व्रतविधि – आषाढ मासांतील शुक्लपक्षांत चतुर्दशी दिवशी या व्रतधारकांनीं प्रभातीं शुचिजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत- वर्षे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्राम भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठीची प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं अईत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हीं व्रतकथा वाचावी. देवापुढें एका पाटावर पांच पानें मांडून त्यावर अक्षतांचे पांच पुंज, फलें, (बेल्लदच्चु) तिळगुळाचे लाडू, वगैरे पदार्थ ठेवावेत. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास
तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. या दिनीं उपवास करावा. सत्पात्रांस आहारदान द्यावें. दुसरें दिवशीं पूजा, दान करून आपण पारणे करावे. याच क्रमानें यांच तिथीस चार महिने पूर्ण झाल्यावर पांचव्या मासीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठी विधान करून महाभिषेक पूजा करावी. पंचभक्ष्यांचे पांच चरु करावेत. चतुःसंवास चतुर्विध दानें, देऊन आपण पारणा करावी. असा याचा पूर्णविधि आहे.
-कथा-
या जंबू द्वीपांतील भरतक्षेत्रांत कांभोज या नांवाचा एक विशाल देश असून त्यांत एक चित्रांगपूर नामें सुंदर नगर होतें. तेथे प्राचीन काळीं सुखविद नामक राजा आपल्या सुभद्रा नामें पट्टराणीसह हास्य विलासांत सुखाने राज्य करीत होता. त्याच नगरी बंधुदत्त नांवाचा श्रेष्ठी आपल्या बंधुमती पत्नीसह राहत असे. त्यांना नंदन नामें एक पुत्र होता. हा नवयौवनावस्थेत आला असतां, एके दिवशीं देवदर्शन करणेसाठीं चैत्यालयांत गेला होता. जिनेश्वरांस नमस्कार करून बाहेर आला. तोंच तेथे एक वरदत्त नामक दिगंबर महामुनि त्याच्या दृष्टीं पडले. तेव्हां त्यांच्या सन्निध जाऊन भक्तीनें त्यांना नमस्कार करून बसला. मग पांच अणुव्रतें त्यांनें ग्रहण केलीं. नंतर वंदना करून तो आपल्या गृहीं परत आला.
पुढें तो दुष्ट लोकांच्या संगतीनें सप्त व्यसनांत आसक्त झाला. त्यामुळे त्यानें गुरुजवळ घेतलेलीं पंचाणुत्रतें सोडून दिलीं. याप्रमाणे व्रत भ्रष्ट झाल्यामुळे आयुष्यांती मृत्यु पावून तमःप्रभा नरकांत जाऊन उत्पन्न झाला. तेथें तो बावीससागर वर्षे घोरदुःखें भोगूं लागला. नंतर तो आयुष्यावसांनी तेथून मरण पावून या भूलोकांत कौशलपुर नांवच्या नगरांत सोमदत्त श्रेष्ठीच्या गृहीं महिष (म्हैस) होऊन जन्मला.
एकदां ती म्हैस शेतांत चरावयास गेली असतां तिच्यावर एकाएकी विद्युत्पात झाल्यामुळे कंठगत प्राण होऊन पडली. तेव्हां जवळच अस
लेल्या एका श्रीमती नामक आर्थिकेने आपल्या (कुडिकेतील) कमंड सुतील पाणी तिच्या तोंडात घालून तिला व्रतें दिली. व णमोकार मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रस्मरणांत ती म्हैस मरण पावली.
इकडे उज्जयनी नामें नगरी यशोभद्र नांत्राचा राजा आपल्या सुमती नामें खीसह सुखानें राज्य करीत होता. त्यांना (त्या म्हशीचा जीव) कुब्जक व मूक अशी एक कन्या झाली. तिला चालतां देखील येईना.
