व्रतविधि – चैत्रादि बारामासांतून कोणत्याहि मासांत ज्या दिवशी बुधवारी अष्टमी तिथी असेल त्या दिवशीं प्रातःकाळीं या व्रतधारकांनीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावीत. मग सर्व पूजासाहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धयादि क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीपंचपरमेष्ठी वर्धमान तीर्थकर प्रतिमा मातंग सिद्धायिनी यक्षयक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढें एकापाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यांवर पांच पानें मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फलें, पुष्पें वगैरे द्रव्यें ठेवावीत. आणि त्यांपुढें एक भाताचा मोठा पुंज घालून त्यावर एक कुंभ सुशोभित करून ठेवावा. त्याच्या मुखावर पांच पानें लावून एक नारळ ठेवून एक पुष्पमाला घालावी. नंतर त्यांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचपकान्नांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. नंतर यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं वर्धमानजिनेंद्राय मातंगसिद्धायिनीयक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्रानें पांच वेळां पुष्पांजलि क्षेपण करून १०८ जप करावेत. श्रीजिनसहस्रनाम- स्तोत्र म्हणून वर्धमान तीर्थकरचरित्र आणि ही व्रतकथाहि वाचावी.. ॐ ह्रां हीं हूं ह्रौं ह्रा: असिआउसा स्वाहा ।। या मंत्राने १०८ फुलें घालावीत. मग एका पात्रांत आठ पानें लावून त्यांच्यावर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावा. त्यादिवशीं उपवास करून धर्म- ध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावीत. ब्रम्हचर्य पाळावे. दुसरे दिवशीं पारणा करावी.
Add reaction
|
Add reaction
|
ReplyForward Add reaction
|