्व विधि सांगितला. तें ऐकून सर्वांस मोठा आनंद झाला. त्यानंतर त्या लक्ष्मीमतीनें त्यांना भक्तीनें वंदना करून त्यांचेजवळ हे व्रत घेतलें. मग सर्वजन त्या मुनीश्वरांस नमस्कार करून नगरी परत आले. पुढे तिनें कालानुसार हैं व्रत पाळलें, त्यामुळे ती दंपती महासुखांत निमग्न झाली. तसेंच त्या नगरांतीउ धनदेव नांवाच्या एका दीन वैश्यानेंहि हे व्रत गुरुजवळ घेऊन पाळिलें त्यायोगे त्याला तत्काळ राजश्रेष्ठीपद मिळाले. पुढे क्रमानें त्या सर्वांना अनंतसुख मिळालें.
सूचना – सर्व भूतदया धारक अवधिज्ञानी मुनींनीं कोणते धान्य अर्पण केल्यानें कोणतें फल मिळतें तें असें सांगितलें आहे.
जैनेंद्रव्रतकथासंग्रह.
धान्य
फल
१ तांदूळ
१ पुत्रप्राप्ति
२ मीठ- (शेंदेलोण )
२ चुकारहित भाषण
३ तीळ
३ कलंकरहित
४ कोणते ही डाळ
४ उत्तम कुलोत्पन्न
५ गहूं
५ ज्ञानी (धारणाशक्ती)
६ हरभरे
६ दरिद्रीपणा रहित
७ तूर
७ हास्यमुखी
८ उडीद
८ मदरहित
९ मूग
९ नूतनवस्त्राभूषणप्राप्ति
१० राळे
१० मल (घाम) रहित शरीर
११ आळसुंदे
११ कुळतिळक
१२ भात
१२ विद्वान्-सर्व जाणणारा
अर्थात् भक्तिभावानें कोणतेहि धान्य देवांत अर्पण केलें तरी त्यांचे पुण्यफल मिळतेंच.