व्रतविधि- आषाढ शु० ८ दिवशी प्रभातर्ती या व्रतिकांनी शुचिजळांनी अभ्यंगस्नान करून आपल्या देहावर दृढधौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्यें करी घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापयशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत जिनेंद्राची प्रतिमा यक्ष, यक्षीसइ स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. तांदूळ व गहूँ यांचे पायस करून त्यांत दूध, तूप, साखर घालून नैवेद्य दाखवावे. ईडनिंबू, केळी, फणस, नारिंग, नारळ इत्यादि फळे चढवा- वीत. ॐ नहीं अईभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घाम मंगळारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. याचक्रमानें कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रतिदिनी पूजा करावी. शेवटी याचे उद्यापन करावें. त्यावेळीं चतुर्विशतितीर्थकर प्रतिमा यक्षय- क्षीसह तयार करवून तिची पंचकल्याणविधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. पांच प्रकारचे पायस, पंच पकानें तयार करून मुनीश्चरांस आहारदान देऊन आवश्यक वस्तु पाव्यात. नंतर आपण पारणें करावें. यांमध्ये अष्टमी चतुर्दशीला उपवास करावयास सांगितलें आहे. बाकीच्या दिवशीं भोजन करावें.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत काश्मीर नांवाचा विशाल देश असून त्यांत कौशंबी नांबाची सुंदर नगरी आहे. तेथें पूर्वी केशवांक नांवाचा मोठा पराक्रमी राना असून त्याला कौशिकी नांवाची सुंदर, गुणवती, राणी होती. त्यांचा कुसुमदत्त नामें एक राज- श्रेष्ठी होता. त्याला कुसुमदत्ता नाम्नी रूपवती, धर्मशील पत्नी होती. यांना ३२ पुत्र होते. हे तीनशें साठ ३६० कोटीचे अधिपती असल्यामुळे अनेक भोगोपभोगांत आयुष्य घालवीत होते. जणूं काय ? स्वर्गात जसा देवेंद्र सुख भोगतो. असे असतां, एके दिवशीं भुवनभूषण नामे दिव्य ज्ञानी महामुनीश्वर आपल्या मुनीसमुदायासइ येऊन उतरले. तेव्हां ही शुभवार्ता वनपालकाकडून राजास कळली. मग राजानें नग- रांत आनंदभेरी देववून दर्शनास जाण्याची तयारी केली. परिजन व पुरजन यांच्यासह तो पादमार्गे उद्यानांत गेला. तेथे मुनीश्वरांना तीन प्रदक्षिणा देऊन वंदनादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर कुसुमदत्ता श्रोष्ठणीनें मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून मुनींना प्रश्न केला. हे दयाघन महास्वामिन् ! आतां या भवांत आम्हांस इतकी धनकनकादि संपत्ति प्राप्त होण्याचे कारण काय ? पूर्वभवांत मी असले कोणतें व्रतविधान केलें असेल ? हा तिचा विनयपूर्ण प्रश्न ऐकून ते महामुनीश्वर म्हणाले, हे कन्ये ! तूं पूर्वभवांत या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कलिंग नांवाचा एक विस्तीर्ण देश असून त्यांत कनकपुर नांवाचे मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी कमलमुख नामें एक हीन, दीन, दरिद्री असा एक मनुष्य रहात असे. त्याची तूं कमलमुखी म्हणून स्त्री होतीस. तेव्हां तुझ्या पोटीं पुष्कळ मुळे होती. तुम्ही सर्व जन पोटाला अन्न मिळत नसल्यामुळे मोठ्या कष्टानें दुःखांत मोलमजूरी करून जीवन व्यतीत करीत होता.
एकदां देवपाल व यशोभद्र नांत्राचे दोघे मुनीश्वर एक महिनाभर उपवास करून पारणेकरितां नगरांत आले, चर्यामार्गाने ते आपल्या घरासमोर येतांच तुम्ही (कमलमुख व कमलमुखी) त्यांना योग्य रीतीनें प्रतिग्रहण करून घरी नेले आणि नवधामक्तीने आहारदान दिले. निरंतराय आहार झाल्यावर ते कांहीं वेळ ते तेथे एका आसनावर बसले. तेव्हां मोठ्या नम्रपणे आपले दोन्ही हात जोडून ती कमलमुखी त्यांना म्हणाली, हे भवसिंधुतारक स्वामिन् ! आतां आमचा हो नर जन्म अगदीं निरर्थक होऊन चाळला आहे. तर तो संपूर्ण सफल होण्यासाठीं एकादा उपाय सांगावा. ही तिची नम्रप्रार्थना ऐकून-मुनिराज अत्यंत गंभीर व मधुरवाणीनें तिला म्हणाले, हे कन्ये ! आतां तुला या दुःखदप्रसंगी हूँ भवरोगहराष्टमी व्रत पालन करण्यास योग्य आहे. कारण जे स्त्रीपुरुष भक्तीनें श्रीगुरुसन्निध हे व्रत घेऊन विधिपूर्वक करतात; त्यांना उत्कुष्ट पुण्यकर्माचे आत्तव होतात व इहलोकीं अनेक भोगोपभोग संपत्ति प्राप्त होते. पुढे त्यांच्या भवरोगाचा नाश होऊन त्यांना अक्षय आरोग्य प्राप्त होते. असे म्हणून त्यांनीं तिला ह्या व्रताचा सर्वावधि सांगितला.
हें सर्व कथन ऐकून कमलमुखीस आनंद झाला. मग तिनें हैं व्रत ग्रहण केलें. नंतर ते मुनिराज निघून गेले. पुढें काळानुसार तिनें हें व्रत पाळलें. शेवटी ती समाधिविधीनें मरण पावून या व्रतफळानें या नगरींत तूं या कुप्नुमदत्तास भार्या झाली आहेस. तेथील तुझीं तीं मुडेंच आतां पुनः तुझे पुत्र झाले आहेत. हे सर्व ऐकून सर्व जनांस मोठा आनंद झाला. नंतर राजा, राणी, वगैरे सर्व जनांनी त्या गुरुवर्याच्या चरणीं भक्तीनें वंदना करून हे व्रत सम्यक्त्वपूर्वक धारण केलें. मग पुनः सर्वजन त्यांना नमस्कार करून नगरी परत आले.
पुढें समयानुसार राजा, राज्ञी वगैरे सर्वांनी हे व्रत विधिपूर्वक पाळलें, या व्रतफलानें ते अनेक संसारभोगांचा अनुभव घेऊन क्रमानें सद्गतीस गेले. ती कुसुमदत्ता आपल्या अंतकाळीं आर्यिकेची दीक्षा घेऊन उग्रतपश्वरण करून अच्युत कल्पांत देव झाली. त्या कुसु- मदत्त श्रेष्ठीनें आपल्या प्रियकांतेच्या वियोगामुळे आपली सर्व धनलक्ष्मी आपल्या पुत्रांच्या स्वाधीन करून यशोधर मुनीश्वरासन्निध जिनदीक्षा घेतली. तो पुष्कळ काल घोर तपश्चर्या करून शुक्छध्यान बलानें सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला.