व्रतविधि – चैत्र कृ. २ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतधारकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत.. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनाळयीं जावें. मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेश्वरांस साष्टांग नमस्कार करावा. जिनेद्रास पंचमृताभिषेक करून त्याची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, पंचमक्ष्य पायसांचे बारा चरु करावेत. ॐन्हीं अष्टोत्तरसहस्र- नामसहितश्रीजिनेद्राय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पे घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही प्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगकारती करावी, स्यादिवशी ब्रम्हचर्यपूर्वक उप- बास करावा. दुसरे दिवशी सत्पात्रांस आहारदान करून आपण पारणा करावी. या प्रमाणे प्रत्येक मासाच्या कृ. २ दिवशीं पूजाक्रम करावा. बारा पूजा बारा महिन्यांत पूर्ण झाल्यावर शेवटी यांचे उद्यापन करावे. त्यावेळीं चोवीस तीर्थकरविधान महाभिषेक पूर्वक करावे. सत्पात्रांस चतुर्विधदाने धात्रींत. असा याचा पूर्णविधि आहे.