एके दिवशी त्या नगराच्या बहिरुद्यानवनांत सहस्त्रकूट चैत्यालयाची बंदना करण्यासाठीं अरिंजय व अजितंजय नांवाचे दोघे चारणमुनि अकस्मात् येऊन उतरले. ही शुभवार्ता वनपालकाच्या द्वारें राजांस कळली. मग तो आपल्या नगरांत सेवकांकडून दंवडी देबवून सर्व जनां- सह मोठ्या उत्साहानें वनांत गेला. मुनिवयीस त्रिप्रदक्षिणापूर्वक बंदनादि करून त्यांच्या समीप बसला. त्यांच्या मुखें कांहीं वेळ धर्मोपदेश ऐक- ल्यावर राजानें मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्यांना विचा- रिलें, – भो दयासागर महामुने ! ही माझी कुमारी अशी कुबडी, मुकी, लुळी होण्याचे कारण काय ? हे त्याचें वचन ऐकून मुनीश्वर म्हणाले, – हे राजन् ! या जीवानें पूर्व जन्मांत पांच अणुन्नतें एका गुरुजबळ घेऊन तीं सोडून दिली. त्या कारणानें आतां ही अशी व्यंग झाली आहे. हे त्यांचे भाषण ऐकून राजा त्यांना म्हणाला, भो दयाघन स्वामिन् ! आतां आपण या कुमारीस त्या पूर्वजन्मांतील व्रतभंग-दोषाचा परिहार होण्यासारखा एकादा उपाय सांगावा. हे ऐकून ते म्हणाले, – आतां तिला त्रिभुवनतिलक व्रत हैं पालन करण्यास योग्य आहे, जे भव्य जीव हैं व्रत गुरुजवळ स्वीकारून यथाविधि पाळतात, त्यांना या भवांत उत्कृष्ट पुण्यबंध होऊन त्यायोगें ऐहिक व पारलौकिक सुखें प्राप्त होतात. आणि क्रमानें मोक्षसुखहि अवश्य प्राप्त होतें. असें म्हणून त्यांनीं त्यांस या व्रताचा सर्वविधि सांगितला. ते ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला.
मग राजानें आपल्या कुमारीस ती व्रतें सुनीश्वरांकडून स्वीकारावयास लाविलीं. नंतर सर्वजन त्या मुनींद्रांच्या चरणी भक्तीनें नमस्कार करून नगरी परत आले. आणि ते मुनीश्वरहि तेथून निघून गेले.
पुढें कालानुसार हे व्रत राजानें आपल्या कन्येकडून यथाविधि पालन करबिलें. त्यामुळे कुमारीस सुस्वरूप प्राप्त झाले. मंजुळ बाचा फुटली. चांगलें चालतां येऊ लागले.
इकडे अवंति देशांत वैदर्भ नांवाचे मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी शत्रुंजय नामक मोठा पराक्रमी जयशाली राजा आपल्या सुशील लावण्यवती अशा लक्ष्मीमती नामें पट्टस्त्रीसह सुखानें राज्य करीत होता. त्यांना सुरराज नामक अत्यंत गुणवान्, रूपवान् व सुंदर पुत्र होता. तो यौवनावस्येंत आला असतां, त्या यशोभद्र राजानें आपली कन्या ती या सुरराज राजकुमारास विवाह करून दिली. नंतर त्या युवतीने आपल्या पतीसह पुष्कळ काळपर्यंत संसारसुख भोगली. शेवटी तिच्या मनांत या संसाराविषयीं विरक्ति उत्पन्न झाल्यामुळे ती एका आर्थिकेसमीप दीक्षा ग्रहण करून आर्थिका झाली. पुष्कळ काल तपश्चर्या करून आयुष्यांतीं स्त्रीलिंग छेदून सौधर्म स्वर्गात देव झाडी. तेथें तो देव चिरकाल स्वर्गीय सुखाचा अनुभव घेऊं लागला. आयुष्यावसांनी तेथून च्यवून तो या मृत्युलोकांत मोठा बळवान् असा अर्धचक्री राजा झाला. तेथे तो राज्यैश्वर्य भोगून शेवटीं मनांत वैराग्यभावना आल्यामुळे एका मुनीश्वरांजवळ दिगंबर जिनदीक्षा घेतां झाला. घोर तपश्चरण करून तो अच्युत वर्गात देव झाला. तेथें तो पुष्कळ वर्षे दिव्य सुख भोगून तेथून च्यवून पुनः या ठोकीं एक मोठा क्षत्रिय राजा झाला व अनेक राज्यैश्वर्य भोगून संसाराविषयीं विरक्त झाला. आणि तो एका मुनीश्वरां- जवळ जिनदीक्षा घेऊन घोरतपश्चर्या करून शुक्लध्यान बलाने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला.