व्रतविधि – श्रावण शु. १४ दिनीं प्रातःकाळी या व्रतिकांनीं प्रासुक पाण्यांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बखें घ्यावीत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा
देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत श्रीजिनप्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभि- बेक करावा. अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं श्रीं क्लीं ऐ अई अईत्परमेष्ठिने यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें फुडें घालावीत. जिनसहस्त्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. यथाशक्ति ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करावा. दुसरें दिवशीं चतुःसंघास चतुर्विध दानें बाबींत. नंतर पारणा करावी. याप्रमाणे हे व्रत १७ सतरा महिनें याच तिथीस (प्रति शु. १४ स.) करावें. आणि शेवटीं याचें उद्यापन करावें. त्यावेळी ‘विमानशुद्धि’ विधान करावें. सत्पात्रांत आहारदान देऊन पुरोहितांस पंचरत्नांची दक्षिणा धावी. असा याचा पूर्णविधि आहे.