व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पति शु० ८ दिवशीं प्रभाती शुचिजलानी या व्रतिकांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वखें घ्यावीत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा करून ईर्या- पथशुद्धिपूर्वक जिनेश्वरांस भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा, पीठावर जिनेंद्र प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करात्री. श्रुत व गुरुपूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अष्टोत्तर सहस्रनामसहितजिनेंद्राय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. फुलांची माळ एक देवांस घालावी. नंतर एक महार्घ्य करून (दोनपानें, मूठभर तांदूळ, एक सुपारी, जल, गंध, फूल, चरु, वगैरे लावून ) त्यानें ओवाळीत जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. ब्रम्हचर्यपूर्वक उपवासादिक करावें. संध्याकाळी तुपाची दीपारती करावी. याचप्रमाणें शु. १४ पर्यंत प्रतिदिनी पूजा करावी. मग पौर्णिमेदिवशीं याचे उद्यापन करावे. त्यावेळी जिनेंद्रास महाभिषेक पूजा करून पोळ्यांचे २४ चरु तयार करून चोवीस तीर्थकरांना अर्पावेत. पोळ्यांचेच बारा चरु श्रुतदेवीस अर्पावेत. मुनीश्वरादिकांस आहारदान करून आपण पारणा करावी. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड असून त्यांत भूमिभूषण नामक एक विशाल सुंदर देश आहे. त्यांत भूतिलक नांवाचें एक नगर आहे. तेथे पूर्वी देवपाल नांवाचा राजा आपल्या सुशील व धर्मशील अशा पट्टराणीसह सुखानें राज्य करीत असे. एके दिवशीं नगराच्या बहिरुयानवनांत मतिसागर या नांवाचे दिव्यज्ञानी मुनीश्वर आले. हे शुभवृत्त वनपालकाच्या द्वारें राजास कळतांच तो नगरांत आनंदमेरी देववून सकल जनांसह उथानवनांत गेला. मुनीश्वरांना प्रदक्षिणा वंदनादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला, कांहीं वेळ धर्मश्रवणानंतर लक्ष्मीमती राणी ही विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाली- मो भवसिंधुतारक स्वामिन् ! आज आपण आम्हांस सुगतीचे कारण असे एकादे व्रतविधान सांगावें. ही तिची नम्रोक्ती ऐकून ते महामुनि तिला म्हणाले, हे कन्ये! आतां तुम्हांस कल्पकुज हे व्रत करण्यास उचित आहे. कारण हैं व्रत जे भव्य नरनारी गुरुजवळ घेऊन पाळतात; त्यांना अनेक सुखें प्राप्त होऊन क्रमानें मोक्षसुखहि मिळतें. असें म्हणून त्यांनी तिला त्याचा सर्वविधि सांगितला. ते ऐकून सर्व जनांस मोठा संतोष झाला. मग लक्ष्मीमतीनें हें व्रत त्यांच्या जवळ भक्तीनें वंदना करून घेतलें. नंतर सर्वजन त्यांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढें तिर्ने हे व्रत यथाविधि केलें. या व्रत- पुण्यफलानें इहलोकीं ती अनेक सुखें भोगून क्रमानें निर्वाण पदास पोचली.