व्रतविधि – फाल्गुन मासांत उत्तराफाल्गुनी नक्षत्र ज्या तिथीस पूर्ण असेल त्या तिथीस या व्रतधारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान
करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत, मग सर्व पूजासामग्री आपल्या करी घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीआदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुखचक्रेश्वरीयक्षयक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. त्यांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. श्रीसरस्वती व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं अई श्रीआदिनाथाय गोमुखचक्रेश्वरी यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्री आदिनाथ चरित्र वाचावे. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत महार्घ्य करून ओवाळीत तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहा- रादि दाने द्यावीत. ब्रम्हचर्य पाळावें. दुसरें दिवशीं पारणे करावें.
या प्रमाणें फाल्गुन मासांतील उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा करून केल्या जाणाऱ्या उपवासास’ पंचकल्याण’ हे नांव आहे. या उपवासाच्या योगानें एक लक्ष १००००० उपवास केल्याचें फळ मिळतें.
तसेंच चैत्र मासांतील चित्रा नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उप- वास करावा. या दिवशीं केलेल्या उपवासाला’ अष्टमहाविभूति ‘ हे नांत्र आहे. या उपवासानें दोन लक्ष २००००० उपवास केल्याचे फळ मिळतें.
वैशाख मासांतीळ विशाखा नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उप- वास करावा. या दिवशीं केलेल्या उपवासाला ‘ जिनदर्शन ‘ हे नांव आहे. या उपवासानें चार लक्ष उपवास केल्याचें फळ मिळतें.
ज्येष्ठमासांतील ज्येष्ठ नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास
करावा. या दिवशी केलेल्या उपवासास ‘चतुर्विंशतितीर्थकर ‘ हे नांव आहे. या उपवासानें आठ लक्ष ८००००० केल्याचे फळ मिळते.
आषाढमासांतील पूर्वाषाढा नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उप- वास करावा. त्या दिवशी केलेल्या उपवासाला ‘अनंतश्रीवर्धन’ हे नांव आहे. या उपवासानें सोळालक्ष १६००००० उपवास केल्याचे फळ मिळते.
श्रावणमासातील श्रवण नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास करावा. या दिवशी केलेल्या उपवासास’ धर्मानंद’ हे नांव आहे. या उपवासानें बत्तीस लक्ष ३२००००० उपवास केल्याचे फळ मिळते.
भाद्रपद मासांतील उत्तराभाद्रपदा नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास करावा. या दिवशी केलेल्या उपवासाला ‘आयुर्वर्धन’ हे नांव आहे. या उपवासानें चौसष्टलक्ष ६४००००० उपवास केल्याचें फळ मिळते.
आश्विन मासांतील अश्विनी नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास करावा. या उपवासाला ‘ श्रीवर्धमान’ असे म्हणतात. या उपवासानें एक कोटी आड्डात्रीस लक्ष १२८००००० उपवास केल्याचे फळ मिळतें.
कार्तिक मासांतील कृत्तिका नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उप- वास करावा. या उपवासाला’ आरोग्यज्ञानवर्धन’ हे नांव आहे. या उपवासानें दोन कोटी छप्पन्न लक्ष २५६००००० उपवास केल्याचे फल मिळतें.
मार्गशीर्ष मासांतील मृगशिर नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास करावा. या उपवासाला ‘परमैश्वर्यवर्धन’ म्हणतात. या उपवासानें पांच कोटी बारा बक्ष ५१२००००० उपवास केल्याचें फळ मिळतें.
पौषमासांतील पुष्य नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास करावा. या उपवासास’ पंचालंकार’ म्हणतात. या उपवासानें दहा कोटी चोवीस लक्ष १०२४००००० उपवास केल्याचें फळ मिळतें.
माघ मासांतील मघा नक्षत्रावर पूर्ववत् पूजा करून उपवास करावा. या दिवशीं केलेल्या उपवासाला’ धनवर्धन’ हे नांव आहे. या उपवासानें वीस कोटी आड्ठेचाळीस लक्ष २०४८००००० उपवास केल्याचें फळ मिळतें.
याक्रमानें तीन वर्षे तीन महिने ही व्रतपूजा व उपवास करावेत. असे एकूण एकोणचाळीस ३९ पूजा व उपवास करावेत. या ३९ उपवासांनीं चाळीस कोटी पंचाण्णवलक्ष ४०९५००००० उपवास केल्याचें फळ मिळतें.
याप्रमाणें सर्व पूजा व उपवास पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळी श्रीआदिनाथ तीर्थकरांची नूतन, सुवर्ण गोमुखचक्रे- श्वरीयक्षयक्षीसहित निर्माण करून तिची पंचकल्याणविधिपुरःसर प्रतिष्ठा करावी. चतुःसंघांस चतुर्विधदानें द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
हे व्रत श्रीगुरुजवळ ग्रहण करून जे भव्यात्मे यथाविवि पालन करितात, त्यांना अपार पुण्यबंध होतो. आणि त्यायोगानें त्यांना सर्व अभ्युदयसुखें मिळून शेवटीं क्रमानें मुक्तिसुखही अवश्य प्राप्त होतें. असा या व्रताचा प्रभाव आहे.
– कथा –
ज्यांनीं क्षुधादि अठरा दोष नाश केले आहेत, ज्यांना लोका- लोकांस प्रकाश करणारे केवलज्ञान प्राप्त झाले आहे; जे नरेंद्र, नागेंद्र वगैरे शतेंद्रांनीं वंद्य झाले आहेत; जे परमागमाचें अधिपति झाले आहेत असे श्रीमहावीर तीर्थकर हे केवलज्ञान संपन्न होऊन समवसरणासह आर्यखंडांत देशोदेशीं भव्यजनांस उपदेश करीत विहार करीत असतां एकदां बुद्धायन राजा आपर्ला धर्मपत्नी इंद्रायिणी व इतर परिवार जन यांसह मोठ्या आदरानें भगवंतांच्या समवसरणांत प्रवेशून त्यांचे त्रिप्रद- क्षिणापूर्वक दर्शन, पूजन, स्तवन वगैरे करून मानव कोष्ठांत जाऊनबसला. कांहीं वेळ दिव्यध्वनींचा तत्त्वोपदेश श्रवण केल्यावर इंद्रायिणी राणी आपली दोन्ही करकमले विनयाने जोडून गौतमगणधरांस म्हणाली- भो भवसिंधुतारक जगद्गुरो ! आज आपण आम्हांस सर्व पापनाशक आणि सर्वसुखप्रद असें एकादें व्रतविधान सांगावे. हे तिचे विनयपूर्ण वचन ऐकून ते गणेंद्र तिला म्हणाले, हे भव्यगुणमणे कन्ये ! आतां तुम्हांस चक्रवाळव्रत हैं पालन करण्यास अत्यंत उचित आहे. असे म्हणून त्यांनी त्याचा सर्वविधि तिला सांगितला. ते सर्व ऐकून इंद्रायणी वगैरे सर्व जनांस मोठा आनंद झाला. मग तिनें त्यांना वंदना करून हैं व्रत भक्तीनें त्यांच्या जवळ ग्रहण केलें. मग सर्वजन भगवंतांस आणि समस्त मुनिगणांस नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढे काळानुसार त्या इंद्रायणीनें हें व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केलें. त्यायोगानें ती अंती संन्यासविधीनें मरून त्रीलिंग छेदून स्वर्गात देव झाली; आणि भवांतरानें मोक्षास गेली.