व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वरपर्यंत अष्टमी दिवशी या व्रतिकांनी प्रभाती शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बखें ध्यावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करून अष्ट- द्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुन व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचें अर्चन करावें. गव्हाचे पायस, तूप, साखर यांचें पांच चरु करावेत. ॐ हां हीं हूं हौं छः असिआउसा स्वाहा या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करावा. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारदान देऊन पारणा करावी. ही पहिल्यांदा पूजा झाली. आतां दुसऱ्यांदा अष्टमी दिवशीं वरील प्रमाणेंच पूजा करून सेत्रायांचे चरु करावेत. तिसऱ्या अष्टमी दिवशीं पूजाक्रम करून सूजी, पायस, तूप, साखर यांचे चरु करावेत. चौथ्या अष्टमीस पूजाक्रम करून तांदुळाचे पायस, तूप, साखर लावून चरु करावेत. पांचव्या अष्टमी दिवशी याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचपरमेष्ठींस पंचामृतपूर्वक महा- भिषेक पूजा करावी. (ऐदु बणियोळु) पांच दोण्यांत २५ चरु, २५ [ मरबणियोळु ] पत्रावळींत ९ चरु, करावेत. सत्पात्रांस आद्वारादि दाने धात्रींत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड असून त्यांमध्ये चंद्रवर्धन नायें देश आहे. त्यांत चंद्रपुर नांवाचे सुंदर नगर असून तेथे पूर्वी चंद्रशेखर राजा आपल्या चंद्रलेखा राणीसह नीतिनें व शूरत्वानें राज्य करीत होता. एके दिवशी नगरोद्यानांत यशस्तिलक नामें महर्षि ३७०० मुनि संबासह येऊन उतरछे, हे कुशुमवृत्त वनपालकाकडून कळतांच राजा नगरांत आनंदमेरी देषवून सकलजनांसह पादमार्ग उद्यानांत गेला आणि मुनीश्वरांना त्रिप्रदक्षिणापूर्वक नमस्कार, पूजादि करून धर्मोपदेश ऐकत बसला. धर्मश्रवणानंतर चंद्रलेखा आपले दोन्ही हात विनयाने जोडून मुनींद्रास म्हणाली, भो दीनजनोद्धारक महास्वामिन् ! आतां आपण आम्हांस सुगतिसाधक असे एकादे व्रतविधान सांगावे. हे तिचे नम्र वचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले- हे कन्ये! आतां तुला नित्यसुख- दाष्टमी हे व्रत पाळण्यास योग्य आहे. या व्रतपुण्यफलाने सांसारिक सुर्खे प्राप्त होऊन क्रमाने शेवटी मोक्षसुख मिळते. असे म्हणून त्यानीं त्याचा सर्वविधि तिला सांगितला. नंतर ते म्हणाले, हे कन्ये ! पूर्वी या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत एक विशाल देश असून त्यांत नित्यवसंत नांत्राचे मनोहर पट्टण आहे. तेथे प्राचीनकाळीं सत्यसागर नामक राजा चिचोत्सवी राणीसह राज्य करीत होता. त्याच पट्टणी नित्यरोग नांत्राचा एक गृहस्थ (परदं) राहात असे. त्याला नित्यदुःखी नांवाची सुशील स्त्री होती. यांना माणिक, मदन, विजय, मनोहर असे चार पुत्र होते. हे सर्व दारिश्यावस्थेत काल कंठीत होते. एके दिवशीं भूतानंद नामक भट्टारक मुनि पारणेंकरितां पट्टणांत आले. यांच्या घरासमोर येतांच या दंपतीनी पडगाऊन त्यांना पाकगृहीं नेलें व नवधाभक्तीनें आहार दिला. आहार झाल्यावर मुनिराज बसले असतां ती नित्यदुःखी मुनींद्रास आपले हात जोडून विनयानें म्हणाली, हे भवोदधितारक महागुरो ! आतां आम्हांस दारियाचें जें दुःख होत आहे; ते निवारण होण्यासारखा एकादा उपाय सांगावा. हे तिचें नम्र भाषण ऐकून ते तिळा म्हणाले, हे कन्यके! आतां या संकटसमयीं तुम्हांस नित्यसु- खदाष्टमीव्रत हे पालन करण्यास उचित आहे. असे म्हणून तिला सत्रत्रिधि त्यांनी सांगितला. ते ऐकून मोठ्या भक्तीनें तिनें त्यांच्याजवळ हे व्रत ग्रहण केलें. मग ते मुनिराज निघून गेले. पुढें काळानुसार तिनें हें व्रत यथाविधि पाळिलें. त्यायोगें तिला सर्व सुखें प्राप्त झाली. बें ऐकून सर्वजनांस अतिशय आनंद झाला.
हें कथन ऐकून चंद्रलेखा राणी वगैरे जनांस मोठा संतोष वाटला. नंतर सर्वजन त्यां यशस्तिलकादि मुनीश्वरांना नमस्कार करून पट्टणीं परत आले. पुढें कालानुसार चंद्रलेखा राणीनें हूँ व्रत यथा- विधि पालन केलें.
पुढे एके दिवशी एका सामुद्रिक शास्त्रज्ञांच्या मुखें’ आपलें आयुष्य केवळ सात दिवसाचें उरलें आहे’ असें ऐकतांच तिच्या मनांत पूर्ण वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे ती तत्काळ लक्ष्मीमती नामक आर्थिकेजवळ जाऊन त्यांना वंदना करून त्यांच्या समीप दीक्षा घेती झाली. सकल सन्यास धारण करून वैयावृत्याची अपेक्षा न करतां निःसंग होऊन स्त्रीलिंग छेदून पंधराव्या स्वर्गात देव झाली. तेथे तो देव चिरकाल दिव्यसुख भोगून तेथून च्यवून या लोकीं पुष्कलावती देशांतील पुंडरीकिणी नगरांत सिंहस्थ महाराज व त्यांची पट्टस्त्री सुकांतादेवी यांना तो देव ( चंद्रलेखाचर) शत्रुंजय नामें पुत्र झाला. तो कुगारावस्थेतच गुरुकडून जिनदीक्षा घेऊन घोरतपश्चर्या करूं लागला. तपानें-शुक्लध्यान बलानें-सर्व कर्माचा क्षय करून निर्वाणपदीं गेला.