व्रतविधि – भाद्रपद शु. १४ दिवशीं प्रभार्ती या व्रतिकांनीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करा- बींत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नम- स्कार करावा. पीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांचो अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी आणि ब्रम्हदेव यांचे यथोचित मंत्रानें अर्चन करावे, ॐ नहीं अर्ह वृषभादिचतुविशार्तवीबैंकरेभ्यो यक्षबक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रार्ने १०८ पुणे घालावीत.’ णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सोळा पार्ने क्रमाने लावून त्यांवर अष्टद्रव्येसहित १६ गव्हाच्या पुग्यावर तूप साखर घालून ठेवावे. मध्ये एक नारळ मांडून महार्घ्य करून स्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मेगलारती करावी, त्यादिवशीं ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करावा. दुसरे दिवशीं जिनपूजा करून नैवेद्य दाखवून सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणें कर्रावं.
या प्रमाणे १६ अगर ११ अथवा ९ किंवा ५ कनिष्ठ ३ वर्षे करी यथाशक्ति है व्रत करावें शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळी महाभिषेक पूजा करावी. १६ पात्रांत १६ प्रकारची पक्वान्ने आणि तूप, साखर लावून चरु करून अर्पावेत. १६ मुनिसंचास आहारादि दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रामध्ये नेपाळ नांवाचा मोठा देश असून त्यांत ललितपुर नांवाचे मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी उत्तुंग नांवाचा नीतिमान्, गुणवान असा राजा आपल्या चित्रगुप्ता नामें सद्गुणी, रूपवती, गुणवती अशा पट्टराणीसह सुखाने राज्य करीत होता.
एके दिवशीं त्या नगराच्या बाहेरील उद्यानवनांत अवधिज्ञान- संपन्न असे श्रुतसागर नामक भट्टारक महामुनि येऊन अवतरले “ही शुमवार्ता वनपालकद्वारें राजांस कळतांच तो आपल्या सर्व परिजन व पुरजन यांच्यासह त्या मुनीश्वराच्या दर्शनास गेला. तेथे जाऊन त्यांना तीन प्रदक्षिणा घालून भक्तीने वंदना करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ त्यांच्या मुखें धर्मश्रवण केल्यानंतर ती चित्रगुप्ता आपली दोन्हीं करकमळे जोडून विनयानें त्यांना म्हणाली- हे ज्ञान- सिंधो गुरुवर्य ! आज आपण आम्हांस स्त्रीजन्मनिवारक असे एखादे नवविधान निरूपण करावें. हे तिचे नमवचन ऐकून ते मुनिराज म्हणाले, हे भाग्यवती कन्ये । सूतकपरिद्वारवत दे (चारगी नौंवी) पालन करण्यास उचित आहे. जे हे मत पालन करतात, त्यांना उत्कृष्ट पुण्यासत्र होतात, त्यायोगे ऐहिक व पारमार्थिक सुखे मिळतात, असा या मताचा महिमा आहे. असे म्हणून त्यांनी याचा सर्वविषि तिला सांगितला.
हे सर्व कथन ऐकून सर्वांस मोठा आनंद झाला. मग तिने त्यांना प्रार्थना करून है बत स्वीकारिले. नंतर सर्वजन त्यांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आहे. पुढे कालानुसार तिने हे व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले. या व्रतपुण्यबलाने अंतीं ती समाधि साधून नीलिग छेडून स्वगीत देव झालो. मग तेथे तो देव चिरकाल सुख भोगू लागला. कालांतराने तो मुक्त होईल.