व्रतविधि– आषाढ शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं सुखोष्ञ जलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ़धौत वर्षे धारण करावींत. सर्वे पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिर्णा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे पूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करात्रा, पीठावर चतुर्विशति तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापूने तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्ठद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुतव गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्जन करावें,
देवापुढे एका पाटावर सात पार्ने मांडून त्यांवर अक्षतांचे पुंज, फुलें व फलें ठेवावीत. देवींना हळदकुंकू लावावा. नंतर ॐ हों वृषभादिचतुर्विंशति तीर्थकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ फुले घालावीत. ॐ नहीं अर्हद्भ्यो नमः, या मंत्रानें १०८ जप करावा. ही व्रतकथा वाचावी. त्यानंतर एक महार्घ्य करून त्यांत सात- वाती घालून तयार केलेली आरती ठेवून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालाव्यात, त्यावेळो पुढोल मंत्र क्रमानें म्हणावेत. १ आत्म- ज्योतिः २ आचारज्योतिः ३ पुरुषज्योतिः ४ पुत्रज्योतिः ५ पुण्यज्योतिः ६ सहोदरज्योतिः ७ छत्रज्योतिश्च नित्यं मम अस्माकं भवतु स्वाहा ॥ असे म्हणत ओवाळावे. मंगलारती करावी. पांच अगर सात सुवासिनी स्त्रियांस हळदकुंकू लावावा.
याप्रमाणें प्रतिदिनी अभिषेकपूजादि क्रम सर्व करावा. शेवटीं कार्तिक शु. १५ पौर्णिमे दिवशीं चतुर्विशति तीर्थकरांस महाभिषेकपूजा करून या व्रताचे उद्यापन करावे. तेव्हां एक रूप्याची पणती व त्यांत सोन्याच्या वाती सात घालून एकापात्रांत सातपार्ने अष्टद्रव्ये लावून महार्घ्य करून तीन प्रदक्षिणा पूर्वक ओवाळावे. सुवासिनी स्त्रियांस करंजा, वड्या, थालीपीठ, मिजावण्या, पान सुपारी, अक्षतां, फुले, फलें वगैरे ओटींत घालून त्यांचा आदर सत्कार करावा. देवापुढे मांडलेल्या सात पार्ने व त्यावरील अक्षत पुंजावर हळदीकुंकू करंड्या, बांगड्या ठेवाव्यात. देवीलाहि प्रथम वहावे नंतर सुवासिनी यांनाहि द्यावें. सत्पात्रांस आहा- रादि दाने द्यावीत. आषाढ शु. ८ पासून कार्तिक शु. ११ मे पर्यंत येणाऱ्या अष्टमी चतुर्दशी दिवशीं उपवासादि शक्त्यनुसार करावें. ब्रम्हचर्य पाळावें. असा याचा पूर्णविधि आहे. हैं व्रत जे मव्यजीव यथाविधि पाळतात; त्यांना पुण्याचे आस्रव होऊन इहपरलोकीं नित्य- सौभाग्य, भोगोपभोग आणि सर्व ऐश्वर्य मिळते. शेवटीं क्रमाने मोक्ष- सुस्वहि अवश्य प्राप्त होते.
– कथा –
श्रेणिक राजा व चळना राणो यांचीच कथा प्रथम दिली आहे तीच येथे समजावी, शिवाय त्यावेळीं पुनः श्रेणिकाचा राजश्रेष्ठी जिनदत्त व त्यांचा भार्या जिनदत्ता यांचा पुत्र वृषभदत्त व त्याची पत्नी सुमती यांनीं हि है व्रत पाळून सद्गती साधिली आहे.
यांपैकीं सुमती ही हे व्रत पालन करित असदां, – एके दिवशीं तिच्या श्वसुरास बेरडलोकांनीं भयंकर उपसर्ग केला. तेव्हां तो उपसर्ग तिच्या व्रतमाहात्म्याने तत्काल दूर झाला. तसेंच पुनः एकदां तिच्या कन्येस सर्पाने दंश केल्यामुळे ती मूच्छित होऊन पडली. इतक्यांत सुमतीनें जिनालयांतून आणलले गंधोदक तिच्यावर शिपिळे. त्यामुळे तो निर्विष सावध होऊन उठून बसली. याच प्रमाणे एके दिवशीं तिच्या बंबूंना एकाएकी भयंकर उपसर्ग झाला, तो यक्षदेवतेने त्वरित निवारिला. याप्रमाणे व्रतपूजा प्रभाव प्रत्यक्ष सर्वांना, दिसून आला. पुढें सुमती पुण्यप्रभावानें स्वर्गास गेली आणि दिव्यसौख्य भोगून क्रमाने मोक्षास जाणार.