व्रतविधि – माद्रपद शु. ५ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे घ्यावीत. सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन पद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. मंडप शृंगार करून शुद्धनूतनवस्त्रावर यंत्रदल काढून वर चंद्रो पक बांधावे, खालीं शुद्धभूमीवर पंचवर्णानीं दशलक्षणदल यंत्र काढून त्याच्या सभोंवती चतुष्कोणी पंचमंडले काढावींत. मध्यभागीं श्वेतसूत्रवे- ष्ठित सुशोभित कुंभ ठेवून आठ दिशेस अष्टमंगलकलश आठ मंगलद्रव्यें ठेवावीत. त्यांन पंचवर्णसूत्र व वस्त्र गुढाळावे. नंतर पीठावर दशलक्षण- यंत्र व चोवीसतीर्थकर प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका ताटांत दहा पार्ने, गंध, अक्षता, फुले वगैरे लावून तो ताट मध्यकुंभावर ठेवून त्यावर तें यंत्र व मूर्ति स्थापावी. भग नित्यपूजाक्रम करून दशलक्षणिकमतपूजाविधान वाचावे. विधानांत सांगितल्याप्रमाणे सर्व किया केल्यानंतर ही व्रतकथा वाचावी. एक पात्रांत दहा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये लावून एक महाये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती ‘करावी. उपवासादिक यथाशक्ति ब्रम्हचर्यपूर्वक करून धर्मध्यानांत काल घालत्रावा.
याच क्रमाने दडा १० दिवस हा पूजाक्रम करावा. असे १० दहा वर्षे हैं व्रत करून नंतर याचे उद्यापन करावे. त्यावेळी दशकाक्षणिक- व्रतोद्यापनविधान करावें. नूतन चोवीस तीर्थकर प्रतिमा, श्रुतस्कंध आणि गणधर पादुका तयार करवून त्यांची पंचकल्याणत्रिधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. नूनन जिनमंदिर बांधावे. जीर्ण जिनचैत्यचैत्यालयाचा उद्धार करावा. मंदिरांत आवश्यक उपकरणे व भांडी ठेवावीत. चतुः संघास चतुश्धिदानें देऊन त्यांना शाखें, श्रुतवस्त्रे जपमाळा, कमंडलु पिंछी वगैरे वस्तूं द्याव्यात. दहा दंपतीस आपल्या घरीं भोजन करवून वस्त्रा- दिकानीं त्यांचा सन्मान करावा. दहा वायर्ने बांधून देवशास्त्रागुरु यांच्यापुढे एकेक ठेवून नमस्कार करावा. मग गृहस्थाचायाँस व दंपतीस बावीत असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
धातकी खंडांतील पूर्वमेरुपर्वताच्या दक्षिणभागीं सीतोदा नदीच्या काठीं विशाळनगर या नांवाचे एक पट्टण आहे, तेथे पूर्वी प्रियंकर नांवाचा एक धार्मिक, पराक्रमी व न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. त्याला प्रियंकरी नाम्नी सुशील, गुणवत्ती अशी धर्मपत्नी होती. त्यांना मृगांकलेखा नांवाची एक लावण्यवती, नामक कन्या होती. राजाचा मतिशेखर नांवाचा चाणाक्ष, सुविचारी मंत्री होता. त्याला शश्चिमभा नामक सदाचारिणी स्त्री होती. त्यांच्या उदरी कमळ सेना नाम्नी रूपवती कन्या होती. तसेच तेथे गुणशेखर नांवाचा एक धर्मिष्ठ राजश्रेष्ठो होता. त्यांच्या स्त्रोचे नांव शोलप्रमा होतें. तीही मोठो सुंदर व लावण्यवती होतो. त्यांना मदनरेखा नामै एक गुणवती मुलगी होती, त्याच पट्टणी लक्षम नामक एक विद्वान्, विवेकी ब्राह्मण होता. त्याच्या बायकोचे नांव चंद्रवदना असे. त्यांच्या उदरों रोहिणी नांवाची एक रूपवती पुत्री होतो. अशा ह्या वरील चारी कन्याचा सौंदर्ययुक्त व चतुर होत्या. धर्माचरणांत ह्या सतत निमग्न असत. ह्या चौधीही कन्यांनी एकाच गुरुजवळ सर्व विद्याभ्यास केला होता.
