व्रतविधि-आषाढ मासांतील नंदीश्वर पर्वांत शु. ८ दिवशी
अमाती या अतिकांनी पालुक उदकांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढचौतवले धारण करावीत. सर्व पूजासामश्री हातीं घेऊन जिनालयीं जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि पूर्वक भक्तीनें जिने- द्रास साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्ष- बक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. फुलांची माळ एक देवास वाहावी. कर्पूराची आरती ओवाळावी. श्रुत व गुरु पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, ज्वालामालिनी, पद्मावती, जलदेवता ( जक्कळदेवी) यांची अर्चना करून त्यांच्या नामोच्चारणानें तीन सुत्रासिनी स्त्रियांस कुंकू लावावा. ॐ हीं अर्ह चतुर्विंशतितीर्थकरेभ्यो यक्षयक्षीस- हितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळींत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगला- रती करावी. सत्पात्रांस आहारदान द्यावें.
याच क्रमाने प्रतिदिनीं चार महिने पूजाक्रम करावा. अष्टमी चतु- देशीस शक्ती प्रमाणें उपवासादिक करावे, ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. शेवटीं कार्तिक १५ पौर्णिमे दिवशीं या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं जिनेंद्रास पंचामृतपूर्वक महाभिषेक करावा. तीन प्रकारच्या मध्यांचे आणि पोळ्यांचे पांच चरु करावेत. तिघां सुवासिनी स्त्रियांस वाथने द्यावीत. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. नंतर पारणा करावी, असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबू द्वीपांतीक भरत क्षेत्रांत सुरम्य नांवाचा देश असून हस्तिनापुर नामक एक अत्यंत मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी भूपाल