व्रतविधि – मार्गशीर्ष शु. ८ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनी सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे व्यार्वीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयीं जावें. ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियां- पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर पार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा धरणद्रयक्ष पद्मावती यक्षीसह स्थापून एका कलशांत दूध, तूप, साखर यांचे मिश्रण करून त्यानें प्रथम अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताभिषेक पूजा करून अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु मांची पूजा करून यक्षयक्षी व ब्रम्हदेव यांचें पूजन करावें.
ॐ व्हीं श्रीं ह्रीं ऐं अई श्रीपार्श्वनाथतीर्थकराय धरणेंद्रपद्मावती यक्षबक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप कराया. पार्श्वनाथचरित्र आणि ही व्रतकथादि वाचावी. मग एका पात्रांत नऊ पार्ने छावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेऊन महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशी उपवास करून धर्म- ध्यानांत ब्रम्हचर्यपूर्वक काळ घालवावा. दुसरे दिवशी पारणा करावी.
या क्रमाने सोळा १६ अष्टमीस सोळा पूजा पूर्ण झाल्यावर शेवटी याचे उद्यापन करावें. त्यावेळीं पार्श्वनाथविधान करून महाभिषेकपूजा करावी. चतुःसंघास चतुर्विध दानें द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.