व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पवीत शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घेऊन ईर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर जिनेंद्राची प्रतिमा यक्षयक्षीसइ स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्ट- द्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. पंचभक्ष्य पाथसांचे चरु करून ओवाळावेत. ॐ हीं अष्टोत्तरसहस्रनामसहित श्रीजिनेंद्राय यक्ष- यक्षी सहिताय नम स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. श्रीजिन सहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदि- रास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. याचप्रमाणें चतुर्दशी दिवशीं पूजा करावी. याप्रमाणें चार महिने पूर्ण झाल्यावर याचे उद्या- पन करावें. त्यावेळीं श्रीजिनेंद्रास महाभिषेक पूजा करून अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. पांच प्रकारच्या भक्ष्यांचे पंचत्रीस चरु करून अर्पावेत. पांच मुनिगणांस आहारदान देऊन आवश्यक वस्तु द्याव्यात. तसेंच आर्यिका, ब्रम्हचारी यांनाहि द्यावें. श्रावकश्राविकांना आहारदान करावें. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा-
या जंबूद्वीपांतोल भरत क्षेत्रांत आर्यखंड असून त्यांत सुरम्य नामें सुंदर देश आहे. त्यांत भूतिलक नांवाचें मनोहर पट्टण असून तेथें पूर्वी देवपाल नामें राजा आपल्या लक्ष्मीमती राणीसह सुखानें राज्य करीत असतां, – एके दिवशीं देशभूषण नामक महादिव्य ज्ञानी मुनीश्वर त्या पट्टणाच्या उद्यान वनांत येऊन उतरले. ही शुभवार्ता वनपालकाकडून राजांस कळतांच तो नगरांत आनंदमेरी देववून सकल जनांसह पादमार्गे त्या वनांत गेला आणि त्यांना भक्तीनें तीन प्रदक्षिणा घालून वंदनादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ धर्मो- पदेश श्रवण केल्यावर राणीनें आपलीं दोन्ही करकमले जोडून नम्रपणें मुनीश्वरांस प्रश्न केला. हे स्वामि महाराज ! आज आपण आम्हांस सर्व सुखाची प्राप्ति होण्यासारखें एकादें व्रतविधान सांगावें. हे तिचें नम्र भाषण ऐकून ते तिला म्हणाले, हे राजकन्ये ! आतां तुम्हांस ‘ सर्वार्थसिद्धिव्रत’ हे पालन करण्यास योग्य आहे. कारण जे जीपुरुष हें व्रत भक्तीने करतात, त्यांना इइपरलोकीं इष्टार्थसुखाची प्राप्ति होतें. पुढें मोक्षसुखहि अवश्य मिळतें. असे म्हणून त्यांनीं सर्व व्रतविधि त्यांना सांगितला. हे सर्व कथन ऐकून सर्वास मोठा आनंद झाला. मग लक्ष्मी- मती व सुवर्णमाला यांनी हे व्रत त्यांच्या जवळ ग्रहण केलें. नंतर सर्वजन त्यांना नमस्कार करून पट्टणीं परत आले. पुढे कालानुसार हैं व्रत यथाविधि त्यांनी पाळून उद्यापन केलें. त्यायोगें त्या दोघीहि महैश्वर्य संपन्न होऊन योग्यरीतीनें संसार सुखाचा पूर्ण अनुभव घेतल्या. शेवटीं दीक्षा घेऊन घोरतपश्चर्येनें सर्वार्थसिद्धति जन्मून तेथील सुख भोगूं लागल्या.