व्रतविधि – आषाढ ८ दिवशीं प्रमाठीं या व्रतिकांनीं शुद्धजलांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत, सर्व पूजा सामग्री घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेश्वरांस मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा, श्रीजिने- द्रास पंचामृताभिषेक करून अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. देवापुढे तीन पार्ने मांडून त्यांवर’ अक्षता, फलें, फुले ठेवावीत, ॐ नहीं श्रीं क्लीं ऐं अहे अर्हत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एक महाध्ये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. याचप्रमाणें नित्यपूजाक्रम चार महिने पर्यंत करावा. नंदादीप लावावा. पुढे येणाऱ्या कार्तिक शु. १५ दिनी याचे उद्यापन करावें. त्यावेळी जिनेश्वरास महाभिषेकपूजा करावो. श्रुत व गणधर यांची पूजा करून पद्मावती आणि जलदेवता (जक्कलदेवी )
यांचे अर्चन करावे. मातीचे तांबडे नूतन बारा मोगे धुवून घेऊन देवापुढे शुद्धभूमीवर अक्षतांचे बारा स्वस्तिक काढून व्हींकार बीजमंत्र लिहून त्यांच्यावरती ठेवावेत. त्यामध्ये १२ प्रकारची धान्ये भरावीत. त्या शिवाय १२ बारा फलश घेऊन त्यांत दूष, तूप, साखरें ही घालून त्या बारा मोग्यावरतीं ठेवावेंत. त्यांना सूत गुंडाळावें त्यांच्यावर बारा-फलें. कडाकण्या (मंडगी !) ठेवावीत. त्यांतून दोघां सुवासिनी स्त्रियांस दोन वायने धावींत. आपण एक घेऊन घरी यांचे. सत्पात्रांस आहारादि चारी दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
एकदां श्रेणिक महाराज वीरप्रभूच्या समवसरणांत समस्त जनां- सह बसले असता, – श्रेणिक राजांचे श्रेष्ठिर्य जे विजयसेन त्यांची धर्मपत्नि विजयावती ही आपलीं दोन्हीं करकमले मोठ्या विनयानें जोडून गौतम गणधरांत म्हणाली, भो संसारोद्धारक जगद्गुरो ! आज आपण आम्हांस सर्व सुखाला कारण असे एकादें व्रतविधान निवे- दावे. ई। तिची नम्र प्रार्थना ऐकून ते गणेंद्र म्हणाले, हे कन्ये ! आतां तुम्हास सौख्यसुतसंपत्ति व्रत है पालन करण्यास उचित आहे. असे म्हणून त्यांनीं तिला त्याचा सर्वविधि सांगितला.
हे सर्व कथन ऐकून सर्व जनांस अतिशय आनंद झाला. त्या- गणेशास प्रार्थना करून त्यांच्या जवळ है व्रत विजयावतीनें घेटलें. नंतर सर्वजन भगवंतास व मुनीश्वरांस नमस्कार करून आपल्या नगरीं परत आले. पुढे समयानुसार हैं व्रत विधिपूर्वक करण्यास तिर्ने प्रारंभ केला. तेव्हां, अल्पावधीतच व्रतमाहात्म्याने ती धन, कनक, पुत्र यांनीं समृद्ध झाली. परंतु तिच्या मनांव गर्व उत्पन्न झाल्याने ती उदासीन वृत्तीनें व्रत पाळू लागली, त्यामुळे तिचे सर्व पुत्र निराळे झाले व आई बापांस विरोध करूं लागले. घरांतील लक्ष्मी विलय पावली. त्या कार- णार्ने सर्व जन दरिद्री होऊन घोर संकटांत पडले असतां, – एके दिवशीं सुभद्राचार्य दिगंत्र भट्टारक महाराज चर्यानिमित्त नगरांत आले. विजयावतीच्या घरासंमुस्ख कर धरून आले असतां तिर्ने त्यांना प्रतिग्रह करून गृहीं नेर्ले य नपधामतीने विधिपूर्वक आहार दिला. निरंतराय आहार पूर्ण झाल्यावर ते मुनीश शांतवृत्तीनें कांहीं वेळ तेथे बसले. त्यावेळीं ती विजयावती अत्यंत विनयाने आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाली, – मो महास्त्रामिन् ! आतां आम्हांस इतके भयंकर दारिव्य कां बरें प्राप्त झाले आहे? हे तिचे नम्र दीन वचन ऐकून ते तिला म्हणतात, हे कन्ये! तूं पूर्वी जे व्रत घेतले होतेस तें मक्तीनें व सुमावनेनें पालन केले नाहींस. तुझ्या गृहीं धनसंपत्ति विपुल समृद्धि झाल्यामुळे तुझ्या मनांत गर्व उत्पन्न झाला, त्यायोगानें उदासीन होऊन ते व्रत पाळू लागलीस. त्याकारणाने आतां तुला अशी दुःस्थिती प्राप्त झाली आहे.
हे ऐकतांच तिच्या मनांत अत्यंत पश्चात्ताप झाला. आपली निंदा करून ती घेऊं लागली, पुनः मुनीश्वरांच्या आज्ञेप्रमाणें यथास्थित व्रत पाळण्याचा तिनें निश्चय केला. मग नुनीश निघून गेले. पुढे हैं बत यथाविधि पाळून ती पूर्ववत् धनकनकादिकांच्या समृद्धींत नांदू लागली व पुत्र वगैरे सर्व. एकत्र मिळून सुखानें कालक्रमण करूं लागली, शेवटीं या व्रतपुण्यफलाने समाधिविधीन मरण पावून ती स्वर्गास गेली. तेथे पुष्कळ काळ दिव्य सौख्य मोगू लागली.