व्रतविधि – श्रवण मासाच्या शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमी पर्यंत सात दिवस या व्रत आइकांनीं प्रातःकाळीं सुखोष्णजकाने अभ्यंग स्नान करून अंगावर दृढधौत वर्षे घ्यावीत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन जिनालयी जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. जिनेश्वरांस पंचामृ- ताभिषेक करून अष्टद्रव्यांनी त्यांचीं अर्चना करावी. श्रुतं व गणधर यांची पूजा करून यज्ञ, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. देवापुढे एका पाटावर सात पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षतांचे सात पुंज घालावेत. सात सुपान्था, केळी, उत्तम फळे ठेवावींत, मिजविलेल्या हरमन्यांचे पुंज घालून सेवायांचे पायस, साखर, तूप लावून चरु अर्पा- वेत. नंदादीप लावावा, त्यानंतर ॐ न्हीं अहे सप्तपरमस्थानानि अत्र अवतरत २ संवौषट् । अत्र विष्ठत २ ठ २ अत्र मम सन्नि हितानि भवत २ वषट् स्वाहा ।। आव्हानस्थापनसन्निधीकरणम् ।। ॐ न्हीं अई सप्तपरमस्थानेभ्यो जलमित्यादि० ॥ यापमाणे समुदाय पूजा केल्यावर प्रत्येक पुढील मंत्रांनी अर्चना करून प्रतिदिवशीं एकेक मंत्रानें १०८ पुष्पे घालावीत.
१ ॐ नहीं अहे सज्जातित्वपरमस्थानाय नमः ॥ जळमि- त्यादि ० ॥ १ ॥ २ ॐ नहीं अर्ह सद्गृहस्यत्वपरमस्थानाय नमः ।।
जलमित्यादि० ॥ २ ॥ ३ ॐ हीं अंर्ह पारिव्राज्यपरमस्थानाय नमः ॥ जळमित्यादि ० ॥ ३ ॥ ४ ॐ व्हीं सुरेंदूत्वपरमस्थानाय नमः ।॥ जलमित्यादि० ॥ ४ ॥ ५ ॐ न्हीं अई सर्वसाम्राज्य- त्वपरमस्थानाय नमः ॥ जलमित्यादि० ॥ ६ ॐ नहीं अई परमा- ‘ईत्यपरमस्थानाय नमः जलमित्यादि० ।। ७ ॐ हीं अई निर्वा- पत्वपरमस्थानाय नमः जलमित्यादि ० ॥
याममाणे विधि झाल्यावर हो व्रतकथा वाचावी. एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत चैत्यालयास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारदान देऊन ब्रम्हचर्यपूर्वक सात दिवस एक- भुक्ति करावी येणें प्रमाणें सात दिवस विधि पूर्ण करावा, असे हैं व्रत सात वर्षे करून शेवटीं त्याचे उद्यापन करावे. त्यावेळीं महाभिषेकपूजा करावी. सेत्रायांचे पायस, साखर, तूप, दूध युक्त सात प्रकारचे चरु सात नवीन पात्रांत करून अर्पण करावें. सात आरत्या धूपघट, (धूपारत्या) कलश, छत्र, चामरादि आठपातिहा हीं उपकरणे ओवाळून मंदिरांत ठेवावींत. सात मुनीश्वरांना निरंतराय आहारदान द्यावे. सात पुस्तकेंहि त्यांना द्यावीत. तसेच आर्थिका, ब्रम्हचारी श्रावक आविकांनाहि चार प्रकारचे दान देऊन आवश्यक वस्तूंहि द्याव्यात. