व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासीं येणाऱ्या कोण- त्याही नंदीश्वर पवीत पूर्णिमेदिवशीं या व्रतिकानीं शुचिजळांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौत वस्खें धारण करावीत. सर्व पूजासहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचीं अर्चना करावी. श्रुत व गुरु पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. ‘ॐ व्हां हीं हूं हैं। छः असिआउसा अई पंचपरमे ष्ठीभ्यो नमः स्वाहा’ ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. शक्तीप्रमाणें-उपवास, एकमुक्ति, एकाशन करून ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत दिवस घाळवावा. याच क्रमानें प्रत्येक मासांतील पौर्णिमेदिवशी असा पूजाक्रम करावा. चार महिनें पूर्ण झाल्यावर यांचे उद्यापन करावें, त्यावेळीं पंचपरमेष्ठीची प्रतिमा नूतन तयार करवून तिची पंच- कल्याणविधि पूर्वक प्रतिष्ठा करावी. पांच प्रकारचे पायस करून प्रत्येकीं सोळा १६ सोळा चरु करावेत. परमेष्ठी, मूलनायक, श्रुत, गुरु, चक्रश्वेरी, रोहिणी, ज्वालिनीं, पद्मावती (जक्कळम्मादेवी )
Add reaction
|
Add reaction
|