व्रतविधि – ज्येष्ठ शु. ११ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. शु. १२ दिनीं प्रभातीं शुचिजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ- धौतबखें धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास त्रिप्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. ब्रम्हचर्यपूर्वक उपवासाचा नियम करावा. पीठावर जिनेंद्र आणि सिद्ध-प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं असिआ- उसा अनाहतविद्यायै श्रीसिद्धाधिपतये नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. आणि ॐ नमः सिद्धेभ्यः’ या मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारदान देऊन पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावें.
याक्रमानें बारा महिने त्याच तिथीस पूजाक्रम करावा. शेवटीं उद्यापन करावें, त्यावेळीं श्रीसिद्धचक्रविधान करावें. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
श्रेणिक आणि चेलना राणीचीच कथा आहे. प्रथमतः पहिल्या व्रतकथेंतच सर्व वर्णन आहे म्हणून येथे दिली नाहीं.