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कांभोज नांवाचा एक विशाल देश आहे. त्यामध्ये भूतिलक नामक एक मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी देवपाल नांवाचा धार्मिक राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमती नांवाचो एक सुंदर धर्मपत्नि राणो होती. ते उभयता मोठ्या आनंदाने कालक्रमण करीत होते. त्यांचा राजश्रेष्ठी धनदत्त नांवाचा होता. त्याला धनश्री नाम्नी गुणवती स्त्रो होती. त्यांनी एके दिवशीं नित्यनियमाप्रमाणे जिनमंदिरास जाऊन अष्टविधार्चन पूजा केली. तेव्हां तेथे ज्ञानसागर नामक निर्भथ मट्टारक महामुनिराज आहे होते. त्यांना नमोस्तु करून त्याच्याजवळ जाऊन बसून कांहीं धर्मोपदेश देकला त्यानंतर त्यांनीं गुरुरायांना प्रार्थना करून असा प्रश्न केला कीं; भो संसारसागरतारक स्वामिन् ! आपण आम्हांस परम सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान सांगावे. ही त्यांचीं नम्र पार्थना ऐकून ते मुनी- श्वर म्हणाले, तुम्ही सर्वसुखाला कारण असे है सप्तपरमस्थानव्रत यथाविधि करा, म्हणजे तुम्हांस परमसुख प्राप्त होईल, असे म्हणून त्यांनीं त्यांना सर्वविधि सांगितला. मग सर्वांर्वांना संतोष झाला. तेव्हां हे व्रत पूर्वी कोणी पाळलें आहे त्यांचे चरित्र कथन करावे? असा प्रश्न ऐकून त्यांनी त्यांना पुढील प्रमाणे कथा सांगितली.
या जंबूद्वीपांतोल भरतक्षेत्रामध्ये नेपाळ या नांवाचा एक विस्तृत देश आहे तेथे ललितपुर नांवाचे मनोहर एक नगर आहे. तेथे पूर्वी भूपाल नामक एक मोठा पराक्रमी राजा होता. त्याला विशाल नाम्नी एक प्रिय स्त्री होती. त्यांना पुत्रसंतान नसलेने ते अगदीं खिन्नावस्थेत होतें. तेव्हां एके दिवशीं त्या नगरोद्यानांत देशभूषण नामक महामु- निरत्न येऊन उतरले. ही वार्ता वनपालकाच्या द्वारे राजेंद्रास समजली. तेव्हां तो आपल्या प्रियपत्नि वगैरे वगैरे परिवारांसह त्या ठिकाणीं जाऊन त्यांना मोठ्या भक्तीने त्रिपदक्षिणापूर्वक वंदना करिता झाला. त्यांच्या समीप बसून कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकिला. त्या नंतर ते दंपती मोठ्या विनयानें आपलीं फरकमळे जोडून म्हणाले- हे स्वामिन् ! आम्हांस पुत्रसंतान नसल्याने आमचा जन्म निरर्थक होत आहे. तेव्हां आतां आम्हांस पुत्रसंतान प्राप्त होईल की नाहीं.? हे कृपा करून सांगावें हा त्यांचा विनयप्रश्न ऐकून मुनिराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, -काश्मीर देशामध्ये इस्तिनापुर नगर आहे. तेथे रुद्रदत्त नांवाचा एक धार्मिक व श्रीमंत श्रेष्ठी राहात होता. त्याला रुद्रदत्ता नान्नी सुशील धर्मपत्नि होती. त्यांच्या पोटी १ इंद्रसेन २ चंद्रसेन ३ रुद्रसेन ४ भद्रसेन १ सुरसेन, ६ वीरसेन ७ नागसेन ८ सागरसेन. ९ धर्मसेन १० वरसेन ११ मबसेन १२ कुमारसेन १३ धन्यसेन १४ चारुषेण १५ मेरुषेग १६ प्रवरसेन असे खोळा १६ पुत्र जन्मले होते. ते युवावस्थेत आल्यानंतर त्या सर्वांचे विवाह करून त्यांना प्रत्येकी आठरा १८ कोटी द्रव्य वाटून दिले, आणि आपल्या धर्मपत्नीला दानपूजादिकांकरितां ८ आठ कोटी द्रव्य दिले. व आपण ३२ कोटी द्रव्य जिनबिंव, जिनागार तीर्थयात्रा, प्रतिष्ठा, शास्त्रलेखन, दान, नित्यपूजा, जोणर्णोद्धार वगैरे धार्मिक कार्यात खर्च केले, वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्या श्रेष्ठोनें निर्मंथ मुनिजवळ जाऊन जिनदीक्षा घेतली. घोरतपश्चर्या करून समाधि साधून सर्वार्थसिद्धीस गेला.
