व्रतविधि– माघ कृ. १ दिवशीं या व्रतधारकांनी प्रातःकाळी सुखोष्णजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावींत. मग सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करा- व्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीशांतिनाथ तीर्थंकर प्रतिमा गरुडयक्ष महामानसी यक्षी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. श्रीवृषभापासून शांतिनाथापर्यंत १२ सोळा तीर्थकरांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्यांची अष्टद्रव्यांनी पूजा करावी. चरु करावेत. याप्रमाणें अभि- षेक व पूजा चार वेळां करावी. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ हीं अर्हं श्रीं क्लीं ऐं अर्हं श्रीशांतिनाथाय गरुडयक्षमहामानसीयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळ जप करावा, श्रीजिनसहस्त्रनामस्तोत्र म्हणून श्रीशांतिनाथचरित्र वाचावें. मग एका पात्रांत १६ पानें लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावींत. ब्रम्हचर्यव्रत पाळावें. दुसरे दिवशीं पारणा करावी. या प्रमाणें महिन्यांतून एकदां त्याच तिथीस पूजा करावी. अशा पंचवीस पूजा पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावें, त्यावेळी श्रीशांतिनाथविधान करून महाभिषेक करावा. चतुः संघास आहारादि दाने द्यावीत. मंदिरांत चार कलश, घंटा, धूपघट, लाकडी पंचमंदर, ध्वज वगैरे आवश्यक उपकरणें ठेवावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे. हे व्रतपूजन यथाविधि केल्यामुळे पूर्वी पुष्कळ भव्यपुरुषांना सर्व अभ्यु- दय सुर्खे मिळून पुढें क्रमानें मोक्षसुखही प्राप्त झालें आहे. याकरितां
हे भाविकजनहो ! तुम्ही हे व्रत श्रीगुरुजवळ घेऊन यथाविधि पाळून त्याचे उद्यापन करा. म्हणजे तुम्हांसही सर्वसांसारिक सुखें मिळून शेवटी मुक्ति सुखदी प्राप्त होईल.