व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याही मासांत ज्या दिवशीं मंगळवारी पंचमी तिथी असेल; त्या दिवशीं या ब्रतिकांनीं प्रभातीं सुखोष्णजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बस्ने धारण करावींत. मग सर्व पूजासामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठीवर सुपा- श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदीविजययक्ष कालीयक्षी सहित स्थापून तिचा मंत्रपूर्वक पंचामृतांनी अभिषेक करावा. मग एका पाटावर गंधाने सात स्वस्तिकें काढून त्यांच्यावर सात पाने मांडावीत. आणि त्याच्यावर गंधाक्षता, फर्के, फुले वगैरे द्रव्ये ठेवावींत नंतर वृषभापासून सुपार्श्वनाथापर्यंत सात तीर्थकांचों अष्टके, स्तोत्रे, जयमाला ही म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचपक्वान्नांचे चरु करावेत, श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं श्री सुपार्श्वनाथाय नंदीविजयकाली यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनाम स्तोत्र म्हणून श्रीसुपार्श्वनाथचरित्र वाचावे तसेच ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांत सात पाने लावून त्यांच्यावर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि चारी दानें द्यावींत. ब्रम्हचर्य पाळावे. दुसरे दिवशी पारणा करावी.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|