त्या षोडश पुत्रांपैकी नागसेन पुत्र सप्तव्यसनीं बनला. आणि सर्व द्रव्य नाश करून दरिद्री झाला. मग देशांतरी जाऊन मर्केटवैरा- ग्याने पाखंडी साधु बनला. परमागमाचा त्याग करून कुशाने शिकून गुरुवचन भंग केला. तसेच तो संघविरोधी, दुर्जन, कलहप्रिय, कुशील, स्वेच्छाचारी, विक्रथाधारी होऊन जिनवचन उल्लंघिला. एकादश प्रतिमा धारण न करतां कुबुद्धीने वागून अंतकाळीं आतेरौद्रध्यानाने मरण पावून चौथ्या नरकास गेला. तेथे पुष्कळ काल दुःख भोगून पुनः तेथून निघून सौराष्ट्र देशांत कुत्रा होऊन जन्मला. मग तो कुत्रा अंगावर किडे पडून मरून पूर्वकालच्या कांहीं पुण्यांशानें (पुण्यावशेषामुळे) काश्मीर देशांतील हस्तिनापुरामध्ये राहणाऱ्या व्यास नामक पारावत (मिध्यासाधु) राहात असे, त्याला विमलगंगा नांवाची स्त्री होती. यांच्या पोटीं मनोहर नांवाचा पुत्र होऊन जन्मला. त्याच शहरांत कुबेरकांत नामक राजश्रेष्ठी रहात होता. त्याला कनकमाळा नाम्नी गुणवती स्त्री होती. त्यांच्या उदरीं धनदेव नांवाचा सद्गुणी पुत्र जन्मला होता. बालपणी याची व मनोहर यांची मैत्री जमली. दोघे एके ठिकाणी एकाच गुरुजवळ जैनशास्त्राचा अभ्यास करूं लागले.
पुढे कांहीं दिवसांनी त्या नगराच्या नंदनवनांत ज्ञानसागर नामक दिगंबर महामुनि येऊन उतरले. ही शुभवार्ता नगरांत कळतांच भाविक लोक दर्शनास गेले. तेव्हां त्यांच्या बरोबर हे दोघे ही गेले. तेथे गेल्यावर अतिशय आदराने मुनीश्वरांस भक्तीनें नमोस्तु करून सर्व जन त्यांच्या समीप जाऊन बसले. मुनिराज धर्मोपदेश सांगत असतां त्यांतच त्यांनीं सप्तपरमस्थान व्रताचा उल्लेख केला. तो सर्वांनी मोठ्या उत्सुकतेने ऐकला. पुष्कळांनीं है व्रत घेतले, तेव्हां मनोहरानेंही है व्रत स्वीकारून यथाविधि पाळिले. त्या व्रतफलानें तोच पुत्र तुम्हां उभयतांच्या पोटीं श्रीपाल जन्मणार आहे.
या प्रमाणें ही कथा ऐकून त्यांना मोठा आनंद झाला. नंतर घरीं जाऊन सुखानें कालक्रमण करूं लागले. कांहीं दिवसांनीं तो मनोहर चर जीव यांच्या पोटीं श्रीपाल नामक पुत्र होऊन जन्मला. पुढे तो भव्योत्तम होऊन हे पूर्वोक्त व्रत यथाविधि पुनः पालन करतां झाला. आणि व्रतमाहात्म्याने सप्तपरमस्थानाच्या ऐश्वर्थास प्राप्त झाला अर्थात् मुक्त झाला.