पुढे एके दिवशीं वसंत ऋतुमध्ये त्या चौघीजणी आपापल्या मातापितरांची आज्ञा घेऊन पट्टणाच्या बहिरुपवनांत विनोदानें क्रीडा करण्यासाठीं गेल्या होत्या. त्या ठिकाणी एका सुंदर व त्रिशाल वृक्षाच्या छायेत एका शिलेबर अवधिज्ञानो वसंतसेन नामक महामुनीश्वर ध्यानस्थ बसले होते. तेव्हां या सर्व कुमारी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मक्तींनें नमस्कार करून बसल्या. कांहीं वेळाने मुनीश्वरांनीं आपले ध्यान विसर्जन केलें. मग त्यांपैकी एका चाणाक्ष कन्येने त्यांना विनयाने आपले करयुगल जोडून म्हटले कीं, – हे दयासागर गुरुराज ! आज आपण आम्हांस या स्त्रीमवांतून मुक्त होण्याचा एकादा उपाय सांगावा. हे तिचे नम्र भाषण ऐकून ते मुनी- श्वर म्हणाले, हे बालिकांनो ! तुम्ही दशळाक्षणिक व्रत है यथास्थित पालन करा. म्हणजे तुम्हांस इष्टफल अवश्व मिळेल. या व्रत- प्रभावानें संसारासंबंधी सर्वदुःखें निवृत्त होऊन स्वर्गसुख सहज मिळते व परंपरेने अपवर्गही प्राप्त होते. असे म्हणून त्यांनीं या व्रताचा सर्वविधि त्यांना सांगितला. तेव्हां ते सर्व कथन ऐकून त्यांना मोठा हर्ष झाला. मग त्या कन्यांनी त्यांना प्रार्थना व वंदना करून है व्रत स्वीकारिलें. त्यानंतर पुनः त्यांना नमस्कार करून आपल्या गृहीं परत आल्या. पुढे कालानुसार त्यांनीं है व्रत यथोक्तरीतीनें पाळिले.
त्या चौघीजणी या बतपुण्याईने या लोकीं पुष्कळ वर्षे धर्मसाधन करून शेवटी सन्यासविधीने मरण पावून महाशुक्र स्वर्गातील वज्र- गिरी, वज्राभा, वज्रांक, वज्रसारथी या चार विमानामध्ये अनुक्रमें- अमरगिरी, अमरचूल, देवप्रभ, पद्मसारथी या नांवाचे ऐश्वर्य संपन्न देव होऊन जन्मल्या; आणि तेथे ते चिरकाल देवांगणासह अनेक प्रकारे सोळासागरवर्षे पर्यंत स्वर्गीयसुख भोगूं लागले.
तेथील आयुष्य पूर्ण झाल्यावर ते देव तेथून च्यवून या भरत क्षेत्रांतील मालव देशामध्ये उज्जयिनी नांवाची एक सुंदर नगरी आहे. तेथे स्थूलभद्र नांवाचा एक शूर राजा असून त्याला विचक्षणा, लक्ष्मीमती, सुशीला, कमलाक्षी अशा चार राण्या होत्या. त्यांच्या उदरीं क्रमाने पूर्णकुमार, देवराज, गुणचंद्र, पद्मकुमार, या नांवाचे पुत्र होऊन जन्मले. ते चौघेही मोठे रूपवान्, गुणशाली, असे होते. बालपणीं त्यांनी एका विद्वान् गुरुजवळ विद्याभ्यास केल्यामुळे मोठे ज्ञानी, नीतिमान्, सुविचारी, श्रद्धालु आणि धर्मिष्ठ बनले. ते पूर्ण युवावस्येंत आले. तेव्हां इकडे एका नंदन नांवाच्या नगरींत तिलकराजा नांवाचा राजा असून त्याला तिलकसुंदरी नांवाची सौंदर्यवती स्त्री होती. यांच्या पोटीं क्रमानें कलावती, ब्राम्ही, इंदुगात्री व कुंकू अशा चार कन्या होत्या. त्या उपवर झाल्यानंतर मातापितरांनीं त्या पूर्वोक्त चौधा राजपुत्रांशीं ह्यांचा विवाह करून दिला.पुढें एके दिवशीं स्थूलभद्र राजा राजवाड्याच्या गच्चीवर बसला असतां, आकाशांत मेघांची क्षणिक चंचलता पाहून संसाराविषयीं अत्यंत विरक्त झाला. मग तो तत्काळ आपल्या ज्येष्ठ पुत्रांस राज्यकारभार सौंपवून आपण वनांत जाऊन दिगंबर मुनिसन्निध जिनदीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागला. तपप्रभावाने सर्व कर्माचा क्षय करून तो मोक्षास गेला.इकडे ते चौघे ही राजपुत्र राज्यसुख मोठ्या प्रेमाने भोगू लागले. कालांतराने त्यांना ही कोणत्याहि निमित्तानें संसाराविषयीं क्षणभंगुरता दिसून आल्यामुळे त्यांना वैराग्य उत्पन्न झाले. मग ते चौवेही एका ज्येष्ठ पुत्रांस राज्यमार देऊन बनांत गेले, तेथे एका शीलमद्र नामक मुनीश्वरांजवळ जिनदोक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागले. त्या तपप्रभावाने शुक्लध्यानामुळे सर्वकमांचा नाश करून अक्षयसुखी झाले. अर्थात् मोक्षास गेले.